Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Mental Health > सोमवारी ऑफिस म्हणून रविवार सायंकाळपासून छातीत धडधडतं-उदास वाटतं? पाहा ‘या’ आजाराला काय म्हणतात, करायचं काय...

सोमवारी ऑफिस म्हणून रविवार सायंकाळपासून छातीत धडधडतं-उदास वाटतं? पाहा ‘या’ आजाराला काय म्हणतात, करायचं काय...

tips to overcome sunday scaries : stressed on sunday before office : काय आहे 'संडे स्केअरीज'? ज्यामुळे सुटीच्या दिवशीही कामाचं ओझं जाणवू लागतं - पाहा नेमका हा कोणता प्रकार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2026 17:43 IST2026-05-11T17:39:56+5:302026-05-11T17:43:55+5:30

tips to overcome sunday scaries : stressed on sunday before office : काय आहे 'संडे स्केअरीज'? ज्यामुळे सुटीच्या दिवशीही कामाचं ओझं जाणवू लागतं - पाहा नेमका हा कोणता प्रकार...

tips to overcome sunday scaries stressed on sunday before office sunday depression before work | सोमवारी ऑफिस म्हणून रविवार सायंकाळपासून छातीत धडधडतं-उदास वाटतं? पाहा ‘या’ आजाराला काय म्हणतात, करायचं काय...

सोमवारी ऑफिस म्हणून रविवार सायंकाळपासून छातीत धडधडतं-उदास वाटतं? पाहा ‘या’ आजाराला काय म्हणतात, करायचं काय...

रविवारची सुट्टी म्हटली की डोळ्यांसमोर येतो तो निवांतपणा, सुस्त सकाळ आणि आवडीचे जेवण, टाईमपास असं सगळं आठवतं... पण जसा जसा सूर्यास्त होऊ लागतो आणि संध्याकाळचे साडेपाच-सहा वाजतात, तशी मनात एक भीती किंवा अस्वस्थता वाटू लागते. उद्याचा 'सोमवार' आठवून छातीत धडधडू लागतं, काळजाचा ठोका चुकतो आणि डोळ्यांसमोर ऑफिसच्या पेंडिंग फाईल्स, डेडलाईन्स आणि तेच ते कंटाळवाणे टास्क आठवून जीव मेटाकुटीला येतो आणि हे सगळं अगदी नकोसचं वाटू लागतं(tips to overcome sunday scaries).

जर तुमच्यासोबतही असंच काहीसं घडत असेल तर मानसशास्त्राच्या भाषेत या मानसिक स्थितीला 'संडे स्केअरीज' (Sunday Scaries) असं म्हटलं जातं. ही केवळ कामाची भीती नसून, सुट्टी (sunday depression before work) संपत आल्याची आणि पुन्हा त्या धकाधकीच्या चक्रात अडकण्याची एक मानसिक धास्ती आहे. आपल्यापैकी काहीजणांना  ऑफिसला जाणं इतकं का नकोसं वाटतं? रविवारचा आनंद घेण्याऐवजी आपण सोमवारचं टेन्शन घेऊन आपली सुट्टी का वाया घालवतो? आणि या 'संडे स्केअरीज'च्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी (stressed on sunday before office) नेमके कोणते उपाय आहेत ते पाहूयात... 

रविवारपासूनच सोमवारी ऑफिसला जाण्याचं टेंन्शन का येतं ? 

'संडे स्केअरीज' (Sunday Scaries) हा एक असा शब्द आहे जो त्या अस्वस्थता, तणाव किंवा भीतीसाठी वापरला जातो, जी अनेक लोकांना रविवार संपत असताना जाणवू लागते. जसजसा सोमवार जवळ येतो, तसतसे मेंदूमध्ये ऑफिस, कामाचा ताण, मीटिंग्स, डेडलाईन्स आणि जबाबदाऱ्यांची चिंता वाढू लागते.

ऐन चाळिशीतही येऊ शकतो हार्ट ॲटॅक, नकळत होणाऱ्या ५ चुका आजच बदला-नाहीतर वेळ निघून जायची...

असं नेमकं होण्यामागची कारणं काय आहेत ? 

१. मिस्ड डेडलाईन्सची भीती :- मागील आठवड्यात पूर्ण न झालेली कामे सोमवारी समोर येणार, या विचाराने ही भीती अधिक वाढते.

२. स्वातंत्र्य संपल्याची भावना :- रविवार हा तुमचा स्वतःचा दिवस असतो. तो संपून पुन्हा कोणाच्या तरी आदेशानुसार काम करावे लागणार, ही भावना अस्वस्थ करते.

३. झोपेचे चक्र बिघडणे :- अनेकदा आपण शनिवारी रात्री उशिरापर्यंत जागतो आणि रविवारी उशिरा उठतो. यामुळे शरीराचे नैसर्गिक चक्र बिघडते, ज्याचा परिणाम रविवारी संध्याकाळी चिडचिड किंवा तणावात होतो.

४. सोशल मीडिया प्रेशर :- इतरांचे 'संडे आऊटिंग' किंवा 'हॅपी संडे'चे फोटो बघून आपण आपली सुटी नीट साजरी केली नाही का? असे वाटूनही तणाव वाढू शकतो.

हे नॉर्मल आहे का?

रविवारी थोडीफार चिंता वाटणे ही एक नॉर्मल गोष्ट मानली जाते. परंतु, जर हा त्रास प्रत्येक आठवड्यात खूप जास्त होऊ लागला आणि त्याचा परिणाम तुमचे मानसिक आरोग्य, झोपे किंवा डेली रुटीनवर होऊ लागला, तर मात्र याकडे दुर्लक्ष करू नका.

मॉलच्या आरशात सुंदर दिसणारे कपडे घरी आल्यावर वेगळेच दिसतात ना..? बदलतो पूर्ण लूक, कारणं...

संडे स्केअरीजच्या या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी सोपे उपाय.... 

१. विकेंडला थोडा आराम करा, तुमचे छंद जोपासा किंवा कुटुंबासोबत निवांत वेळ घालवा. ऑफिसचे विचार मनातून पूर्णपणे काढून टाका.

२. सोमवारी सकाळी गेल्यावर काय करायचे आहे, याची यादी शुक्रवारी ऑफिस सोडण्यापूर्वीच बनवून ठेवा. यामुळे रविवार निवांत जातो.

३. रविवार रात्री उशिरापर्यंत जागल्यामुळे सोमवारचा दिवस अधिक कठीण वाटू शकतो. त्यामुळे वेळेवर झोप घ्या.

४. झोपण्यापूर्वी सतत ऑफिसचे ईमेल किंवा चॅट्स पाहिल्यामुळे अस्वस्थता (Anxiety) वाढू शकते. त्यामुळे मोबाईलपासून दूर राहा.

५. मन शांत ठेवण्यासाठी फेरफटका मारणे, गाणं ऐकणे, योग किंवा ध्यान (Meditation) यांची मदत होऊ शकता.

Web Title : संडे स्केरीज: सोमवार की चिंता को समझें और उससे उबरें

Web Summary : क्या आपको रविवार की शाम को काम पर लौटने की चिंता होती है? यह 'संडे स्केरीज' है, जो डेडलाइन और जिम्मेदारियों के कारण होती है। कारणों में छूटी हुई डेडलाइन, स्वतंत्रता का नुकसान और बाधित नींद शामिल हैं। सरल समाधानों में सप्ताहांत में आराम करना, सोमवार के कार्यों की योजना बनाना और तनाव कम करने के लिए शांत सोने की दिनचर्या स्थापित करना शामिल है।

Web Title : Sunday Scaries: Understanding Pre-Monday Anxiety and How to Overcome It

Web Summary : Experiencing anxiety on Sunday evenings about returning to work? It's 'Sunday Scaries,' a common feeling driven by looming deadlines and responsibilities. Causes include missed deadlines, loss of freedom, and disrupted sleep. Simple solutions involve weekend relaxation, planning Monday's tasks in advance, and establishing a calming bedtime routine to alleviate stress.