Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Mental Health > स्ट्रेसमुळे केवळ मानसिक आरोग्याचंच नाही तर त्वचेचंही होतं नुकसान, 'या' ४ गंभीर समस्यांचा वाढतो धोका

स्ट्रेसमुळे केवळ मानसिक आरोग्याचंच नाही तर त्वचेचंही होतं नुकसान, 'या' ४ गंभीर समस्यांचा वाढतो धोका

Stress Impact On Skin : अनेक संशोधनांमधून हे स्पष्ट झालंय की, जेव्हा आपण तणावात असतो, तेव्हा केवळ मानसिक रूपाने नाही तर शारीरिक रूपाने प्रतिक्रिया देत असतो. ज्याचा प्रभाव आपल्या त्वचेवर सहजपणे दिसून येतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 09:05 IST2026-04-23T09:05:10+5:302026-04-23T09:05:35+5:30

Stress Impact On Skin : अनेक संशोधनांमधून हे स्पष्ट झालंय की, जेव्हा आपण तणावात असतो, तेव्हा केवळ मानसिक रूपाने नाही तर शारीरिक रूपाने प्रतिक्रिया देत असतो. ज्याचा प्रभाव आपल्या त्वचेवर सहजपणे दिसून येतो.

Stress can affecting your skin health also, It can cause 4 serious problems | स्ट्रेसमुळे केवळ मानसिक आरोग्याचंच नाही तर त्वचेचंही होतं नुकसान, 'या' ४ गंभीर समस्यांचा वाढतो धोका

स्ट्रेसमुळे केवळ मानसिक आरोग्याचंच नाही तर त्वचेचंही होतं नुकसान, 'या' ४ गंभीर समस्यांचा वाढतो धोका

Stress Impact On Skin : आजच्या वेगवान लाइफमुळे, वाढत्या कामामुळे, वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे, प्रदूषण आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे स्ट्रेस आणि एंझायटी होणं फारच कॉमन झालंय. मानसिक आरोग्यासंबंधी या दोन्ही गोष्टी आपल्या जीवनाचा भाग बनल्या आहेत. सामान्यपणे स्ट्रेस आणि एंझायटीचा संबंध मेंदू किंवा हृदयाशी जोडला जातो. पण यातील आणखी गुपित म्हणजे स्ट्रेस आणि एंझायटीमुळे केवळ मानसिकच आरोग्य नाही तर त्वचाही प्रभावित होतं. अनेक संशोधनांमधून हे स्पष्ट झालंय की, जेव्हा आपण तणावात असतो, तेव्हा केवळ मानसिक रूपाने नाही तर शारीरिक रूपाने प्रतिक्रिया देत असतो. ज्याचा प्रभाव आपल्या त्वचेवर सहजपणे दिसून येतो. तो कसा हे समजून घेऊया.

तणाव आणि त्वचेचा संबंध

जेव्हा आपण स्ट्रेस किंवा एंझायटीचे फेस करत असतो तेव्हा शरीरात कोर्टिसोल हार्मोन रिलीज होतात. याला स्ट्रेस हार्मोन म्हटलं जातं. या हार्मोनने शरीरातील इम्यून सिस्टीमचं संतुलन बिघडतं. या बदलामुळे त्वचेचं बाहेरील आवरण कमजोर होतं, जखम भरण्याची क्षमता कमी होते आणि शरीरात सूज वाढवणारे तत्व जमा होऊ लागतात. 

तणावामुळे होणाऱ्या समस्या

अ‍ॅक्ने - एंझायटीच्या स्थितीत रिलीज होणारे कोर्टिसोल आपल्या त्वचेतील ऑइल ग्लँडला अ‍ॅक्टिव करतं. त्यामुळे चेहऱ्यावर जास्त तेल जमा होतं, अशात बॅक्टेरिया वाढण्यासाठी योग्य परिस्थिती तयार होते आणि यामुळेच पिंपल्स होतात. 

सोरियासिस - ही एख ऑटोइम्यून कंडिशन आहे. तणावामुळे शरीरातील इम्यून रिस्पॉन्स बदलतो, ज्यामुळे त्वचेच्या सेल्सचं उत्पादन अचानकपणे वाढतं. याच कारणाने शरीरावर लाल पॅट येऊ लागतात आणि त्वचाही कोरडी होते.

अर्टिकेरिया - अनेकदा कोणत्याही अ‍ॅलर्जीशिवाय शरीरावर लाल चट्टे आणि खाजेची समस्या होऊ लागते. एंझायटीने इम्यून सिस्टीम अ‍ॅक्टिव होतं, ज्यामुळे त्वचेवर स्पष्टपणे स्ट्रेस रॅशेज दिसून येतात.

एटोपिक डर्मेटायटिस - तणावामुळे त्वचेची ओलावा कायम ठेवण्यासाठी क्षमता कमजोर होते, त्यामुळे त्वचा कोरडी होते. एक्झिमा किंवा डर्मेटायटिससारखा सूज असलेला आजार अचानक डोकं वर काढतो.

स्किन बॅरिअर आणि रिकव्हरीवर प्रभाव

तणावामुळे वेगवेगळ्या आजारांचा धोका असतो उद्भवतोच, सोबतच त्वचेची स्वत:ला रिकव्हर करण्याची क्षमताही कमजोर होते. स्ट्रेसमुळे त्वचेचं बॅरिअल तुटतं, ज्यामुळे प्रदूषण आणि बॅक्टेरिया सहजपणे त्वचेच्या शिरतात. जर एखादी जखम झाली असेल तर ती भरायला देखील सामान्यापेक्षा जास्त वेळ लागतो.

Web Title : तनाव त्वचा को नुकसान पहुंचाता है: मुहांसे, सोरायसिस, एक्जिमा का खतरा बढ़ता है।

Web Summary : तनाव कोर्टिसोल को बढ़ाता है, जिससे त्वचा और प्रतिरक्षा कमजोर होती है। इससे मुंहासे, सोरायसिस, पित्ती और एक्जिमा बढ़ सकते हैं। रिकवरी धीमी होती है, संक्रमण का खतरा बढ़ता है।

Web Title : Stress harms skin: Risk of acne, psoriasis, eczema increases.

Web Summary : Stress triggers cortisol, weakening skin and immunity. This can lead to acne, psoriasis, hives, and eczema flare-ups. Recovery is slower, increasing infection risk.