Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Mental Health > फिल्टरच्या जगात हरवतोय खरा आत्मविश्वास! सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्समुळे का निर्माण होतोय न्यूनगंड?

फिल्टरच्या जगात हरवतोय खरा आत्मविश्वास! सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्समुळे का निर्माण होतोय न्यूनगंड?

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा आपल्या आणि मुलांच्या मानसिकतेवर होणाऱ्या परिणामांवर सटीक उपाय जाणून घ्या आणि त्वरित कृती करा.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 13:54 IST2026-03-04T13:52:58+5:302026-03-04T13:54:24+5:30

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा आपल्या आणि मुलांच्या मानसिकतेवर होणाऱ्या परिणामांवर सटीक उपाय जाणून घ्या आणि त्वरित कृती करा.

Real confidence is being lost in the world of filters! Why are social media influencers creating inferiority complex? | फिल्टरच्या जगात हरवतोय खरा आत्मविश्वास! सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्समुळे का निर्माण होतोय न्यूनगंड?

फिल्टरच्या जगात हरवतोय खरा आत्मविश्वास! सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्समुळे का निर्माण होतोय न्यूनगंड?

सोशल मीडियाच्या झगमगाटी जगात आपण तासनतास घालवतो, पण या आभासी जगाचा सर्वात मोठा तडाखा बसत आहे तो म्हणजे सर्व वयोगटातील मुलींना, महिलांना! इन्फ्लुएन्सर्सचे 'परफेक्ट' आयुष्य, 'फिल्टर' केलेले फोटो आणि 'झिरो फिगर'चे आकर्षण यांमुळे मुलींच्या मानसिक आरोग्यावर आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर (Self-image) होणारा परिणाम अत्यंत चिंतेचा विषय आहे. यासाठी लेखात दिलेली माहिती वाचा आणि वेळीच सावध व्हा!

आजकालच्या मुलांचे आदर्श (Role Models) पुस्तकात किंवा इतिहासात नसून इन्स्टाग्राम आणि यूट्यूबच्या पडद्यावर आहेत. पण हे 'डिजिटल' आदर्श मुलांना खऱ्या आयुष्यापासून दूर नेऊन एका काल्पनिक जगात ढकलत आहेत. तीच बाब प्रौढ नागरिकांची! 'दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं' ही म्हण माहीत असूनही आपण त्या दिखाव्याला भुलतो आणि आपल्याही नकळत रील आणि रिअल लाईफची तुलना करत अस्वस्थ होतो. यासाठी पुढील मुद्दे लक्षात ठेवा. 

१. 'अवास्तव' सौंदर्याची खोटी व्याख्या

इन्फ्लुएन्सर्स त्यांचे फोटो पोस्ट करण्यापूर्वी शेकडो फिल्टर्स आणि एडिटिंग ॲप्सचा वापर करतात. नितळ त्वचा, परफेक्ट फिगर आणि नेहमीच आनंदी दिसणारा चेहरा हे वास्तव नसते. मात्र, मुलींना वाटते की हेच 'खरे' सौंदर्य आहे. जेव्हा त्या स्वतःला आरशात पाहतात, तेव्हा त्यांना स्वतःमध्ये त्रुटी दिसू लागतात, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास डळमळीत होतो.

२. तुलना करण्याची जीवघेणी सवय

सोशल मीडिया म्हणजे इतरांच्या 'हायलाईट रील'ची तुलना स्वतःच्या 'बिहाइंड द सीन्स'शी करणे होय. इन्फ्लुएन्सरचे महागडे कपडे, परदेश दौरे आणि चैनीचे आयुष्य पाहून मुलींना स्वतःचे आयुष्य सामान्य किंवा अपुरे वाटू लागते. यातूनच नैराश्य (Depression) आणि ईर्ष्या निर्माण होते.

३. बॉडी इमेज आणि खाण्याच्या विकृती (Eating Disorders)

"बारीक असणे म्हणजेच सुंदर असणे" हा संदेश सोशल मीडियावरून सतत दिला जातो. यामुळे मुलींमध्ये स्वतःच्या शरीराबद्दल तिरस्कार निर्माण होतो. वजन कमी करण्यासाठी चुकीचे डाएट करणे किंवा स्वतःला उपाशी ठेवणे यांसारख्या सवयी (उदा. Anorexia) बळावू लागतात, ज्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.

४. उपभोगवादाचा (Materialism) विळखा

इन्फ्लुएन्सर्स हे प्रामुख्याने ब्रँड्सचे प्रमोशन करत असतात. "हे सौंदर्य प्रसाधन वापरले तरच तुम्ही सुंदर दिसाल" किंवा "हा मोबाईल असेल तरच तुम्ही कूल आहात" असा मानसिक दबाव मुलींवर टाकला जातो. यामुळे साध्या राहणीमानाबद्दल मुलींमध्ये न्यूनगंड निर्माण होतो.

पालकांसाठी आणि किशोरवयीन मुलींसाठी काही महत्त्वाच्या टिप्स:

डिजिटल साक्षरता: मुलींना हे समजून सांगा की सोशल मीडियावर जे दिसते ते ९०% वेळा एडिटिंगचा कमाल असतो आणि तुम्ही सुद्धा हे लक्षात ठेवा. 

फॉलो लिस्ट तपासा: जे इन्फ्लुएन्सर्स नकारात्मकता पसरवतात किंवा शरीराबद्दल चुकीच्या धारणा निर्माण करतात, त्यांना अनफॉलो करा. 'बॉडी पॉझिटिव्हिटी' पसरवणाऱ्या लोकांना फॉलो करा.

स्क्रीन टाइम मर्यादा: दिवसातील काही तास मोबाईलपासून पूर्णपणे दूर (Digital Detox) राहण्याची सवय लावा.

संवाद साधा: मुलींच्या मनातील भीती किंवा न्यूनगंड समजून घेण्यासाठी त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संवाद साधा.

मोबाईल आधीचे आणि नंतरचे जग पूर्णतः बदलले आहे. संवादाची माध्यमं अनेक आली तरी प्रत्यक्ष संवाद संपुष्टात येत आहे. अशा वेळी संवादाची दरी भरून काढण्यासाठी आपण पुढे सरसावुया. मुलांना बोलते करून त्यांना रील नाही तर रिअल लाईफही किती आनंददायी होऊ शकते याची जाणीव देऊया आणि आपणही त्याचे भान ठेवूया.

Web Title : सोशल मीडिया फिल्टर आत्मसम्मान को कम करते हैं, हीन भावना पैदा करते हैं!

Web Summary : सोशल मीडिया के अवास्तविक सौंदर्य मानक और प्रभावशाली संस्कृति आत्म-छवि पर नकारात्मक प्रभाव डालते हैं, खासकर युवा लड़कियों के बीच। तुलना, शारीरिक छवि के मुद्दे और भौतिकवाद अवसाद और खाने के विकारों को बढ़ावा देते हैं। डिजिटल साक्षरता और खुला संचार महत्वपूर्ण हैं।

Web Title : Social media filters erode self-esteem, creating inferiority complexes: Be Aware!

Web Summary : Social media's unrealistic beauty standards and influencer culture negatively impact self-image, especially among young girls. Comparison, body image issues, and materialism fuel depression and eating disorders. Digital literacy and open communication are crucial.