Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > कोणत्या उन्हात थोडा वेळ गेलं तर व्हिटामीन D पुरेपूर मिळते-पाहा उन्हात किती वाजता जायचं

कोणत्या उन्हात थोडा वेळ गेलं तर व्हिटामीन D पुरेपूर मिळते-पाहा उन्हात किती वाजता जायचं

Which Hour Of Sun Is Best For Vitamin D : उन्हात बसण्याची योग्यवेळ कोणती, फायदे  याबाबत अधिक माहिती समजून घेऊ.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 12:44 IST2026-04-19T12:22:45+5:302026-04-19T12:44:05+5:30

Which Hour Of Sun Is Best For Vitamin D : उन्हात बसण्याची योग्यवेळ कोणती, फायदे  याबाबत अधिक माहिती समजून घेऊ.

Which Time Sunlight Is Good For Vitamin D For Adults Vitamin D Health Tips | कोणत्या उन्हात थोडा वेळ गेलं तर व्हिटामीन D पुरेपूर मिळते-पाहा उन्हात किती वाजता जायचं

कोणत्या उन्हात थोडा वेळ गेलं तर व्हिटामीन D पुरेपूर मिळते-पाहा उन्हात किती वाजता जायचं

तुम्हालाही सतत थकवा येणं, हाडांमध्ये वेदना जाणवण असतील तर शरीरात व्हिटामीन डी ची कमतरता असू शकते. तुम्ही कितीही हेल्दी असाल तरीही व्हिटामीन  डी ची कमतरता ही समस्या उद्भवू शकते. उन्हात बसल्यानं व्हिटामीन डी मिळते पण कोणत्यावेळी उन्हात जावे, कितीवेळ उन्हात जावे याबाबत लोकांना कल्पना नसते. उन्हात बसण्याची योग्यवेळ कोणती, फायदे  याबाबत अधिक माहिती समजून घेऊ. (Which Hour Of Sun Is Best For Vitamin D)

व्हिटामीन डी साठी उन्हात जाण्याची योग्य वेळ कोणती? (Which Time Sunlight Is Good For Vitamin D)

फोर्टीस हेल्थ केअर एक्सपर्ट्सच्यामते सकाळी १० ते दुपारी २ ही वेळ व्हिटामीन डी मिळवण्यासाठी सर्वात परिणामकारक मानली जाते. या वेळेत सुर्याची किरणं युव्हीबी रेज सर्वात जास्त असतात. ही किरणं त्वचेत व्हिटामीन डी निर्माण करतात. कमी वेळेत शरीराला जास्त व्हिटामीन डी मिळते. सकाळी खूप लवकर जर तुम्ही उन्हात गेलात किंवा संध्याकाळी गेलात तर व्हिटामीन डी तयार होत नाही कारण यावेळी युव्हीबी किरणं कमजोर असतात. १५ ते ३० मिनिटं रोज उन्हात बसायला हवं. उन्हात हात, पाय, मान, पाठ हे अवयव असायलाच हवेत. उन्हात जाण्याआधी सनस्क्रीन लावायला विसरू नका. (Ref)

व्हिटामीन डी चे फायदे (Benefits Of Vitamin D)

 हाडं, दात मजबूत होतात. कॅल्शियमचे अधिक मिळण्यास मदत होते, इम्युनिटी वाढते, डिप्रेशन आणि मूड स्विंग्स कमी होतात. मांसपेशींची ची कमजोरी कमी होते.लहान मुलं आणि वयस्कर लोकांना ऑस्टिओपोरोसिसपासून बचाव होण्यास मदत होते. 

व्हिटामीन डी च्या कमतरतेची लक्षणं (Symptoms Of Vitamin D Defficiency )

सतत थकवा येतो, हाडांमध्ये आणि सांध्यांमध्ये वेदना होतात, केस गळतात, सतत सर्दी-खोकला होतो, चिडचिड होते तुम्हालाही ही लक्षणं दिसत असतील तर त्वरीत तपासणी करून घ्या.


 
लाईफस्टाईल टिप्स

रोज थोडावेळ उन्हात फिरा, शरीराला मॉर्निंग वॉकची सवय लावा, ऊन घेताना मोबाईलपासून दूर राहा, व्हिटामीन डी रिच पदार्थ खा, जास्त जाड कपडे उन्हात घालू नका. 

मेडीकल ट्रिटमेंट्सचे पर्याय

व्हिटामीन डी-३ सप्लीमेंटस, कॅल्शियम आणि व्हिटामीन डी टॅबलेट, इंजेक्शन, नियमित व्हिटामीन डी ब्लड टेस्ट. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही सप्लिमेंट्स घेऊ नका.

Web Title : विटामिन डी के लिए सबसे अच्छी धूप का समय: इसे ठीक से कैसे अवशोषित करें।

Web Summary : विटामिन डी के लिए सुबह 10 बजे से दोपहर 2 बजे के बीच की धूप सबसे अच्छी होती है। 15-30 मिनट के लिए अंगों को उजागर करें, पहले सनस्क्रीन से बचें। विटामिन डी हड्डियों को मजबूत करता है, प्रतिरक्षा को बढ़ाता है और अवसाद को कम करता है। कमी के लक्षणों में थकान और जोड़ों का दर्द शामिल है। जीवनशैली युक्तियाँ: धूप में चलें और विटामिन से भरपूर खाद्य पदार्थ खाएं।

Web Title : Best sunlight time for Vitamin D: How to absorb it properly.

Web Summary : Sunlight between 10 AM and 2 PM is optimal for Vitamin D. Expose limbs for 15-30 minutes, avoiding sunscreen beforehand. Vitamin D strengthens bones, boosts immunity, and reduces depression. Deficiency symptoms include fatigue and joint pain. Lifestyle tips: walk in the sun and eat vitamin-rich foods.