Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > वय २० असो की ३५-बायकांना हमखास छळतात ५ समस्या, जगणं मुश्किल होतं कारण..

वय २० असो की ३५-बायकांना हमखास छळतात ५ समस्या, जगणं मुश्किल होतं कारण..

These are 5 common deficiencies that occur in women, reasons and remedies : महिलांमध्ये या कमतरता जास्त आढळतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2026 08:15 IST2026-05-13T08:10:10+5:302026-05-13T08:15:02+5:30

These are 5 common deficiencies that occur in women, reasons and remedies : महिलांमध्ये या कमतरता जास्त आढळतात.

These are 5 common deficiencies that occur in women, reasons and remedies | वय २० असो की ३५-बायकांना हमखास छळतात ५ समस्या, जगणं मुश्किल होतं कारण..

वय २० असो की ३५-बायकांना हमखास छळतात ५ समस्या, जगणं मुश्किल होतं कारण..

महिलांच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर अनेक बदल होत असतात. मासिक पाळी, गर्भधारणा, प्रसूती, वाढते वय आणि सततची धावपळ यामुळे शरीराला अधिक पोषणाची गरज असते. मात्र व्यस्त जीवनशैली, अपुरी झोप, चुकीचा आहार किंवा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष यामुळे अनेक महिलांमध्ये काही पोषक घटकांची कमतरता दिसून येते. (These are 5 common deficiencies that occur in women, reasons and remedies )सुरुवातीला साधा थकवा किंवा अशक्तपणा जाणवतो मात्र या गोष्टी पुढे मोठा त्रास देऊ शकतात. त्यामुळे महिलांमध्ये सामान्यपणे आढळणाऱ्या काही कमतरतांबद्दल माहिती असणे महत्त्वाचे ठरते.

आयर्नची कमतरता ही महिलांमध्ये सर्वात जास्त दिसून येणार्‍या समस्यांपैकी एक मानली जाते. शरीरात आयर्न कमी झाल्यास अशक्तपणा, चक्कर येणे, सतत थकवा जाणवणे किंवा त्वचा फिकट दिसणे अशी लक्षणे जाणवू शकतात. मासिक पाळीमुळे शरीरातून रक्तस्राव होत असल्याने अनेक महिलांमध्ये ही समस्या अधिक दिसते.

व्हिटामिन 'डी'ची कमतरताही मोठ्या प्रमाणात आढळते. बराच वेळ घरात राहणे, सूर्यप्रकाश कमी मिळणे किंवा आहारातील कमतरता यामुळे शरीरात व्हिटामिन डी कमी होऊ शकते. त्यामुळे हाडे दुखणे, स्नायूंमध्ये कमकुवतता किंवा थकवा जाणवू शकतो. ही कमतरता दीर्घकाळ राहिल्यास हाडांवर परिणाम होण्याची शक्यता असते.

कॅल्शियमची कमतरता महिलांसाठी त्रासदायक ठरु शकते. वाढत्या वयानुसार हाडे कमकुवत होण्याचा धोका वाढतो. विशेषतः प्रसूतीनंतर किंवा मेनोपॉजनंतर काही महिलांमध्ये ही समस्या अधिक जाणवू शकते. त्यामुळे दूध, दही, तीळ, पालेभाज्या यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करणे महत्त्वाचे मानले जाते.

व्हिटामिन B12 ची कमतरता असल्यास शरीरात अशक्तपणा, हात-पाय सुन्न होणे, लक्ष केंद्रित न होणे किंवा सतत थकल्यासारखे वाटणे अशी लक्षणे दिसू शकतात. सतत बाहेरचे खाणे, अपुरा आहार किंवा काही विशिष्ट जीवनशैलीमुळे ही समस्या वाढू शकते.

प्रोटीनची कमतरताही अनेक महिलांमध्ये दिसून येते. शरीरातील स्नायू, त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यासाठी प्रोटीन महत्त्वाचे असते. प्रोटीन कमी मिळाल्यास केस गळणे, त्वचा निस्तेज दिसणे किंवा शरीरात अशक्तपणा जाणवू शकतो.
महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे वेळेवर लक्ष देणे खूप गरजेचे आहे. सततचा थकवा किंवा वेदना दुर्लक्षित करण्याऐवजी योग्य आहार, पुरेशी झोप आणि नियमित तपासण्या यांना महत्त्व दिल्यास अशा कमतरता टाळण्यास मदत होऊ शकते. शरीर निरोगी राहिल्यास दैनंदिन कामेही अधिक उत्साहाने करता येतात.

Web Title : महिलाओं में 5 आम कमियाँ: कारण, लक्षण और रोकथाम

Web Summary : महिलाओं में अक्सर आयरन, विटामिन डी, कैल्शियम, बी12 और प्रोटीन की कमी जीवनशैली के कारण होती है। इन कमियों से थकान, कमजोरी और हड्डियों की समस्या हो सकती है। संतुलित आहार, पर्याप्त आराम और नियमित जांच रोकथाम और समग्र स्वास्थ्य के लिए महत्वपूर्ण हैं।

Web Title : 5 Common Deficiencies in Women: Causes, Symptoms, and Prevention

Web Summary : Women often face deficiencies in iron, vitamin D, calcium, B12, and protein due to lifestyle factors. These deficiencies can lead to fatigue, weakness, and bone problems. A balanced diet, sufficient rest, and regular check-ups are crucial for prevention and maintaining overall health.