Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > एसीचं तापमान ‘किती’ ठेवताय? एसीच्या आजारांनी अनेकजण हैराण-तात्पुरता थंडावा आणि कायमची अंगदुखी

एसीचं तापमान ‘किती’ ठेवताय? एसीच्या आजारांनी अनेकजण हैराण-तात्पुरता थंडावा आणि कायमची अंगदुखी

Temporary relief and permanent body pain, Never Do these mistakes while using AC : एसी वापरताना अजिबात करु नका या चुका, आरोग्यासाठी वाईट.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2026 13:19 IST2026-05-15T13:18:20+5:302026-05-15T13:19:24+5:30

Temporary relief and permanent body pain, Never Do these mistakes while using AC : एसी वापरताना अजिबात करु नका या चुका, आरोग्यासाठी वाईट.

Temporary relief and permanent body pain, Never Do these mistakes while using AC | एसीचं तापमान ‘किती’ ठेवताय? एसीच्या आजारांनी अनेकजण हैराण-तात्पुरता थंडावा आणि कायमची अंगदुखी

एसीचं तापमान ‘किती’ ठेवताय? एसीच्या आजारांनी अनेकजण हैराण-तात्पुरता थंडावा आणि कायमची अंगदुखी

उन्हाळा सुरू झाला की एसीशिवाय राहणं अनेकांना कठीण वाटतं. घर, ऑफिस, गाडी अशा सगळीकडे एसीचा वापर वाढलेला दिसतो. काही लोक तर दिवसातील अनेक तास एसीमध्येच घालवतात. एसीमुळे उकाड्यापासून आराम मिळतो, काम करताना थकवा कमी जाणवतो आणि झोपही शांत लागते. (Temporary relief and permanent body pain, Never Do these mistakes while using AC)मात्र कोणतीही गोष्ट जास्त प्रमाणात वापरली तर तिचे दुष्परिणाम दिसू लागतात. एसीचंही तसंच आहे. सतत थंड वातावरणात राहिल्याने शरीरावर आणि आरोग्यावर काही परिणाम होऊ शकतात.

एसीमुळे हवेतला ओलावा कमी होतो. त्यामुळे त्वचा कोरडी पडणे, ओठ फुटणे, डोळ्यांची आग होणे असे त्रास अनेकांना जाणवतात. काही लोकांना सतत एसीमध्ये राहिल्यावर डोकेदुखी किंवा अंगदुखीचा त्रासही सुरू होतो. शरीराला नैसर्गिक तापमानाची सवय राहत नाही आणि बाहेरच्या उष्ण हवेत गेल्यावर अस्वस्थ वाटू लागतं. विशेषतः लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि ऍलर्जी किंवा दम्याचा त्रास असलेल्या लोकांनी याबाबत अधिक काळजी घेणं गरजेचं असतं.

एसीचे फिल्टर वेळेवर स्वच्छ न केल्यास धूळ, बुरशी आणि जंतू हवेत मिसळू शकतात. अशा हवेमुळे श्वसनाच्या समस्या वाढण्याची शक्यता असते. अनेकदा घसा बसणे, शिंक येणे, सर्दी होणे किंवा सतत खोकला येणे यामागे सततचा एसीही कारणीभूत ठरतो. काही लोकांना खूप थंड वातावरणामुळे सांधेदुखी किंवा स्नायूंमध्ये ताण जाणवतो. अंगदुखीचा त्रास एसीमुळे कोणत्याही वयातील माणसाला होतोच. त्यामुळे एसी कमी वापरण गरजेचं आहे. 

मात्र याचा अर्थ एसी वापरूच नये असा नाही. योग्य पद्धतीने वापरल्यास एसीचा त्रास टाळता येऊ शकतो. एसीचे तापमान खूप कमी ठेवण्याऐवजी साधारण २४ ते २६ अंशांदरम्यान ठेवणे अधिक योग्य मानले जाते. खूप थंड वातावरण शरीरासाठी अचानक बदल निर्माण करू शकतं. तसेच दिवसभर एसीमध्ये बसण्याऐवजी मध्ये मध्ये नैसर्गिक हवा घेणंही आवश्यक आहे.

उन्हातून आल्यावर लगेच खूप थंड एसीमध्ये बसू नये. शरीराला काही मिनिटे सामान्य तापमानाशी जुळवून घेऊ द्यावं. तसेच एसीची नियमित स्वच्छता आणि सर्व्हिसिंग केल्यास हवा स्वच्छ राहते आणि आरोग्याच्या तक्रारी कमी होण्यास मदत होते.

Web Title : एसी का तापमान: गर्मियों में अत्यधिक एसी उपयोग के स्वास्थ्य जोखिम।

Web Summary : अत्यधिक एसी के उपयोग से त्वचा में सूखापन, सिरदर्द और सांस की समस्या हो सकती है। स्वास्थ्य जोखिमों को कम करने के लिए 24-26 डिग्री सेल्सियस के बीच तापमान बनाए रखें, ताजी हवा के लिए ब्रेक लें और नियमित रूप से एसी की सर्विसिंग कराएं।

Web Title : AC temperature: Health risks of excessive AC use in summer.

Web Summary : Excessive AC use can cause dry skin, headaches, and respiratory issues. Maintain a temperature between 24-26 degrees Celsius, take breaks for fresh air, and ensure regular AC servicing to minimize health risks.