दिवसभराची धावपळ, उभं राहणं, कामाचा ताण या सगळ्यामुळे पाय थकतात आणि शरीरही दमून जातं. अशा वेळी एक साधा आणि घरच्या घरी करता येणारा उपाय म्हणजे मीठाच्या कोमट पाण्यात पाय बुडवणे. हा उपाय जितका सोपा आहे तितकाच परिणामकारकही आहे, आणि अनेक छोट्या तक्रारींवर आराम देतो. ()गरम पाण्यात पाय बुडवणे आरोग्यासाठी चांगले असते. पण त्या पाण्यात जर थोडं जाडं मीठ घातलं तर त्याचा फायदा दुप्पट होईल. कारण हे मीठ पायातून शरीरात पटकन शोषलं जातं. त्याचा फायदा विविध प्रकारे होतो.
मीठाच्या पाण्यात पाय बुडवल्याने सर्वात मोठा फायदा म्हणजे शरीराला मिळणारी विश्रांती. कोमट पाण्याची उब आणि मीठाचे गुणधर्म यामुळे स्नायू सैल होतात, पायांमधील ताण कमी होतो आणि थकवा दूर होतो. दिवसभर उभं राहणाऱ्यांसाठी हा उपाय विशेषतः उपयुक्त ठरतो. तळवे दुखत असतील किंवा पायांवर ताण आला असेल तर आराम मिळतो आणि ठणकणारे पाय शांत होतात.
या पाण्यामुळे फार छान आणि चांगली झोप लागण्यासही मदत होते. झोपण्यापूर्वी १० ते १५ मिनिटे पाय मीठाच्या पाण्यात ठेवले तर शरीर रिलॅक्स होतं, मन शांत होतं आणि झोप खोल लागते. अनिद्रा किंवा बेचैनी असणाऱ्यांनी हा उपाय करून पाहावा. झोपेवर फायद्याचा ठरतो.
सांधेदुखी आणि पायातील वेदना कमी करण्यासाठीही हा उपाय फायदेशीर आहे. कोमट पाणी आणि मीठामुळे रक्ताभिसरण सुधारतं, सूज कमी होते आणि वेदनांपांसून आराम मिळतो. विशेषतः टाचा दुखणे किंवा पाय सुजणे अशा समस्यांमध्ये हा उपाय उपयोगी पडतो. रक्ताभिसरण सुधारले की अनेक समस्या सुधारतात.
त्वचेसाठीही हा उपाय चांगला आहे. पायांवरील मृत त्वचा निघून जाते. पायाची त्वचा मऊ होते, घाण निघून जाते आणि त्वचा स्वच्छ व मऊ दिसते. नियमित केल्यास टाचा फुटण्याची समस्या कमी होण्यास मदत होते. तसेच पाय सुंदर होतात. याशिवाय, पायांना येणारी दुर्गंधी कमी करण्यासाठीही मीठाचं पाणी उपयुक्त ठरतं. बॅक्टेरिया कमी होतात आणि पाय ठणठणीत वाटतात.
