Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > अशक्तपणा जाणवतो-थकवा येतो? ५ गोष्टी करा, व्हिटामीन-D भराभर वाढेल-टवटवीत राहाल

अशक्तपणा जाणवतो-थकवा येतो? ५ गोष्टी करा, व्हिटामीन-D भराभर वाढेल-टवटवीत राहाल

How To Increase Vitamin D In Body : सतत थकवा येणं, अशक्तपणा जाणवतो, पाठीत सांध्यांमध्ये आणि हाडांमध्ये सतत वेदना होतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 12:46 IST2026-05-19T12:02:47+5:302026-05-19T12:46:28+5:30

How To Increase Vitamin D In Body : सतत थकवा येणं, अशक्तपणा जाणवतो, पाठीत सांध्यांमध्ये आणि हाडांमध्ये सतत वेदना होतात.

How To Increase Vitamin D In Body : 5 Ways To Increase Vitamin D In Body Naturally | अशक्तपणा जाणवतो-थकवा येतो? ५ गोष्टी करा, व्हिटामीन-D भराभर वाढेल-टवटवीत राहाल

अशक्तपणा जाणवतो-थकवा येतो? ५ गोष्टी करा, व्हिटामीन-D भराभर वाढेल-टवटवीत राहाल

व्हिटामीन डी (Vitamin D)शरीरातील एक महत्त्वाचा भाग आहे.  आहारात काही पदार्थांचा समावेश करून तुम्ही व्हिटामीन डी ची कमतरता भरून काढू शकता. याव्यतिरिक्त आहारात बदल, व्यायाम आणि प्राकृतिक सप्लिमेंट्चा आहारात समावेश करून तुम्ही व्हिटामीन्सची कमतरता पूर्ण करू शकता. (How To Increase Vitamin D In Body)

शरीरात व्हिटामीन डी ची कमतरता असल्यास कोणती लक्षणं जाणवतात?  (Symptoms Of Vitamin D- Deficiency)

सतत थकवा येणं, अशक्तपणा जाणवतो, पाठीत सांध्यांमध्ये आणि हाडांमध्ये सतत वेदना होतात. केस खूप जास्त प्रमाणात गळतात. जखम लवकर बरी होत नाही, वारंवार आजारी पडण्याचा धोका उद्भवतो.

व्हिटामीन डी ची कमतरता कशी पूर्ण करावी? (5 Ways To Increase Vitamin D In Body Naturally)

1) सुर्यप्रकाश हा व्हिटामीन डी चा सर्वात मोठा आणि मोफत स्त्रोत आहे. आपलं शरीर स्वत:हून अन्नातून पुरेसं व्हिटामीन डी बनवू शकत नाही. जोपर्यंत त्याला सुर्यप्रकाश मिळत नाही. यासाठी दररोज सकाळी किंवा संध्याकाळी कोवळ्या उन्हात  १५ ते २० मिनिटं बसायला हवं. रोज सकाळी १० ते ३ या दरम्यान  १५ ते २० मिनिटांसाठी उन्हात बसा. उन्हात हात आणि चेहरा ठेवल्यानं त्वचा प्राकृतिक स्वरूपात व्हिटामीन डी तयार करते.

2) मशरूम उन्हाच्या आणि युव्ही किरणांच्या संपर्कात येतात. त्यामुळे मशरूम खाल्ल्यानं व्हिटामीन डी ची कमतरता पूर्ण होण्यास मदत होते. 

3) शाकाहारी लोकांनी व्हिटामीन डी युक्त फोर्टीफाईड खाद्यपदार्थ जसं की दूध, दही, ओट्स, संत्री या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा.

4) पनीर आणि चीज यामध्ये कॅल्शियमसोबतच थोडे व्हिटामीन डी देखील असते. मर्यादीत प्रमाणात स्वंयपाकात या पदार्थांचा वापर फायदेशीर ठरू शकतो. तुमच्या शरीरात व्हिटामीन डी ची खूपच जास्त कमतरता असेल तर फक्त अन्नातून ती भरून काढणं कठीण होतं अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानं व्हिटामीन डी चे सप्लिमेंट्स घेणं हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे.  (Ref)

5) अनेक अभ्यासांतून असं दिसून आलं आहे की १०० टक्के शाकाहारी अन्नातून शरीराची व्हिटामीन डी ची कमतरता पूर्ण करणं कठीण असतं, म्हणून वर्षातून एकदा व्हिटामीन डी ची रक्त तपासणी करून घ्या.  डॉक्टरांच्या सल्ल्यानं व्हिटामीन डी-३ चे सॅशे किंवा गोळ्या सुरू करा. या गोळ्या सहसा आठवड्यातून एकदा दुधासोबत घ्या. 

Web Title : कमजोरी और थकान महसूस हो रही है? विटामिन डी बढ़ाने के 5 तरीके।

Web Summary : विटामिन डी की कमी से थकान और जोड़ों में दर्द होता है। धूप, मशरूम, फोर्टिफाइड खाद्य पदार्थ और सीमित पनीर का सेवन मदद कर सकता है। सप्लीमेंट्स और वार्षिक रक्त परीक्षण के लिए डॉक्टर से परामर्श लें।

Web Title : Feeling weak and tired? 5 ways to boost Vitamin D.

Web Summary : Vitamin D deficiency causes fatigue and joint pain. Sunlight, mushrooms, fortified foods, and limited cheese intake can help. Consult a doctor for supplements and annual blood tests.