Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Gardening > इवलंसं मोगऱ्याचं रोपंही कळ्या आणि फुलांनी लगडेल, बटाट्याच्या सालीचा घरगुती उपाय - घरभर दरवळेल सुगंध...

इवलंसं मोगऱ्याचं रोपंही कळ्या आणि फुलांनी लगडेल, बटाट्याच्या सालीचा घरगुती उपाय - घरभर दरवळेल सुगंध...

how to use potato peels to increase mogra flowers : potato peel fertilizer for mogra plant at home : मोगऱ्याच्या रोपासाठी बटाट्याच्या सालीच पाणी आहे 'मॅजिकल टॉनिक', करुन पाहा हा उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2026 10:30 IST2026-04-30T10:21:13+5:302026-04-30T10:30:25+5:30

how to use potato peels to increase mogra flowers : potato peel fertilizer for mogra plant at home : मोगऱ्याच्या रोपासाठी बटाट्याच्या सालीच पाणी आहे 'मॅजिकल टॉनिक', करुन पाहा हा उपाय...

how to use potato peels to increase mogra flowers natural ways to get more flowers in mogra plant | इवलंसं मोगऱ्याचं रोपंही कळ्या आणि फुलांनी लगडेल, बटाट्याच्या सालीचा घरगुती उपाय - घरभर दरवळेल सुगंध...

इवलंसं मोगऱ्याचं रोपंही कळ्या आणि फुलांनी लगडेल, बटाट्याच्या सालीचा घरगुती उपाय - घरभर दरवळेल सुगंध...

अंगणात दरवळणारा मोगऱ्याचा मंद सुगंध... हे सुख काही वेगळंच असतं! आपल्यापैकी बहुतेकजणांच्या घराच्या अंगणात किंवा गार्डनमध्ये मोगऱ्याच रोपं असतचं, आपण अगदी मोठ्या हौसेने मोगऱ्याच रोप लावून त्याची तितकीच काळजी देखील घेतो. मोगऱ्याचं रोप लावणं सोपं आहे, पण त्याला पांढऱ्याशुभ्र कळ्यांनी बहरलेलं पाहण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. अनेकदा आपण मोगऱ्याच्या रोपाची खूप काळजी घेतो वेळच्यावेळी खतं घालतो, पाणी देतो, तरीही मोगऱ्याच्या रोपाला कळ्या - फुल येतंच नाहीत(how to use potato peels to increase mogra flowers).

मोगऱ्याच्या रोपाला कळ्या किंवा फुलं येत नसतील तर सगळाच उत्साहच कमी होतो. योग्य प्रमाणांत पाणी, सूर्यप्रकाश आणि काळजी घेत असूनही काही वेळा मोगरा फुलत नाही. अशा वेळी महागडी खतं वापरण्याऐवजी घरात सहज मिळणाऱ्या पदार्थांचा उपयोग करूनही रोप कळ्या - फुलांनी बहरुन जाते. स्वयंपाकघरातील एक खास पदार्थ म्हणजेच, बटाट्याची साल जिला आपण कचरा समजून फेकून देतो, ती मोगऱ्यासाठी 'जादुई टॉनिक' ठरू शकते. मोगऱ्याच्या कळ्या - फुलांची (natural ways to get more flowers in mogra plant) संख्या दुप्पट करणारा हा घरगुती उपाय नक्की काय आहे? ते पाहूयात. 

मोगऱ्याच्या रोपासाठी बटाट्याच्या सालींचं पाणी घाला... 

मोगऱ्याच्या रोपाला भरपूर कळ्या आणि फुलं यावीत यासाठी मातीमध्ये योग्य पोषण असणं खूप गरजेचं आहे. बटाट्याच्या सालींमध्ये पोटॅशियम, फॉस्फरस आणि इतर सूक्ष्म पोषकद्रव्ये असतात, जे झाडांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे बटाट्याच्या सालींचं पाणी हे एक नैसर्गिक खत म्हणून काम करतं. जर तुमच्या मोगऱ्याच्या रोपाला कळ्या (easy method to make potato peel water for plants) येत नसतील किंवा त्या लगेच गळून पडत असतील, तर त्या रोपाला पोषक तत्वांचा अभाव असू शकतो. बटाट्याच्या सालीचं पाणी हे एक असं नैसर्गिक खत आहे जे रोपाला झटकन बुस्ट देतं. अगदी शून्य खर्चात मोगऱ्याला असंख्य कळ्या - फुल येण्यासाठी बटाटाच्या सालीचे पाणी अत्यंत फायदेशीर ठरते. 

वेटलॉस करताना आंबा खा मनसोक्त! दिवसाला किती आणि कधी आंबा खावा? पोटभर खाऊनही वाढणार नाही वजन... 

ना जिम ना डाएट, म्हातारेही दिसतात तरुण, जपानी लोकांच्या ५ सवयी म्हणजे दीर्घायुष्य आणि तारुण्याचं वरदान...

मोगऱ्याच्या रोपासाठी बटाट्याच्या सालीच पाणी कसं तयार करावं?

बटाट्याच्या साली स्वच्छ धुऊन घ्या, जेणेकरून त्यावरची माती किंवा घाण निघून जाईल. नंतर या साली एका भांड्यात घालून त्यात पाणी टाका. भांडं झाकून साधारण २४ ते ४८ तास सावलीत ठेवून द्या. दोन दिवसांनंतर पाणी गाळून घ्या. पाण्याचा रंग थोडा बदललेला दिसेल. तुमचे 'लिक्विड फर्टिलायझर' तयार आहे.

रोपासाठी कसं वापरावं?

तयार केलेलं पाणी थेट रोपाच्या मुळांजवळ ओतावं. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास चांगले परिणाम दिसून येतात. मात्र, जास्त प्रमाणात वापर टाळावा, कारण माती खूप ओलसर होऊ शकते. सालींवर मीठ किंवा मसाले नसावेत, त्यामुळे स्वच्छ सालींचाच वापर करा. पाणी वापरण्यापूर्वी ते पूर्ण थंड झालं आहे याची खात्री करा. तसेच, नियमित पाणी देणं आणि सूर्यप्रकाश मिळणंही तितकंच महत्त्वाचं आहे. पाणी देण्यापूर्वी मोगऱ्याच्या कुंडीतील माती थोडी वर-खाली  करून घ्या. तयार केलेलं बटाट्याचं पाणी थेट रोपाच्या मुळाशी द्या. एका मध्यम कुंडीसाठी १ कप पाणी पुरेसं आहे. हे पाणी शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर द्यावे.

बटाट्याच्या सालीच्या पाण्याचे फायदे...

बटाट्याच्या सालीमध्ये पोटॅशियम भरपूर असतं, जे फुलांच्या वाढीसाठी सर्वात महत्त्वाचं घटक आहे. यात मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन्स असतात, ज्यामुळे रोपाची प्रतिकारशक्ती वाढते. हे पाणी पूर्णपणे सेंद्रिय असल्यामुळे झाडाला कोणताही धोका नसतो आणि मातीचा कस सुधारतो. यामुळे रोपाची मुळं मजबूत होतात, परिणामी कळ्या - फुलं गळण्याचं प्रमाण कमी होतं. बटाट्याच्या सालींच्या पाण्यामुळे मातीची सुपीकता वाढते आणि मुळांना आवश्यक पोषण मिळतं. यामुळे रोपाची वाढ चांगली होते आणि नवीन कळ्या तयार होण्यास मदत होते. पोटॅशियममुळे फुलांची गुणवत्ता सुधारते आणि फुलं अधिक तजेलदार दिसतात. याशिवाय, हा उपाय पूर्णपणे नैसर्गिक असल्यामुळे झाडांवर कोणताही दुष्परिणाम होत नाही.

स्वयंपाकघरातील टाकाऊ वस्तूंचा असा वापर करून तुम्ही तुमची बाग हिरवीगार आणि सुवासिक करू शकता. नैसर्गिक आणि सोप्या उपायांनी मोगऱ्याच्या रोपाला भरपूर कळ्या आणि सुंदर फुलं येण्यासाठी बटाट्याच्या सालींचं पाणी नक्कीच उपयुक्त ठरू शकतं.

Web Title : आलू के छिलके: मोगरा के पौधे को फूलों से भरने का राज।

Web Summary : आलू के छिलके के पानी से मोगरा के फूलों की भरमार पाएं! यह प्राकृतिक उर्वरक, पोटेशियम और फास्फोरस से भरपूर, जड़ों को मजबूत करता है, विकास को बढ़ावा देता है और फूलों का उत्पादन दोगुना करता है। बनाने और उपयोग में आसान, यह रसोई के कचरे को एक शक्तिशाली पौधे टॉनिक में बदल देता है।

Web Title : Potato peels: The secret to a Mogra plant bursting with flowers.

Web Summary : Unlock abundant Mogra blooms with potato peel water! This natural fertilizer, rich in potassium and phosphorus, strengthens roots, boosts growth, and doubles flower production. Easy to make and use, it transforms kitchen waste into a potent plant tonic.