Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > भारतात पिकणारा सगळ्यात महाग सुकामेवा कोणता? ना काजू ना बदाम , हा आहे सुकामेव्याचा सरताज

भारतात पिकणारा सगळ्यात महाग सुकामेवा कोणता? ना काजू ना बदाम , हा आहे सुकामेव्याचा सरताज

Which is the most expensive dry fruit grown in India? Neither cashew nor almond : हा सुकामेवा आहे सगळ्यात महाग.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2026 17:29 IST2026-03-02T17:24:27+5:302026-03-02T17:29:17+5:30

Which is the most expensive dry fruit grown in India? Neither cashew nor almond : हा सुकामेवा आहे सगळ्यात महाग.

Which is the most expensive dry fruit grown in India? Neither cashew nor almond | भारतात पिकणारा सगळ्यात महाग सुकामेवा कोणता? ना काजू ना बदाम , हा आहे सुकामेव्याचा सरताज

भारतात पिकणारा सगळ्यात महाग सुकामेवा कोणता? ना काजू ना बदाम , हा आहे सुकामेव्याचा सरताज

सुकामेवा म्हटलं की महागच. काजू , बदाम, पिस्ता फार पौष्टिक असतात. मात्र विकत घ्यायचे म्हणजे महाग असतात. तरी काजू आणि बदाम सगळ्यात महाग सुकामेवा नाही. भारतात मिळणारा आणि भारतात पिकणारा असा एक सुकामेवा जो सगळ्यात महाग आहे तो तुम्हाला माहितीच नसेल. भारतात सुकामेव्यांमध्ये चिलगोजा हा सर्वात महाग आणि प्रतिष्ठित मानला जाणारा सुकामेवा आहे. तो प्रत्येक घरात आढळत नाही, कारण त्याची किंमत जास्त असते आणि उपलब्धताही मर्यादित असते. (Which is the most expensive dry fruit grown in India? Neither cashew nor almond)चिलगोजा हा प्रत्यक्षात पाइन झाडाच्या बियांपासून केला जातो. शास्त्रीयदृष्ट्या तो Pinus gerardiana या झाडापासून तयार मिळतो. हे झाड मुख्यत: हिमालयीन पट्ट्यात, विशेषतः हिमाचल आणि जम्मू आणि काश्मीर या भागांत आढळते.

चिलगोजा दिसायला लांबट, पातळ आणि हलक्या तपकिरी रंगाचा असतो. त्याची साल काढल्यानंतर आतून पांढरट क्रीम रंगाचे बी मिळते. त्याची चव हलकी गोडसर, बटरसारखी आणि किंचित क्रीमी असते. काजू-बदामापेक्षा तो अधिक नाजूक आणि समृद्ध स्वादाचा मानला जातो. त्यामुळे शाही मिठाया, हलवा, पुलाव किंवा खास पदार्थांमध्ये त्याचा वापर केला जातो.

पौष्टिकतेच्या दृष्टीने चिलगोजा खूप समृद्ध आहे. त्यात प्रथिने, चांगले मेद (हेल्दी फॅट्स), फायबर आणि अँटी ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. तसेच मॅग्नेशियम, झिंक, आयर्न आणि व्हिटामिन ई यांसारखी पोषक तत्त्वे त्यात आढळतात. हे घटक हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरु शकतात, शरीराला ऊर्जा देतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. योग्य प्रमाणात सेवन केल्यास तो शरीरासाठी ताकद देणारा आणि पोषणमूल्यांनी परिपूर्ण सुकामेवा ठरतो.

चिलगोजा महाग असण्यामागचे मुख्य कारण म्हणजे त्याचे उत्पादन मर्यादित असणे आणि त्याची तयार करण्याची प्रक्रिया जरा किचकट आहे. डोंगराळ भागातील पाइन झाडांवरून शेंगा गोळा करून त्यातून बी वेगळी काढावी लागते. या प्रक्रियेला वेळ आणि मेहनत जास्त लागते. त्यामुळे बाजारात त्याची किंमत इतर सुकामेव्यांपेक्षा खूप जास्त असते. हंगाम आणि गुणवत्तेनुसार चिलगोज्याची किंमत साधारणपणे ४,००० ते ८,००० रुपये प्रति किलो किंवा त्याहून अधिकही असू शकते.

एकंदरीत, चिलगोजा हा केवळ महाग सुकामेवा नाही तर पोषणमूल्यांनी भरलेला आणि चवीला खास असा पदार्थ आहे. त्याची नैसर्गिक उपलब्धता कमी आणि गुणधर्म समृद्ध असल्यामुळेच तो भारतातील सर्वात महाग सुकामेव्यांपैकी एक मानला जातो. 

 

Web Title : चिलगोजा: भारत का सबसे महंगा सूखा मेवा, काजू-बादाम से भी बढ़कर।

Web Summary : हिमालय से प्राप्त चिलगोजा भारत का सबसे महंगा सूखा मेवा है। पोषक तत्वों से भरपूर और मक्खन जैसे स्वाद वाला, यह विशेष व्यंजनों में उपयोग होता है। सीमित उपलब्धता और जटिल प्रक्रिया के कारण इसकी कीमत ₹4,000 से ₹8,000 प्रति किलो तक है।

Web Title : Chilgoza: India's most expensive dry fruit, surpassing cashews and almonds.

Web Summary : Chilgoza, from pine trees in the Himalayas, is India's priciest dry fruit. Rich in nutrients and with a delicate, buttery flavor, it's used in special dishes. Limited availability and a complex harvesting process contribute to its high cost, ranging from ₹4,000 to ₹8,000 per kg.