Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > डब्यासाठी खास सोपी रेसिपी - दहा मिनिटांत करा चविष्ट हरीयाली राईस ,पौष्टिक आणि चमचमीत

डब्यासाठी खास सोपी रेसिपी - दहा मिनिटांत करा चविष्ट हरीयाली राईस ,पौष्टिक आणि चमचमीत

Special and easy recipe- Make green rice in ten minutes, nutritious and delicious : चवीला एकदम भारी असा हरीयाली राईस करा घरीच.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2026 15:03 IST2026-04-29T15:02:45+5:302026-04-29T15:03:35+5:30

Special and easy recipe- Make green rice in ten minutes, nutritious and delicious : चवीला एकदम भारी असा हरीयाली राईस करा घरीच.

Special and easy recipe- Make green rice in ten minutes, nutritious and delicious | डब्यासाठी खास सोपी रेसिपी - दहा मिनिटांत करा चविष्ट हरीयाली राईस ,पौष्टिक आणि चमचमीत

डब्यासाठी खास सोपी रेसिपी - दहा मिनिटांत करा चविष्ट हरीयाली राईस ,पौष्टिक आणि चमचमीत

भाताचे विविध प्रकार आपण करतच असतो. सोपे चांगले आणि चविष्ट असे प्रकार खायला मजा येते. तसेच ते पोटभरीचे असतात. त्यापैकीच एक मस्त प्रकार म्हणजे हरीयाली भात. (Special and easy recipe- Make green rice in ten minutes, nutritious and delicious)एकदम सोपा आणि भारी. रेसिपी खुपच साधी आहे. नाश्ता किंवा जेवण दोन्हीसाठी अगदी योग्य आहे. डब्यासाठी मस्त रेसिपी आहे. पाहा कसा करायचा.  

साहित्य 
बासमती तांदूळ, पाणी, हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना, आलं, लसूण, जिरं, दालचिनी, वेलची, धणे,  बडीशेप, लवंग, तेल, कांदा, कडीपत्ता, गाजर, मटार, फरसबी, सिमला मिरची, मीठ  

कृती
१. बासमती तांदूळ स्वच्छ धुवायचा. जरा परतून घ्यायचा आणि मोकळा शिजवून घ्यायचा. त्याचा लगदा होणार नाही याची काळजी घ्या. शिजल्यावर ताटात परतून ठेवा. गार होवू द्या. 

२. एका मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घ्यायचे. त्यात निवडलेली ताजी कोथिंबीर घालायची. तसेच लसणाच्या काही पाकळ्या घाला. पुदिन्याची ताजी पाने घाला. वेलची घाला आणि दालचिनीही घाला. थोडे धणे घाला. थोडी बडीशेप घाला. तसेच लवंग घाला. थोडं जिरं घाला. आल्याचा तुकडा घाला. गरजेनुसार पाणी घाला आणि त्याची चटणी वाटून घ्या. फार पातळ नको. घट्ट एकजीव चटणी वाटायची.

३. कांदा बारीक चिरायचा. मटारचे ताजे दाणे घ्यायचे. फरसबी बारीक चिरायची. सिमला मिरचीही चिरुन घ्यायची. गाजराचे लहान तुकडे करायचे. एका कढईत तेल गरम करायचे. तेल जरा तापल्यावर त्यात जिरे घालायचे. जिरे फुलू द्यायचे. मग त्यात कडीपत्ता घालायचा. मटारचे दाणे घालायचे. कांदा घालायचा. मस्त परतून घ्यायचे. गाजर परतायचे. सिमला मिरची परतायची. फरसबी परतायची. सगळं परतून घ्यायचं. 

४. त्यात तयार केलेली पेस्ट घालायची. छान परतून घ्यायचे, चवीनुसार मीठ घालायचे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. सगळं मस्त परतून घ्यायचं. मग त्यात बासमती तांदूळ घालायचा. चवीनुसार मीठ घालायचं. थोडं पाणी शिंपडायचं आणि ढवळून घ्यायचं. त्यावर झाकण ठेवायचं. एक वाफ काढून घ्यायची. मग ढवळून परतून घ्यायचा.

Web Title : झटपट हरीयाली राइस रेसिपी: मिनटों में तैयार पौष्टिक लंचबॉक्स

Web Summary : मिनटों में स्वादिष्ट हरीयाली राइस बनाएं! यह आसान रेसिपी बासमती चावल, ताजी जड़ी-बूटियों और सब्जियों का उपयोग करती है। यह लंचबॉक्स या जल्दी बनने वाले पौष्टिक भोजन के लिए बिल्कुल सही है।

Web Title : Quick & Easy Hariyali Rice Recipe: Nutritious Lunchbox Delight in Minutes

Web Summary : Prepare flavourful Hariyali rice in minutes! This simple recipe uses basmati rice, fresh herbs, and vegetables. Perfect for lunchboxes or a quick, wholesome meal. A delicious and convenient option.