उन्हाळ्यात घरच्या घरी बनवलेला रोज मिल्कशेक हा केवळ चविष्टच नाही तर अधिक नैसर्गिक आणि आरोग्यदायीही ठरतो. बाजारातील रोज सिरपऐवजी गुलाब पाणी आणि थोडा गुलकंद वापरून बनवलेला मिल्कशेक अधिक सुगंधी आणि पौष्टिक असतो. (Rose milkshake recipe - must try during summer , tastes great and easy to make as well)गुलाबाचा हलका गंध, गोडवा आणि दुधाचा क्रीमीपणा यामुळे हा पेय प्रकार विशेष ताजेतवाने करणारा वाटतो.
रोज मिल्कशेकचे फायदेही तितकेच महत्त्वाचे आहेत. दुधामध्ये असलेले कॅल्शियम आणि प्रोटीन शरीराला बळकटी देतात. गुलकंद हे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ओळखले जाते, त्यामुळे उन्हाळ्यात ते विशेष फायदेशीर ठरते. तसेच गुलाब पाणी शरीराला थंडावा देण्याबरोबरच मन शांत ठेवण्यास मदत करते. ज्यांना अॅसिडिटी, उष्णतेमुळे होणारी जळजळ किंवा थकवा जाणवतो, त्यांच्यासाठी हा मिल्कशेक एक उत्तम पर्याय आहे.
आता हा घरगुती रोज मिल्कशेक कसा बनवायचा ते पाहूया. सर्वप्रथम एक ग्लास थंड दूध घ्यायचं. त्यात १ ते २ चमचे गुलकंद घाला. त्यानंतर १ चमचा गुलाब पाणी (rose water) घाला. जर जास्त गोडवा हवा असेल तर थोडी साखर किंवा मध घालू शकता. आता हे सगळे मिश्रण मिक्सरमध्ये छान ब्लेंड करून घ्या, म्हणजे गुलकंद नीट मिसळेल. तयार मिल्कशेक ग्लासमध्ये काढून घ्यायचे. त्यात बर्फाचे तुकडे घाला आणि वरुन बदाम-पिस्त्याचे काप घालून सजवा.
अशा प्रकारे केलेला रोज मिल्कशेक हा पूर्णपणे नैसर्गिक घटकांपासून तयार होतो, त्यामुळे तो अधिक आरोग्यदायी ठरतो. रोजच्या आहारात कधीतरी याचा समावेश केल्यास शरीराला थंडावा, ऊर्जा आणि ताजेपणा मिळतो. विशेषतः उन्हाळ्यात हा मिल्कशेक शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने ठेवण्यास मदत करतो. रोज मिल्कशेकचे सिरप जरी विकत मिळत असले तरी त्याचा वापर करण्यापेक्षा या पद्धतीने घरीच तयार करा. चविष्ट आणि पौष्टिक होते.
