Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > रात्री किंवा दुपारच्या जेवणानंतर लगेच कलिंगड खाणं धोक्याचं, पाहा भयंकर गॅस आणि ब्लोटिंगपासून बचावाचे उपाय

रात्री किंवा दुपारच्या जेवणानंतर लगेच कलिंगड खाणं धोक्याचं, पाहा भयंकर गॅस आणि ब्लोटिंगपासून बचावाचे उपाय

Right Way to Eat Watermelon : मुंबईतील घटनेला कलिंगडच जबाबदार असेल हे अजून स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे मनात भिती बाळगण्याची गरज नाही. पण कलिंगड खाताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 10:01 IST2026-04-30T09:59:39+5:302026-04-30T10:01:30+5:30

Right Way to Eat Watermelon : मुंबईतील घटनेला कलिंगडच जबाबदार असेल हे अजून स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे मनात भिती बाळगण्याची गरज नाही. पण कलिंगड खाताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. 

Right Way to Eat Watermelon : How combining watermelon with heavy meals ruins your digestion | रात्री किंवा दुपारच्या जेवणानंतर लगेच कलिंगड खाणं धोक्याचं, पाहा भयंकर गॅस आणि ब्लोटिंगपासून बचावाचे उपाय

रात्री किंवा दुपारच्या जेवणानंतर लगेच कलिंगड खाणं धोक्याचं, पाहा भयंकर गॅस आणि ब्लोटिंगपासून बचावाचे उपाय

Right Way to Eat Watermelon : उन्हापासून बचावासाठी जास्तीत जास्त लोक वेगवेगळी थंड फळं खातात किंवा त्यांचा ज्यूस पितात. लाल-गोड-रसदार कलिंगड हे या दिवसांमध्ये सगळ्यात जास्त खाल्लं जाणारं फळ आहे. कलिंगडाची सगळ्यात जमेची बाजू म्हणजे यात पाणी भरपूर प्रमाणात असतं, ज्यामुळे जास्त तापमानातही हायड्रेट राहतं. अलिकडेच मुंबईत रात्रीच्या जेवणानंतर कलिंगड खाल्ल्यावर एकाच परिवारातील ४ जणांचा जीव गेला. त्यामुळे लोकांच्या मनात कलिंगडाबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.

पण हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, कलिंगड नेहमीच एक हेल्दी फळ राहिलंय. मुंबईतील घटनेला कलिंगडच जबाबदार असेल हे अजून स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे मनात भिती बाळगण्याची गरज नाही. पण कलिंगड खाताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. 

काही लोकांना दुपारच्या जेवणानंतर किंवा रात्रीच्या जेवणानंतर लगेच कलिंगड खाल्ल्याने पोट फुगण्याची समस्या होते. आपल्याला सुद्धा असं कधी जाणवलं असेलच. पण ही काही घाबरण्याची बाब नाही. कारण असं का होतं आणि कलिंगड खाण्याची योग्य पद्धत काय हे आपण पाहणार आहोत.

ब्लोटिंग आणि कलिंगड कनेक्शन

मुळात उन्हाळ्यात आपलं पचन नॅचरली थोडं स्लो झालेलं असतं. कारण शरीर या दिवसांमध्ये आपला फोकस आपल्या शरीरातचं तापमान कंट्रोल करण्यावर करत असतं. अशात जेव्हा आपण काही जड पदार्थ खातो, तेव्हा ते पचन व्हायला वेळ लागतो. तेच, कलिंगडामध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी असतं. त्यामुळे ते लवकर पचतं. अशात जर आपण काही जड खाल्लं आणि त्यावर कलिंगड खाल्लं तर ते जड अन्न पचन होण्याची वाट कलिंगड बघत असतं. या वाट पाहण्याच्या वेळेत कलिंगड पोटात फर्मेंट होऊ लागतं, ज्यामुळे गॅस आणि ब्लोटिंगची समस्या होते. 

कुणी टाळावं कलिंगड?

कलिंगडामध्ये फ्रक्टोज म्हणजेच नॅचरल शुगर भरपूर प्रमाणात असते. अशात ते खाताना काही लोकांनी खास काळजी घेतली पाहिजे. जसे की, इरिटेबल बाउल सिंड्रोम असलेल्यांनी काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर ज्यांचं पचन तंत्र आधीच कमजोर आहे किंवा ज्यांना लगेच अॅसिडिटी होते अशा लोकांनी कलिंगड खाणे टाळावं.

कलिंगड खाण्याची योग्य पद्धत 

कलिंगड हे काही नुकसानकारक फळ नाही. उन्हाळ्यात हे फळ सुपरफूड ठरतं. फक्त हे खाताना काही गोष्टींची काळजी घेतली तर नुकसान टाळता येतात. अशात कलिंगड खाण्याची योग्य पद्धत माहीत असली पाहिजे. 

कलिंगड नेहमी जेवणाच्या आधी किंवा जेवण झाल्यावर बराच वेळानंतर खावे. जेवण झाल्यावर लगेच कलिंगड खाणं टाळावे. तसेच कलिंगडामध्ये दूध, दही किंवा कोणतेही तळलेले-भाजलेले पदार्थ मिक्स करू नये. एकाचवेळी जास्त प्रमाणात कलिंगड खाणं टाळावे. असं केल्यास पोटातील अॅसिडिक बॅलन्स बिघडतो. फ्रिजमध्ये ठेवलेलं फार गार कलिंगड खाणं टाळा. पोटाचं तापमान आणि थंड फळामुळे पचन तंत्र बिघडू शकतं.

Web Title : गैस, ब्लोटिंग से बचने के लिए भोजन के तुरंत बाद तरबूज न खाएं।

Web Summary : भोजन के तुरंत बाद तरबूज खाने से फर्मेंटेशन के कारण ब्लोटिंग हो सकती है। इसे भोजन से पहले या बाद में खाएं। कमजोर पाचन या आईबीएस वाले सावधानी बरतें। डेयरी या तले हुए खाद्य पदार्थों के साथ मिलाकर खाने से बचें। सीमित मात्रा में खाएं और ठंडा तरबूज खाने से बचें।

Web Title : Avoid watermelon immediately after meals to prevent gas, bloating.

Web Summary : Eating watermelon right after meals can cause bloating due to fermentation. Consume it before meals or much later. Those with weak digestion or IBS should exercise caution. Avoid mixing with dairy or fried foods. Eat in moderation and avoid chilled watermelon.