Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > उन्हाळ्यात खा आंबटगोड कैरीची आईस कँडी, मुलं म्हणतील आई अजून हवं.. आणि तुम्हालाही आठवेल लहानपण

उन्हाळ्यात खा आंबटगोड कैरीची आईस कँडी, मुलं म्हणतील आई अजून हवं.. आणि तुम्हालाही आठवेल लहानपण

Natural fruit popsicles for kids: Tangy and sweet raw mango bars: 'कच्च्या कैरीची आईस कॅन्डी कशी बनवायची पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2026 10:21 IST2026-05-11T10:20:17+5:302026-05-11T10:21:02+5:30

Natural fruit popsicles for kids: Tangy and sweet raw mango bars: 'कच्च्या कैरीची आईस कॅन्डी कशी बनवायची पाहूया.

Raw mango ice candy recipe Homemade raw mango popsicles Kacchi kairi ice candy in Marathi Summer special mango pepsi at home | उन्हाळ्यात खा आंबटगोड कैरीची आईस कँडी, मुलं म्हणतील आई अजून हवं.. आणि तुम्हालाही आठवेल लहानपण

उन्हाळ्यात खा आंबटगोड कैरीची आईस कँडी, मुलं म्हणतील आई अजून हवं.. आणि तुम्हालाही आठवेल लहानपण

उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या की, कडाक्याच्या उन्हात लहान मुलांची पहिली पसंती असते ती म्हणजे 'आईस फ्रूट' किंवा थंडगार 'पेप्सी'. पूर्वी घरोघरी मिळणारी ही आंबट-गोड पेप्सी आजही आपल्याला बालपणीच्या आठवणीत घेऊन जाते. (Natural fruit popsicles for kids) बाजारात मिळणाऱ्या रंगीत कॅन्डीमध्ये अनेकदा आरोग्याला हानिकारक रंग आणि फ्लेवर्स असतात. अशा वेळी आपल्या मुलांना घरीच बनवलेली आणि नैसर्गिक फळांपासून तयार केलेली 'कच्च्या कैरीची आईस कॅन्डी' देणे कधीही उत्तम. (Tangy and sweet raw mango bars)
कच्च्या कैरीचा आंबटपणा, साखरेचा गोडवा आणि त्यात घातलेला चाट मसाला यामुळे ही कॅन्डी जिभेवर ठेवताच चव आणखी हवीशी वाटते. (Indian summer street food recipes) उन्हाळ्याच्या सुट्टीत मुले जेव्हा बाहेर खेळून येतात, तेव्हा त्यांना थंडगार काहीतरी हवे असते. अशा वेळी फ्रीजरमधून काढून दिलेली ही कैरीची पेप्सी पाहून मुले नक्कीच खुश होतील. ही चटकदार रेसिपी कशी बनवायची ते पाहूया.

उन्हाळ्यातील स्वस्त 'मॅजिकल ड्रिंक'! रोज ताक पिण्याचे ५ फायदे, कधी आणि किती प्रमाणात प्यावं? गोडसर चवीचं ताक हवेच..

साहित्य

कच्ची कैरी- २
पुदिना - १० ते १२ पाने
जिरे पावडर - १ चमचा
चाट मसाला - १ चमचा
काळे मीठ - चवीनुसार
साखर - चवीनुसार
लिंबाचा रस - १ चमचा
पाणी - गरजेनुसार

कृती

1. सगळ्यात आधी कैरी स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्या. त्याच्या वरील साल काढून घ्या. कैरीचे दोन भाग करुन त्यातील बी काढा. आता कैरीची बारीक तुकडे करा.

2. मिक्सरच्या भांड्यात कैरीचे तुकडे घाला. पुदिन्याची पाने निवडून स्वच्छ धुवून त्यात घाला. वरुन जिरे पावडर, चाट मसाला, काळे मीठ, साखर, लिंबाचा रस आणि गरजेनुसार पाणी घालून वाटून घ्या.

3. आता हे मिश्रण कुल्फी मोल्डमध्ये घालून फ्रीजरमध्ये ७ ते ८ तासांसाठी सेट व्हायला ठेवा.  कॅन्डी सेट झाल्यावर मोल्ड थोडा वेळ साध्या पाण्यात धरा. कॅन्डी खाण्यापूर्वी वरुन लाल तिखट घाला. खा चटपटीत आंबट- गोड कैरीची आईस कँन्डी.


Web Title: Raw mango ice candy recipe Homemade raw mango popsicles Kacchi kairi ice candy in Marathi Summer special mango pepsi at home