दही सॅण्डविच हा हलका, पौष्टिक आणि पटकन खाता येणारा असा एक सोपा पण चविष्ट पदार्थ आहे. साधारणपणे ब्रेडच्या स्लाइसच्या मध्ये दही, भाज्या आणि हलक्या मसाल्यांचा वापर करुन तयार होणारा हा पदार्थ उन्हाळ्यात विशेष आवडीने खाल्ला जातो, कारण दही शरीराला थंडावा देते. या सॅण्डविचची खासियत म्हणजे त्याचा मऊसर टेक्स्चर आणि ताजेपणा. दह्यामुळे सॅण्डविच कोरडे लागत नाही, तर हलकंसं क्रीमी आणि थोडं आंबट-गोड चविष्ट लागतं. (Make a yogurt sandwich in 10 minutes, creamy, tasty and easy to digest! healthy recipe )त्यात काकडी, गाजर यांसारख्या भाज्या घातल्याने कुरकुरीतपणा आणि पोषणमूल्य वाढतात. त्यामुळे हे सॅण्डविच फक्त चवीलाच नाही तर आरोग्यासाठीही चांगलं ठरतं.
दही सॅण्डविच पचायला हलकं असल्यामुळे सकाळच्या नाश्त्यासाठी, डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या भुकेसाठी उत्तम पर्याय मानला जातो. ज्यांना जास्त तेलकट किंवा मसालेदार पदार्थ टाळायचे असतात, त्यांच्यासाठी हा एक हेल्दी पर्याय आहे. यामध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि फायबर यांचा समावेश आहे.
साहित्य
दही, ब्रेड, कांदा, ओरेगॅनो, मीठ, गाजर, सिमला मिरची, कोथिंबीर, बटर
कृती
१. ताजे छान दही घ्यायचे. त्याचे पाणी काढून टाकायचे. दही छान फेटून घ्यायचे. कांदा सोलून घ्यायचा आणि बारीक चिरुन घ्यायचा. गाजर सोलून घ्यायचे आणि किसून घ्यायचे. सिमला मिरचीही बारीक चिरुन घ्यायची. ताजी कोथिंबीर घ्यायची, निवडायची आणि बारीक चिरुन घ्यायची.
२. दही मस्त फेटून झाल्यावर त्यात मीठ घालायचे. तसेच ओरेगॉनो घालायचे. पुन्हा थोडं फेटायचं. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा. तसेच गाजरही घालायचे. सिमला मिरची घालायची आणि कोथिंबीरही घालायची. सगळं मस्त मिक्स करुन घ्यायचं.
३. ब्रेड घ्यायचा आणि त्याच्या कडा काढून घ्यायच्या, ब्रेड एका बाजूने छान बटरवर परतून घ्यायचा. परतलेल्या बाजूला तयार केलेले मिश्रण लावायचे. दोन ब्रेडमध्ये हवे तेवढे मिश्रण भरायचे. ब्रेडला बाहेरुन बटर लावायचे. तव्यावर मस्त कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचे.
