Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > उन्हाळ्यातला प्रश्न चुटकीसरशी सोडवा-करा झणझणीत वाटणातली कांद्याची भाजी, ५ मिनिटांत चमचमीत भाजी तयार

उन्हाळ्यातला प्रश्न चुटकीसरशी सोडवा-करा झणझणीत वाटणातली कांद्याची भाजी, ५ मिनिटांत चमचमीत भाजी तयार

Make a spicy onion vegetable dish, a delicious 5 minutes recipe, must try : कांद्याची भाजी करा झटपट, सोपी रेसिपी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2026 18:17 IST2026-04-24T18:16:04+5:302026-04-24T18:17:03+5:30

Make a spicy onion vegetable dish, a delicious 5 minutes recipe, must try : कांद्याची भाजी करा झटपट, सोपी रेसिपी.

Make a spicy onion vegetable dish, a delicious 5 minutes recipe, must try | उन्हाळ्यातला प्रश्न चुटकीसरशी सोडवा-करा झणझणीत वाटणातली कांद्याची भाजी, ५ मिनिटांत चमचमीत भाजी तयार

उन्हाळ्यातला प्रश्न चुटकीसरशी सोडवा-करा झणझणीत वाटणातली कांद्याची भाजी, ५ मिनिटांत चमचमीत भाजी तयार

कांद्याची भाजी ही खऱ्या अर्थाने कधीही उपयोगी पडणारी भाजी आहे. घरात दुसरी कोणती भाजी उपलब्ध नसली, अचानक पाहुणे आले किंवा स्वयंपाकासाठी वेळ खूप कमी असेल अशा वेळी ही भाजी अगदी मदतीला धावून येते. कारण कांदा हा जवळजवळ प्रत्येक घरात नेहमी असतो आणि त्यापासून पटकन चविष्ट भाजी तयार करता येते. (Make a spicy onion vegetable dish, a delicious 5 minutes recipe, must try)या भाजीचं वैशिष्ट्य म्हणजे साधेपणा आणि झटपट होणारी कृती. फार कटकट नाही, कमी साहित्य आणि कमी वेळ. तरीही चव मात्र मस्त लागते. वाटण घालून केली तर ही भाजी थोडीशी रिच आणि खास चवीची होते, त्यामुळे साध्या जेवणालाही छान उठाव येतो. पाहा सोपी रेसिपी.

साहित्य 
कांदे, तेल, मोहरी, जिरे, हळद, लाल तिखट, मीठ, कडीपत्ता, हिरवी मिरची, कोथिंबीर, खोबरे, लसूण, आलं, धणे, जिरे,  खसखस

कृती
१. सर्वप्रथम कांदे सोला आणि बारीक चिरून घ्या. सगळ्यात आधी मस्त वाटण तयार करा. त्यासाठी  खोबरे घ्या. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्या. आल्याचा तुकडा घ्या. धणे, जिरे आणि खसखस एकत्र करून थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घ्या. छान एकजीव मिश्रण तयार करुन घ्या. 

२. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी घालून फोडणी तयार करा. मोहरी तडतडली की जिरे, कडीपत्ता आणि चिरलेली हिरवी मिरची घालून फोडणी तयार करुन घ्यायची. छान खमंग होते.

३. नंतर  त्यात चिरलेला कांदा घाला आणि मध्यम आचेवर चांगले परतून घ्या. कांदा गुलाबी ते हलका सोनेरी होईपर्यंत परतणे महत्त्वाचे आहे, यामुळे भाजीत नैसर्गिक गोडसर चव येते. कांदा छान परतून झाला की त्यात हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून एकदा नीट ढवळून घ्यायचे.

४. आता तयार केलेले वाटण कढईत घाला आणि कांद्यासोबत चांगले एकजीव करा. हे वाटण भाजीला घट्टपणा आणि खास चव देते. वाटण ढवळून घ्यायचे आणि त्यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायचे. त्यात गरजेनुसार पाणी घालायचे. मस्त उकळी येऊ द्यायची. 

५. कांदे पूर्ण मऊ झाले आणि भाजीला छान तेल सुटायला लागलं की गॅस बंद करायचा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भाजी छान ढवळून घ्यायची.

Web Title : गर्मी का सवाल झटपट हल: 5 मिनट में मसालेदार प्याज की सब्जी तैयार।

Web Summary : आसानी से उपलब्ध सामग्री के साथ मसालेदार प्याज की भाजी जल्दी बनाएं। प्याज भूनें, मसाले, तैयार पेस्ट डालें और उबाल लें। धनिया से सजाएं। मिनटों में तैयार!

Web Title : Solve summer's question quickly: Spicy onion vegetable ready in 5 minutes.

Web Summary : Quickly make spicy onion bhaji with readily available ingredients. Fry onions, add spices, prepared paste, and simmer. Garnish with coriander. Ready in minutes!