आज काय नाश्त्याला बनवू हा प्रश्न रोजचा असतो. त्यात वजन वाढू नये म्हणून हेल्दी पदार्थ खाण्यावर अधिक भर दिला जातो. विशेषतः जेव्हा तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असता, तेव्हा तांदळाचे पदार्थ टाळण्याकडे कल असतो.(
Weight loss breakfast ideas with jowar) अशा वेळी 'ज्वारीच्या लाह्यांची इडली' हा एक चविष्ट आणि आरोग्यदायी पर्याय समोर येतो. ज्वारीमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते, ज्यामुळे तुमचे पोट बराच वेळ भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही. इडली बनवण्यासाठी तांदूळ भिजवणे, वाटणे आणि रात्रभर आंबवणे यासाठी बराच वेळ लागतो. (Quick and healthy jowar idli for beginners)
ज्वारीची इडली बनवण्यासाठी आपल्याला फक्त १५ मिनिटे लागतील. यासाठी ना तांदूळ भिजवण्याची गरज आहे ना पीठ आंबवण्याची. अगदी काही मिनिटांत हलकी-फुलकी, पौष्टिक इडली तयार होईल.(Instant weight loss idli with jowar puffs) जे ग्लुटेन फ्री पदार्थ खातात त्यांच्यासाठी ही इडली बेस्ट आहे. सकाळच्या घाईत किंवा मुलांच्या डब्यासाठी हा एक झटपट आणि चविष्ट नाश्ता आहे, जो आपल्याला दिवसभर उत्साही ठेवण्यास मदत करेल. ही रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया.
पांढऱ्या केसांवर नैसर्गिक तोडगा! घरीच करा नॅचरल हेअर कलर- सोपा उपाय- केसांना मिळेल सुंदर बर्गंडी रंग
साहित्य
ज्वारीच्या लाह्या- २ कप (भाजून भरड वाटलेल्या)
रवा (साधा किंवा तांदळाचा रवा)- १ कप
दही- १ कप
किसलेले गाजर- १/२ कप
आले-मिरची- १/२ टीस्पून आल्याची पेस्ट
बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या- १ ते २
कोथिंबीर
चवीनुसार- मीठ
आवश्यकतेनुसार- पाणी
तेल - १ चमचा
मोहरी - १ चमचा
कढीपत्ता - ४ ते ५
हिंग - चिमूटभर
इनो- १/२ टीस्पून
कृती
1. सगळ्यात आधी एका भांड्यात वाटलेल्या ज्वारीच्या लाह्या, रवा, दही, गाजर, कोथिंबीर, हिरवी मिरची, आल्याची पेस्ट आणि मीठ घालून सर्व साहित्य एकत्र करा.
2. इडली पिठासारखे मध्यम दाट मिश्रण तयार करण्यासाठी त्यात आवश्यकतेनुसार पाणी घाला. हे मिश्रण १० मिनिटांसाठी झाकून बाजूला ठेवा. ज्यामुळे रवा आणि लाह्या व्यवस्थित फुलतील.
3. पिठामध्ये तयार केलली तेल, मोहरी, कढीपत्ता आणि हिंगाची फोडणी आणि इनो घालून हलक्या हाताने मिक्स करा. नंतर इडली पात्राला तेलाने ग्रीस करुन घ्या.
4. त्यात तयार पीठ घालून १५ मिनिटे वाफवून घ्या. गरमागरम, मऊसुत आणि पौष्टिक ज्वारीची इडली चटणी किंवा सांबारसोबत सर्व्ह करा.
