उन्हाळा आला की रसाळ, आंबट - गोड द्राक्षं खाण्याचा मोह कुणालाही आवरत येत नाही. रणरणत्या कडक उन्हात रसाळ आणि गोड द्राक्ष खाण्याची मजा काही वेगळीच असते. शरीराला थंडावा देणारं हे फळ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचं. पण, बाजारात मिळणारी ही टवटवीत आणि चकचकीत द्राक्ष दिसतात तितकीच सुरक्षित आहेत का? हा प्रश्न आजकाल प्रत्येकाच्या मनात येतो. बाजारातून आणलेल्या द्राक्षांवर त्यांची चमक टिकवण्यासाठी आणि जास्त दिवस ताजी राहण्यासाठी अनेकदा केमिकल्सची फवारणी केली जाते. ही रसायने आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे द्राक्षं खरेदी करताना ती सुरक्षित आहेत की नाही, हे ओळखणं खूप महत्त्वाचं आहे(how to remove pesticides from grapes at home).
द्राक्षांवर फवारणी केलेली रसायने साध्या पाण्याने धुतली तरी पूर्णपणे निघत नाहीत आणि आपल्या पोटात जाऊन आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण करू शकतात. अशावेळी द्राक्ष खाणं सोडून देण्यापेक्षा, ती शुद्ध आहेत की केमिकलची फवारणी केलेली हे ओळखणं जास्त गरजेचं आहे. बाजारातून आणलेली द्राक्ष रसायनांची फवारणी केलेली आहेत की (how to clean grapes properly) नैसर्गिकरित्या पिकलेली आहेत, हे ओळखण्यासाठी काही सोप्या घरगुती ट्रिक्स आहेत. या सहजसोप्या ट्रिक्सच्या मदतीने आपण घरच्याघरीच द्राक्षांमधील (best way to wash grapes before eating) भेसळ किंवा केमिकल्सची फवारणी (best way to wash grapes before eating) केलेली द्राक्ष कोणती हे सहज ओळखू शकाल.
मार्केटमध्ये मिळणारी द्राक्षे विषारी कशी आहेत?
डॉ. ब्रिजपाल त्यागी सांगतात की, आजकाल मार्केटमध्ये बरीच विषारी केमिकल्सची फवारणी केलेली द्राक्षे विकत मिळतात. ही द्राक्षे विषारी असण्याचे कारण म्हणजे त्यामध्ये भरपूर प्रमाणात केमिकल्सचा वापर केला जातो, जेणेकरून ती दीर्घकाळ हिरवी आणि ताजी दिसावीत. यामध्ये प्रामुख्याने मॅनकोझेब (Mancozeb) आणि सायपरमेथ्रिन (Cypermethrin) ही केमिकल्स वापरली जातात. यासोबतच त्यांना सल्फर डायऑक्साइड गॅसमधूनही काढले जाते. तुम्ही द्राक्षांवर जो पांढऱ्या रंगाचा थर पाहता, तो याच विषारी केमिकल्सचा थर असतो, ज्यामुळे द्राक्षे लवकर सडत नाहीत आणि स्वच्छ दिसतात.
द्राक्षे केमिकल्स फ्री सुरक्षित आहेत की नाही हे कसे ओळखावे?
द्राक्षे सुरक्षित आहेत की नाही हे ओळखण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे. डॉक्टर सांगतात की, द्राक्ष देठापासून तोडून पहा. जर त्या ठिकाणचा देठ हिरवा असेल तर द्राक्षे केमिकल्स फ्री आहेत, मात्र जर देठ पूर्णपणे सुकलेला असेल तर समजून जा की त्यांना ताजे दाखवण्यासाठी केमिकल्सचा भरपूर वापर करण्यात आला आहे. याशिवाय जर द्राक्षांवर खूप जास्त पांढऱ्या रंगाचा थर दिसत असेल, तर ते देखील केमिकल्सचे संकेत असू शकतात.
द्राक्षे खाण्याची सुरक्षित पद्धत काय आहे?
डॉ. ब्रिजपाल त्यागी पुढे सांगतात की, न धुता द्राक्षे खाणे तुमच्या आरोग्यासाठी अजिबात योग्य नाही. जर तुम्ही थेट गाड्यावरून उचलून द्राक्षे खाल्ली किंवा घरी आणल्यावर स्वच्छ न करता खाण्यास सुरुवात केली, तर ते अत्यंत विषारी ठरू शकते. सुरक्षित पद्धत ही आहे की, द्राक्षे घरी आणल्यानंतर १५ ते २० मिनिटे बेकिंग सोडा असलेल्या पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर ती स्वच्छ धुवा, कोमट पाण्याने धुतल्यास अधिक चांगले असे केल्याने द्राक्षांवरील पांढरा थर बऱ्याच अंशी निघून जातो आणि ती खाण्यासाठी सुरक्षित होतात.
द्राक्षे स्टोअर करण्याची योग्य पद्धतही महत्त्वाची...
द्राक्षे जास्त दिवस स्टोअर करून ठेवणे टाळा. नेहमी ताजी द्राक्षेच खरेदी करा आणि खाण्यापूर्वी बेकिंग सोडा असलेल्या पाण्याने नक्की धुवा. जास्त काळ साठवून ठेवलेल्या द्राक्षांमध्ये बॅक्टेरिया वाढण्याचा धोकाही वाढतो.
