आपल्या भारतीय संस्कृतीत 'घरचे जेवण' म्हणजे सर्वात उत्तम असे मानले जाते. हॉटेलच्या मसालेदार जेवणापेक्षा घरची डाळ - भाजी, चपाती, भाकरी , भात असं संपूर्ण जेवण केव्हाही उत्तम, असा आपला ठाम विश्वास असतो. असे असले तरी घरचे जेवण खाऊनही आज भारतीय घरांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि लठ्ठपणा यांसारख्या समस्या फार मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहेत. कधी विचार केला आहे का, की 'शुद्ध' घरगुती जेवण खाऊनही आपण आजारी का पडतोय? याचे एक मुख्य पण तितकेच दुर्लक्षित कारण म्हणजे आपल्या कढईत पडणाऱ्या तेलाचा अतिवापर...आपण चवीसाठी किंवा सवयीने भाजी - आमटीत 'धार' धरून तेल ओततो, पण हेच तेल हळूहळू आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण करत असते. आपल्याला नक्की माहिती नसते की एका व्यक्तीसाठी किंवा कुटुंबासाठी महिन्याला किती तेल वापरणं पुरेसे आहे(monthly oil consumption per family).
आपण रोज गरजेपेक्षा जास्त तेलाचा वापर करत आहोत. कित्येकदा आपण अंदाजाने डाळ किंवा भाजीमध्ये कितीही तेल टाकतो, जे अजिबात नॉर्मल नाही. आपण कधी हिशोब करून पाहिला आहे का की महिन्यात तुमच्याकडे किती लिटर तेल वापरले जात आहे? आपल्यापैकी बहुतेक लोक हे करत नाहीत आणि हळूहळू तेलाचा हा ओव्हरडोज (how much oil should a family use in a month) आपल्या शरीराला आजारी बनवतो.
रोज किती तेलाचा वापर योग्य आहे?
न्यूट्रिशनिस्ट श्वेता एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे सांगतात की, एका व्यक्तीने दिवसभरात साधारण १५ ते २० ml फॅट घेणं हे अतिशय नॉर्मल आहे. याचाच अर्थ म्हणजे तुम्ही जे काही तूप, लोणी किंवा तेल घेत आहात, त्याचे एकूण प्रमाण दिवसाला १५ ते २० ml पेक्षा कमीच असायला हवे.
रोज रात्री दुधात ‘हा’ पदार्थ घालून प्या, सुटलेलं पोट होऊ लागेल सपाट-सोपा उपाय...
घरचं सकस अन्न-वेळेवर जेवण आणि ढीगभर पत्थ्य पाळूनही शुगर ‘हाय’! डॉक्टर सांगतात ३ चुका...
एका कुटुंबाने महिन्यात किती तेल वापरले पाहिजे?
जर एक व्यक्ती दिवसाला १५ ते २० ml तेल खात असेल, तर चार लोकांच्या कुटुंबात ६० ते ८० ml तेल खाल्ले पाहिजे. या हिशोबाने पूर्ण कुटुंबासाठी फक्त दोन किंवा जास्तीत जास्त अडीच लिटर तेलाचाच वापर व्हायला हवा, ज्यामध्ये प्रति व्यक्ती ५०० ते ६०० ml तेल पुरेसे असते. सोप्या शब्दात सांगायचे तर याला 'हाफ लिटर रूल' म्हणतात, म्हणजेच एका व्यक्तीने महिन्यात फक्त अर्धा लिटरच तेल/तूप खाल्ले पाहिजे.
रोजच्या आहारात तेलाचा वापर कमी करण्यासाठी स्मार्ट उपाय...
न्यूट्रिशनिस्ट श्वेता सांगतात की, थोडेसे स्मार्ट उपाय वापरुन तुम्ही तेलाचा वापर कमी करू शकता. जसे की, थेट बाटलीतून तेल न टाकता चमच्याचा वापर करा. यामुळे तुम्हाला नक्की किती चमचे तेल वापरले जात आहे याचा अंदाज येईल. तुम्हाला दिवसभरात प्रति व्यक्ती फक्त ३ ते ४ चमचे तेल वापरायचे आहे, जसे की नाश्त्यासाठी एक चमचा, दुपारच्या जेवणासाठी एक चमचा आणि रात्रीच्या जेवणासाठी एक चमचा. यापैकी एक चमचा तेल तुम्ही देशी तूप म्हणून वापरू शकता; हे पचन सुधारण्यास आणि त्वचेच्या आरोग्यास मदत करेल. तुम्हाला तुमच्या आहारातून फॅट पूर्णपणे बंद करायचे नाही. कारण फॅट तुमच्या शरीराला व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास मदत करते. फक्त योग्य तेलाची निवड करा आणि 'हाफ लिटर रूल' फॉलो करा.
