Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > उन्हाळ्यात चपात्या कडक होतात? कणकेत चिमूटभर हा पदार्थ मिसळा, छान मऊ राहातील

उन्हाळ्यात चपात्या कडक होतात? कणकेत चिमूटभर हा पदार्थ मिसळा, छान मऊ राहातील

How To Make Soft Roti In Summer Season : गव्हाची कणीक मळल्यानंतर १५ ते २० मिनिटं तसंच झाकून ठेवा. ज्यामुळे ग्लुटेन सेट होते आणि पोळ्या जास्त मऊ होतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 18:06 IST2026-04-15T15:02:42+5:302026-04-15T18:06:05+5:30

How To Make Soft Roti In Summer Season : गव्हाची कणीक मळल्यानंतर १५ ते २० मिनिटं तसंच झाकून ठेवा. ज्यामुळे ग्लुटेन सेट होते आणि पोळ्या जास्त मऊ होतात.

How To Make Soft Roti : Easy Tricks To Make Soft Fluffy Roti Chapati making Hacks | उन्हाळ्यात चपात्या कडक होतात? कणकेत चिमूटभर हा पदार्थ मिसळा, छान मऊ राहातील

उन्हाळ्यात चपात्या कडक होतात? कणकेत चिमूटभर हा पदार्थ मिसळा, छान मऊ राहातील

भारतीय घरांमध्ये चपाती हा आहाराचा महत्वाचा भाग आहे. पण अनेकदा चपात्या वातड होतात कधी शेकल्यानंतर थोड्यावेळानं कडक होतात अशी अनेकांची तक्रार असे. दिवसभरात कधीही चपात्या खाल्ल्या जात असल्या तरी त्या सतत लाटणं, शेकणं शक्य नसतं म्हणून एकदाच चपात्या बनवून ठेवल्या जातात (How To Make Soft Roti). कडक चपात्या फक्त चव खराब करत नाही तर चावणंही कठीण होतं. (How To Make Soft Roti In Summer Season)

 अनेकांना असं वाटतं चपात्या मऊ होणार की नाही ते  पिठाच्या गुणवत्तेवर अवलंबून असतं. पण चपात्या मऊसूत होण्यासाठी अनेक छोट्या छोट्या टिप्स उपयोगी पडातत. जसं की पीठ मळण्याची पद्धत, पाण्याचं योग्य प्रमाण, शेकण्याची पद्धत आणि टेक्निक या सर्व गोष्टी चपात्यांना मऊ ठेवण्यासाठी प्रभावी ठरतात. जर तुम्हाला असं वाटत असेल की चपात्या जास्तवेळ मऊ, स्वादीष्ट राहाव्यता तर तुम्ही काही असरदार टिप्स वापरू शकता. ज्यामुळे तासनतास चपात्या मऊ राहतील.

परफेक्ट चपात्या करण्यासाठी पीठ मळण्याची योग्य पद्धत कोणती? (Right Way To Make Chapati)

 चपाती करण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा. कोमट पाण्याऐवजी तु्म्ही दूध घालू शकता पण कमी प्रमाणात घाला नंतर पाण्यानं पीठ मळा. पीठ जास्त घट्ट नसेल याची काळजी घ्या. जास्त सैल कणीकही भिजवू नका. कारण  कणीक जास्त सैल असेल तर चपाती नीट लाटता येत नाही तसंच चपातीचा टेक्स्चर बिघडतो. पिठात थोडं मीठ घालायला विसरू नका. यामुळे चपात्यांना चांगली चव येते.

पीठ मळल्यानंतर काहीवेळ तसंच ठेवून द्या.

 गव्हाची कणीक मळल्यानंतर १५ ते २० मिनिटं तसंच झाकून ठेवा. ज्यामुळे ग्लुटेन सेट होते आणि पोळ्या जास्त मऊ होतात. चपाती तव्यावर शेकताना तवा पूर्ण गरम होऊ द्या. त्यानंतर मध्यम आचेवर शेका. उच्च आचेवर शेकल्यामुळे चपात्या कडक होतात.  चपातीला तूप किंवा तेल लावून शेकून घ्या. यामुळे चपात्या तासनतास मऊ राहतात. चपात्या एका कापडात लपेटून ठेवा.एअरटाईट कटेंनरचा वापर करा. ज्यामुळे चपात्या दीर्घकाळ मऊ राहतील.

Web Title : गर्मी में चपाती नरम रखें: आटे में यह मिलाएं, रहें मुलायम!

Web Summary : गर्मी में चपाती सख्त होती हैं? गुनगुने पानी से आटा गूंधें, 15-20 मिनट आराम दें। घी/तेल के साथ मध्यम आंच पर पकाएं। मुलायम रहने के लिए कपड़े या एयरटाइट कंटेनर में स्टोर करें।

Web Title : Keep chapatis soft in summer: Add this to the dough!

Web Summary : Summer chapatis hardening? Knead dough with lukewarm water, rest 15-20 minutes. Cook on medium heat with ghee/oil. Store in cloth or airtight container for lasting softness.