Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > कोणती डाळ पाण्यांत किती वेळ भिजवावी आणि कशी शिजवावी? डाळ शिजवण्याची योग्य पद्धत - वरण, आमटी होईल चविष्ट...

कोणती डाळ पाण्यांत किती वेळ भिजवावी आणि कशी शिजवावी? डाळ शिजवण्याची योग्य पद्धत - वरण, आमटी होईल चविष्ट...

how to cook dal properly : how long to soak dal before cooking : dal soaking & cooking time : तूर, मूग, मसूर आणि हरभरा यांसारख्या विविध डाळी नेमक्या कशा शिजवाव्यात याचे परफेक्ट टायमिंग...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2026 16:17 IST2026-04-20T16:00:50+5:302026-04-20T16:17:36+5:30

how to cook dal properly : how long to soak dal before cooking : dal soaking & cooking time : तूर, मूग, मसूर आणि हरभरा यांसारख्या विविध डाळी नेमक्या कशा शिजवाव्यात याचे परफेक्ट टायमिंग...

how to cook dal properly how long to soak dal before cooking dal soaking & cooking time | कोणती डाळ पाण्यांत किती वेळ भिजवावी आणि कशी शिजवावी? डाळ शिजवण्याची योग्य पद्धत - वरण, आमटी होईल चविष्ट...

कोणती डाळ पाण्यांत किती वेळ भिजवावी आणि कशी शिजवावी? डाळ शिजवण्याची योग्य पद्धत - वरण, आमटी होईल चविष्ट...

आपल्याकडील भारतीय थाळीतील डाळ - भात म्हणजे 'कम्फर्ट फूड'! पण कधी डाळ कुकरमध्ये इतकी शिजते की तिचा लगदा होतो, तर कधी डाळ दोन-तीन शिट्ट्या देऊनही कच्चीच राहते. प्रत्येक डाळीची चव आणि पौष्टिकता ही ती 'कशी शिजवली आहे' यावर अवलंबून असते. आपल्या रोजच्या जेवणात डाळ हा एक महत्त्वाचा आणि पौष्टिक पदार्थ असतो, पण प्रत्येक डाळ योग्य पद्धतीने शिजवली तरच तिची खरी चव आणि पोषणमूल्य टिकून राहतात. अनेकदा आपण घाईत डाळ शिजवतो आणि ती कधी कच्ची राहते, तर कधी जास्त शिजून चव बिघडते. तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ किंवा चणा डाळ- प्रत्येक डाळ शिजवण्याची पद्धत, पाण्याचं प्रमाण आणि वेगवेगळे असते. त्यामुळे योग्य टेक्स्चर आणि चव येण्यासाठी कोणती डाळ नेमकी किती वेळ भिजत ठेवणं किंवा ती शिजवण्याची योग्य पद्धत जाणून घेणं खूप गरजेचे असते(how to cook dal properly).

आपल्यापैकी बऱ्याच गृहिणींना अनेकदा एकच प्रश्न पडतो की, डाळ - आमटीची चव वाढवण्यासाठी डाळ नेमकी किती शिजवावी किंवा डाळ तयार करण्यापूर्वी कोणती डाळ नेमकी किती वेळ भिजवून ठेवावी. खरंतर, डाळ शिजवताना ती भिजत घालण्यापासून ते कुकरच्या शिट्ट्यांच्या टायमिंगपर्यंत अनेक छोट्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. प्रत्येक डाळीचे (how long to soak dal before cooking) गुणधर्म वेगळे असतात, त्यामुळे ती शिजवण्याची पद्धतही वेगळी असावी लागते. कोणती डाळ किती वेळ शिजवावी, डाळ शिजवताना त्यात काय घालावे आणि योग्य पद्धत कोणती, हे माहीत असल्यास स्वयंपाक अधिक चविष्ट आणि पौष्टिक होतो. तूर, मूग, मसूर आणि हरभरा (dal soaking & cooking time) यांसारख्या विविध डाळी नेमक्या कशा शिजवाव्यात, जेणेकरून त्यातील प्रथिने टिकून राहतील आणि जेवणही चवदार होईल.

कोणती डाळ नेमकी कशी शिजवावी ? 

१. तूर डाळ :- तूर डाळ बहुतांश घरांमध्ये रोज बनवली जाते. ही डाळ शिजवण्यापूर्वी साधारण ३० मिनिटे भिजवून ठेवणे केव्हाही चांगले. प्रेशर कुकरमध्ये २ ते ३ शिट्ट्या होईपर्यंत ही डाळ शिजवणे पुरेसे असते. लक्षात ठेवा, ही डाळ जास्त वेळ उकळल्याने त्यातील प्रोटिनची गुणवत्ता कमी होऊ शकते.

एका महिन्यात एका कुटूंबाने माणशी किती तेल खाणं योग्य? आहारतज्ज्ञांचा सल्ला वाचा, तेलाचे तवंग धोक्याचे...

२. मसूर डाळ :- मसूर डाळीमध्ये आयर्नचे प्रमाण भरपूर असते. ही डाळ तयार करण्यापूर्वी १५ ते २० मिनिटे भिजवणे पुरेसे आहे. मसूर डाळ कुकरपेक्षा खुल्या भांड्यात (पातेल्यात) कमी गॅसवर शिजवणे जास्त चांगले मानले जाते. डाळ शिजल्यानंतर शेवटी त्यात लिंबू किंवा टोमॅटो टाकावा, जेणेकरून डाळीतील आयर्न शरीरात चांगल्या प्रकारे शोषले जाईल. डाळ उकळायला लागल्यावर त्यावर येणारा पांढरा फेस काढून टाकावा, यामुळे युरिक ॲसिडची समस्या कमी होते. डाळ पूर्ण शिजत आल्यावरच मीठ टाकावे. सुरुवातीला मीठ टाकल्याने डाळ शिजायला जास्त वेळ लागतो. डाळ शिजताना हळद आणि थोडे तेल टाकल्याने डाळीला रंग छान येतो आणि कुकरच्या शिट्टीतून पाणी बाहेर येत नाही.

३. चणा डाळ :- चणा डाळीमध्ये फायबर आणि प्रोटीन चांगल्या प्रमाणात असतात. चणा डाळ किमान १ तास भिजवणं आवश्यक आहे. त्यानंतर ती प्रेशर कुकरमध्ये मध्यम आचेवर शिजवा. लक्षात ठेवा की जास्त शिट्ट्या करु नका, नाहीतर डाळ खूप मऊ होऊन तिचे टेक्श्चर बिघडू शकते.  

Summer Special : न लाटता करा बटाट्याचे पापड, करायला सोपे आणि तेलात टाकताच फुलतात चौपट-पाहा पारंपरिक रेसिपी...

४. मूग डाळ :- मूग डाळ हलकी असते आणि सहज पचते. ही डाळ भिजवली नाही तरीही बनवता येते. मात्र ती नेहमी मंद आचेवर शिजवावी. जास्त शिजवल्यास तिचे पोषक घटक कमी होऊ शकतात.

५. अख्खा मसूर :- अख्खा मसूर हा चवीला अतिशय अप्रतिम आणि दिसायलाही तितकाच आकर्षक लागतो. अख्खा मसूर शिजवण्यापूर्वी किमान १५ मिनिटे ते १ अर्धा तास कोमट पाण्यात भिजत ठेवावा. जर तुम्ही कुकरमध्ये शिजवणार असाल, तर मध्यम आचेवर फक्त २ ते ३ शिट्ट्या कराव्यात. जास्त शिट्ट्या केल्यास मसुराचे साल वेगळे होऊन त्याचा लगदा होऊ शकतो. जास्त चांगली चव हवी असेल तर मसूर मंद आचेवर पातेल्यात शिजवावा. यामुळे दाणे संपूर्ण राहतात आणि चवही टिकून राहते. जर तुम्ही या सोप्या पद्धती वापरल्या, तर तुमची डाळ केवळ चविष्टच नाही तर तिचे पोषक घटकही टिकून राहतील.

Web Title : स्वादिष्ट दाल, आमटी के लिए दाल को सही तरीके से भिगोएँ और पकाएँ।

Web Summary : विभिन्न दालों को सर्वोत्तम स्वाद और पोषण के लिए विशिष्ट भिगोने और पकाने के समय की आवश्यकता होती है। यह गाइड तूर, मसूर, चना, मूंग और साबुत मसूर दालों को कवर करती है। स्वादिष्ट और स्वस्थ व्यंजन के लिए प्रत्येक को तैयार करने का तरीका जानें।

Web Title : Soak and cook lentils right for tasty dal, amti recipes.

Web Summary : Different lentils need specific soaking and cooking times for best taste and nutrition. This guide covers tur, masoor, chana, moong, and whole masoor dals. Learn how to prepare each for delicious and healthy dishes.