Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > Summer Special : न लाटता करा बटाट्याचे पापड, करायला सोपे आणि तेलात टाकताच फुलतात चौपट-पाहा पारंपरिक रेसिपी...

Summer Special : न लाटता करा बटाट्याचे पापड, करायला सोपे आणि तेलात टाकताच फुलतात चौपट-पाहा पारंपरिक रेसिपी...

batata papad recipe : Batata Papad Recipe : How to make Batata Papad at home : अत्यंत सोप्या पद्धतीने, तोंडात टाकताच विरघळतील असे बटाट्याचे पापड करण्याची पारंपरिक रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2026 15:17 IST2026-04-16T15:14:24+5:302026-04-16T15:17:45+5:30

batata papad recipe : Batata Papad Recipe : How to make Batata Papad at home : अत्यंत सोप्या पद्धतीने, तोंडात टाकताच विरघळतील असे बटाट्याचे पापड करण्याची पारंपरिक रेसिपी...

batata papad recipe Batata Papad Recipe How to make Batata Papad at home | Summer Special : न लाटता करा बटाट्याचे पापड, करायला सोपे आणि तेलात टाकताच फुलतात चौपट-पाहा पारंपरिक रेसिपी...

Summer Special : न लाटता करा बटाट्याचे पापड, करायला सोपे आणि तेलात टाकताच फुलतात चौपट-पाहा पारंपरिक रेसिपी...

उन्हाळा सुरू झाला की, बहुतेक घरांच्या गच्चीवर किंवा बाल्कनीत एकच लगबग पाहायला मिळते, ती म्हणजे वाळवणाची... कुरडया, सांडगे आणि पापड यांच्याशिवाय आपला उन्हाळा पूर्णच होऊ शकत नाही. या सर्व प्रकारांमध्ये बच्चेकंपनीपासून थोरामोठ्यांपर्यंत सर्वांचाच जीव ज्या पदार्थात अडकलेला असतो, तो म्हणजे 'बटाट्याचे पापड'. कुरकुरीत, चविष्ट आणि दीर्घकाळ टिकणारे हे पापड आपल्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहेत. आई-आजीने उन्हात घातलेली पांढरीशुभ्र वाळवणं आणि त्यातही तो बटाट्याचा कुरकुरीत, खुसखुशीत पापड म्हणजे याहून मोठं सुखं नाहीच...उपवासाला चालणारे, चवीला चटपटीत आणि तळल्यावर कुरकुरीत लागणारे बटाटा पापड म्हणजे घरातील प्रत्येकाचाच विशेष आवडता पदार्थ(How to make Batata Papad at home).

जेवणाच्या ताटात कितीही पदार्थ असले, तरी कोपऱ्यात एखादा तळलेला बटाट्याचा पापड असल्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखे वाटतच नाही. उपवासाचा फराळ असो किंवा दुपारची छोटीशी  भूक, वाळवणाच्या पदार्थांतील बटाटा पापड नेहमीच सगळ्यांचेच 'ऑल टाईम फेव्हरिट' असतात. ना सोडा, ना जास्त सामानाचा पसारा, ना तेलाचा थेंब तरीही बटाट्याचे पापड अगदी चविष्ट होतील. अत्यंत सोप्या पद्धतीने, तोंडात टाकताच विरघळतील असे (Batata Papad Recipe) बटाट्याचे पापड करण्याची सोपी पारंपरिक रेसिपी...

साहित्य :- 

१. बटाटे - १ किलो 
२. हिरव्या मिरचीची पेस्ट - १ ते २ टेबलस्पून 
३. मीठ - चवीनुसार
४. पाणी - गरजेनुसार 
५. जिरे - १ टेबलस्पून 

आंबे फ्रिजमध्ये ठेवावेत की पारंपरिक अढीच लावलेली बरी! आंबे आणतात ‘ही’ १ चूक टाळा...


इडली-डोशाच्या पिठावर 'वि़ड्याचे पान' ठेवा आणि कमाल पहा! इडल्या मऊलुसलुशीत तर डोसा होईल कुरकुरीत... 

कृती :- 

१. सगळ्यांतआधी बटाटे ३ ते ४ वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत. 
२. आता प्रेशर कुकरमध्ये गरजेनुसार पाणी घेऊन त्यात हे बटाटे ठेवून ५ ते ६ शिट्ट्या काढून व्यवस्थित उकडवून घ्यावेत. 
३. उकडलेले बटाटे एका डिशमध्ये काढून थोडे थंड होताच त्याची सालं काढून ते किसणीवर किसून त्याचा लगदा तयार करून घ्यावा. 
४. बटाट्याचा किस जितक्या प्रमाणांत आहे त्याच्या दुप्पट प्रमाणांत पाणी घ्यावं, ते व्यवस्थित उकळवून घ्यावं. 
५. पाण्याला उकळी आल्यावर त्यात चवीनुसार हिरव्या मिरचीची पेस्ट, मीठ, जिरे घालून सगळे जिन्नस पाण्यांत कालवून एकजीव करून घ्यावे. 

६. मग या पाण्यांत बटाट्याचा लगदा घालून चमच्याने गुठळ्या मोडून पापड तयार करण्यासाठीचे बॅटर तयार करुन घ्यावे. 
७. मिश्रणावर झाकण ठेवून एक उकळी काढावी आणि ६ ते १० मिनिटे मिश्रण व्यवस्थित मंद आचेवर शिजवून घ्यावे. 

पापड कसे घालावेत ? 

एक स्वच्छ सुती कापड किंवा प्लास्टिक अंथरून त्यावर पळीच्या मदतीने तयार मिश्रणाचे गोलाकार पापड घालावेत. २ ते ३ दिवस हे पापड कडक उन्हात व्यवस्थित वाळवून घ्यावेत. पापड सुती कापडाला चिकटले तर कापड उलट करून, उलट बाजूवर हलकेच थोडं पाणी शिंपडून घ्यावं. मग हळूहळू अलगद हाताने सुती कापडाला चिकटलेले पापड काढून घ्यावेत आणि पुन्हा ३ ते ४ दिवस उन्हांत नीट वाळवून घ्यावेत. 

संपूर्णपणे व्यवस्थित वाळलेले बटाट्याचे पापड एका हवाबंद डब्यांत भरुन वर्षभरासाठी स्टोअर करुन ठेवावेत. पाहिजे तसे आपल्या आवडीनुसार गरम तेलात खरपूस तळून हे कुरकुरीत पापड आपण कधीही खाऊ शकता. इतकेच नाही तर उपवासाला देखील आपण हे बटाटा पापड खाऊ शकता.

Web Title: batata papad recipe Batata Papad Recipe How to make Batata Papad at home