Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > बाजारातील महागडे वेफर्स विसराल! घरीच करा कुरकुरीत 'कोथिंबीर पापडी' - मुलांनाही आवडेल चटपटीत पदार्थ...

बाजारातील महागडे वेफर्स विसराल! घरीच करा कुरकुरीत 'कोथिंबीर पापडी' - मुलांनाही आवडेल चटपटीत पदार्थ...

Kothimbir Papadi Recipe : Coriander Special Papdi Snacks for tea time : Crispy Kothimbir Papdi Recipe : फारशी मेहेनत न घेता आणि झटपट होणारी कोथिंबीर पापडी, उन्हाळ्यातील सुट्ट्यांसाठी बेस्ट खाऊ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2026 16:03 IST2026-05-05T15:52:28+5:302026-05-05T16:03:32+5:30

Kothimbir Papadi Recipe : Coriander Special Papdi Snacks for tea time : Crispy Kothimbir Papdi Recipe : फारशी मेहेनत न घेता आणि झटपट होणारी कोथिंबीर पापडी, उन्हाळ्यातील सुट्ट्यांसाठी बेस्ट खाऊ...

Coriander Special Papdi Snacks for tea time Kothimbir Papadi Recipe Crispy Kothimbir Papdi Recipe | बाजारातील महागडे वेफर्स विसराल! घरीच करा कुरकुरीत 'कोथिंबीर पापडी' - मुलांनाही आवडेल चटपटीत पदार्थ...

बाजारातील महागडे वेफर्स विसराल! घरीच करा कुरकुरीत 'कोथिंबीर पापडी' - मुलांनाही आवडेल चटपटीत पदार्थ...

उन्हाळ्याची सुट्टी सुरु झाली की घरात मुलांची एकच लगबग सुरु होते. सुट्टी म्हटलं की नुसतं खा, मज्जा मस्ती करा. मुलांना खायला काहीतरी चटपटीत, चमचमीत आणि कुरकुरीत हवं असतं. अशा वेळी पारंपारिक आणि घरगुती पदार्थांचा पर्याय नेहमीच सर्वोत्तम ठरतो. त्यातच कुरकुरीत, चटपटीत आणि सुगंधी अशी कोथिंबीर पापडी हा एक खास उन्हाळ्यातील खाऊ आहे, जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. ताजी कोथिंबीर, हलक्या मसाल्यांचा वापर आणि कुरकुरीत टेक्स्चर यामुळे हा पदार्थ चवीला तर अप्रतिम लागतोच, पण बनवायलाही सोपा असतो. विशेष म्हणजे, हा खाऊ साठवून ठेवता येतो, त्यामुळे कधीही चटकन खाण्यासाठी तयार असतो. बाजारात मिळणारे वेफर्स सोडा आणि घरीच बनवा खास कोथिंबीर पापडी(Kothimbir Papadi Recipe).

एकदा बनवली की महिने - दोन महिने कसलंच  टेन्शन नाही...अनेकांना वाटतं की पापडी बनवणं म्हणजे खूप वेळखाऊ काम आहे. पण कोथिंबीर पापडी बनवण्याची एक अशी सोपी पद्धत आहे, ज्यामुळे तुमचा वेळही वाचेल आणि पापड्या एकदम खुसखुशीत होतील. विकतचे वेफर्स किंवा तळलेले पदार्थ खाण्यापेक्षा घरच्या घरी नैसर्गिक (Coriander Special Papdi Snacks for tea time) पद्धतीने बनवलेली ही कोथिंबीर पापडी आरोग्यासाठीही उत्तम आहे. जर तुम्हालाही उन्हाळ्यात काहीतरी वेगळं आणि टेस्टी ट्राय करायचं असेल, तर कोथिंबीर पापडी ही रेसिपी नक्कीच तुमच्यासाठी परफेक्ट ठरेल, ही सोपी आणि (Crispy Kothimbir Papdi Recipe) झटपट बनणारी रेसिपी पाहूयात. 

साहित्य :-

१. गव्हाचे पीठ - ४ कप 
२. बारीक रवा - १ कप 
३. काश्मिरी लाल तिखट - २ टेबलस्पून
४. धणे पावडर - २ टेबलस्पून
५. जिरेपूड - १ टेबलस्पून
६. ओवा - १ टेबलस्पून
७. कलोंजी - १ टेबलस्पून
८. कोथिंबीर - ४ कप (बारीक चिरलेली)
९. तेल - २ टेबलस्पून + तळण्यासाठी
१०. मीठ - चवीनुसार

ताज्या रसाळ आंब्याचे करा पिवळेधमक मँगो रवा लाडू, उन्हाळ्यातला सुपरहिट पदार्थ-पाहा लाडू रेसिपी...


शेवग्याच्या शेंगांचं भरीत  करा आणि खा चमचमीत पौष्टिक पदार्थ, गावरान चवीचा ठसका - पाहा रेसिपी...

कृती :- 

१. एका मोठ्या परातीत किंवा बाऊलमध्ये गव्हाचे पीठ, बारीक रवा, काश्मिरी लाल तिखट, धणे पावडर, जिरेपूड, ओवा, कलोंजी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. 
२. सगळ्यात शेवटी या मिश्रणात चवीनुसार मीठ आणि थोडं गरम तेल घालावं. 
३. मग गरजेनुसार थोडं - थोडं पाणी घालून पापडीसाठीचे पीठ मळून घ्यावं. 

अस्सल गावरान चवीचं, भरपूर कांदा घातलेलं 'इन्स्टंट कांद्याचं थालीपीठ' कसं करायचं, पाहा रेसिपी...

४. मळून घेतलेल्या पिठाचे मध्यम आकाराचे गोळे चपातीप्रमाणेच लाटून घ्यावे.
५. लाटून घेतलेल्या चपातीवर गोलाकार डिश किंवा झाकणाच्या आकाराने छोट्या पुरी तयार करुन घ्याव्यात.    
६. कढईत तेल घेऊन पुऱ्या सोडून खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्याव्यात. 

कोथिंबीर पापडी खाण्यासाठी तयार आहे.

Web Title : बाजार के वेफर्स भूल जाइये! घर पर बनाएं कुरकुरी धनिया पापड़ी

Web Summary : घर पर स्वादिष्ट कोथिंबीर पापड़ी बनाएं! यह कुरकुरा, स्वादिष्ट स्नैक बच्चों और बड़ों के लिए एकदम सही है। यह बनाने और स्टोर करने में आसान है। बाजार से खरीदे गए वेफर्स का एक बढ़िया विकल्प, यह घर का बना नाश्ता स्वास्थ्यवर्धक और स्वादिष्ट है। रेसिपी अंदर!

Web Title : Forget wafers! Make crispy, flavorful coriander 'papdi' at home easily.

Web Summary : Make delicious Kothimbir Papdi at home! This crispy, flavorful snack is perfect for kids and adults. It's easy to make and store. A great alternative to store-bought wafers, this homemade treat is healthier and tastier. Recipe inside!