सकाळच्या कामाच्या घाई - गडबडीत गरमागरम थालीपीठ आणि सोबतीला लोण्याचा गोळा असा नाश्ता असेल तर दिवसाची सुरुवात अगदी छान होते. बरेचदा आपल्याला थालीपीठ खाण्याची इच्छा होते परंतु भाजणी संपलेली असते. अशावेळी नेमकं काय करायचं सुचत नाही, पण भाजणी शिवाय देखील आपण तितकंच चविष्ट आणि खमंग, खुसखुशीत थालीपीठ अगदी पटकन करू शकतो. भाजणीशिवायही तुम्ही अगदी चमचमीत, खुसखुशीत कांद्याचं थालीपीठ सहज बनवू शकता. कमी साहित्य, सोपी पद्धत आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या भुकेसाठी परफेक्ट ठरते(Kandyache Thalipeeth Recipe).
कांद्याचं थालीपीठ म्हटलं की त्यातून येणारा खमंग वास आणि प्रत्येक (Onion Thalipeeth) घासाला मिळणारा कांद्याचा गोडवा काही वेगळाच असतो. झटपट बनणारं, कमी साहित्यांत होणारं आणि प्रत्येक घासात समाधान देणारं हे थालीपीठ घरातील प्रत्येकाच्याच आवडीचं होईल. अस्सल गावरान चवीचं, भरपूर कांदा घातलेलं 'इन्स्टंट कांद्याचं थालीपीठ' कसं (How To Make Kandyache Thalipeeth At Home) करायचं याची साधीसोपी रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. हिरव्या मिरच्या - ३ ते ४ मिरच्या
२. आलं - १ छोटा तुकडा
३. लसूण - ६ ते ७ पाकळ्या
४. धणे - १ टेबलस्पून
५. बडीशेप - १ टेबलस्पून
६. ओवा - १ टेबलस्पून
७. गव्हाचं पीठ - १ कप
८. ज्वारीचं पीठ - १/२ कप
९. बेसन - १/२ कप
१०. तांदुळाचे पीठ - २ टेबलस्पून
११. कांदा - १ कप (उभा चिरलेला)
१२. कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
१३. हळद - १/२ टेबलस्पून
१४. लाल तिखट मसाला - १/२ टेबलस्पून
१५. मीठ - चवीनुसार
१६. तेल - २ ते ४ टेबलस्पून
१७. पाणी - गरजेनुसार
१८. पांढरे तीळ - २ टेबलस्पून
वेटलॉस करताना आंबा खा मनसोक्त! दिवसाला किती आणि कधी आंबा खावा? पोटभर खाऊनही वाढणार नाही वजन...
पाण्याच्या टाकीत 'या' झाडाची लहानशी फांदी घाला, दुर्गंधी येणार नाही-शेवाळं साचणार नाही...
कृती :-
१. सगळ्यात आधी खलबत्यात किंवा मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, धणे, बडीशेप, ओवा असे सगळे जिन्नस एकत्रित घेऊन त्याची वाटून थोडी मध्यम जाडसर अशी पेस्ट तयार करून घ्यावी.
२. एका मोठ्या भांड्यात गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, बेसन, तांदुळाचे पीठ एकत्रित करून घ्यावं या मिश्रणात, मिक्सरमध्ये वाटून घेतलेली जाडसर हिरव्या मिरच्या लसणाची पेस्ट, उभा चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद, लाल तिखट मसाला, चवीनुसार मीठ, तेल, पांढरे तीळ घालून गरजेनुसार पाणी घालत थालीपिठाचं पीठ मळून घ्यावं.
आंबा न कापताच ओळखा तो चवीला गोड की आंबट? ८ ट्रिक्स - आंबा खरेदी करताना करू नका 'या' चुका...
३. रुमाल किंचित पाणी शिंपडून हलका ओला करून घ्यावा मग त्यावर थालीपीठाचं पीठ ठेवून थालीपीठ थापून घ्यावं.
४. गरम पॅनला थोडं तेल लावून त्यावर हे थालीपीठ टाकून दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्यावं.
मस्त गरमागरम असे भाजणीशिवाय भरपूर कांदा घालून केलेलं खमंग, खुसखुशीत थालीपीठ खाण्यासाठी तयार आहे. चटणी किंवा लोण्यासोबत थालीपीठ खाण्यासाठी सर्व्ह करावं.
