Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > आंबा न कापताच ओळखा तो चवीला गोड की आंबट? ८ ट्रिक्स - आंबा खरेदी करताना करू नका 'या' चुका...

आंबा न कापताच ओळखा तो चवीला गोड की आंबट? ८ ट्रिक्स - आंबा खरेदी करताना करू नका 'या' चुका...

how to pick sweet mangoes : how to check mango sweetness before buying : tips to select sweet mango : बाजारात आंबा विकत घेताना वापरा या ट्रिक्स, नेहमी मिळतील गोडच आंबे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2026 16:19 IST2026-04-27T16:15:26+5:302026-04-27T16:19:22+5:30

how to pick sweet mangoes : how to check mango sweetness before buying : tips to select sweet mango : बाजारात आंबा विकत घेताना वापरा या ट्रिक्स, नेहमी मिळतील गोडच आंबे...

how to pick sweet mangoes how to check mango sweetness before buying tips to select sweet mango | आंबा न कापताच ओळखा तो चवीला गोड की आंबट? ८ ट्रिक्स - आंबा खरेदी करताना करू नका 'या' चुका...

आंबा न कापताच ओळखा तो चवीला गोड की आंबट? ८ ट्रिक्स - आंबा खरेदी करताना करू नका 'या' चुका...

उन्हाळा सुरू झाला की वेध लागतात ते रसाळ आणि गोड आंब्यांचे! पण आंबा विकत घेताना 'हा आंबा चवीला गोड असेल का?' ही धास्ती प्रत्येकाच्याच मनात असते. अनेकदा आपण रंग आणि आकार पहातो आणि फसतो. बाहेरून पिवळाधमक दिसणारा प्रत्येक आंबा गोड असतोच असं नाही...आजकाल आंबे पिकवण्यासाठी केमिकल्सचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो, ज्यामुळे आंबा दिसायला सुंदर असतो पण चवीला मात्र बेचव लागतो(how to pick sweet mangoes).

उन्हाळा आला की बाजारात पिवळ्याधम्मक दिसणाऱ्या (tips to select sweet mango) आंब्यांची रेलचेल सुरू होते आणि गोड, रसाळ आंबा खाण्याची इच्छा प्रत्येकालाच होते. पण अनेकदा आंबा बाहेरून छान दिसला तरी आतून तो आंबट किंवा बेचव निघतो, त्यामुळे सगळा मूडच बिघडतो. यासाठीच आंबा कापण्याआधीच तो गोड आहे की नाही हे ओळखता आलं, तर खरेदी करताना योग्य निवड करता येते. काही सोप्या टिप्स लक्षात ठेवल्या, तर तुम्ही सहजपणे गोड आणि चविष्ट आंबा निवडू शकता. आंबा न कापताच (how to check mango sweetness before buying) तो गोड आहे की आंबट हे कसं ओळखायचं यासाठी काही खास टिप्स... 

आंबा न कापताच तो गोड आहे की आंबट हे कसं ओळखायचं ? 

१. आंब्याचा सुगंध घ्या :- आंबा गोड आहे की नाही हे ओळखण्याची सर्वात खात्रीशीर पद्धत म्हणजे त्याचा सुगंध. आंब्याच्या देठाच्या बाजूला वास घेऊन पहा. जर तिथून गोड, फळाचा आणि नैसर्गिक सुगंध येत असेल, तर तो आंबा पिकलेला आणि गोड आहे. जर वासच येत नसेल किंवा कुबट वास येत असेल, तर तो आंबा कच्चा किंवा केमिकल्सने पिकवलेला असू शकतो.

२. स्पर्श करून पहा :- आंबा हातात घेऊन हलकासा दाबून पहा. तो खूप कडक नसावा आणि खूप मऊ देखील नसावा. तो थोडासा लवचिक असावा. खूप कडक आंबा म्हणजे तो कच्चा आहे आणि खूप मऊ आंबा म्हणजे तो आतून खराब असण्याची शक्यता असते.

उन्हाळ्यात कांदा महिनाभर टिकवण्याचे सिक्रेट! उकाड्यातही कांदा राहील फ्रेश - सडणार नाही आणि कोंबही फुटणार नाही... 

३. आंब्याच्या सालीचा पोत :- आंब्याच्या सालीवर खूप जास्त सुरकुत्या नसाव्यात. आंबा गुळगुळीत आणि साफ सालीचा असावा. सालीवर जर थोडे पांढरट डाग किंवा नैसर्गिक डिंकाचे डाग असतील, तर तो नैसर्गिकरीत्या झाडावर पिकलेला गोड आंबा असण्याचे लक्षण आहे.

४. वजन तपासा :- एकसारख्या आकाराचे दोन आंबे हातात घेऊन पहा. जो आंबा वजनाला जास्त जड वाटेल, तो जास्त रसाळ आणि गोड असण्याची शक्यता असते. हलका आंबा अनेकदा आतून कोरडा किंवा नीट न पिकलेला असतो.

नवा असो वा जुना, माठ स्वच्छ करण्याची इन्स्टंट ट्रिक! रणरणत्या उन्हातही माठातलं पाणी राहील बर्फासारखं थंडगार... 

५. देठाचा भाग तपासा :- आंब्याचा देठाकडचा भाग थोडा खोलवर गेलेला असावा. जर देठाच्या भोवतीची जागा वर आलेली किंवा सपाट असेल, तर तो आंबा नीट पिकलेला नसतो. देठाजवळून आंबा भरलेला आणि फुगीर दिसला तर समजून जावे की तो रसाळ आणि गोड आहे.

६. पाण्यांत टाकून पाहा :- जर तुम्हाला शंका असेल की आंबा नैसर्गिकरीत्या पिकला आहे की नाही, तर तो एका बादलीभर पाण्यात टाकून पहा. जो आंबा तळाला जाऊन बसेल, तो नैसर्गिकरीत्या पिकलेला आणि गोड असतो. याउलट, जो आंबा पाण्यावर तरंगतो, तो अर्धवट पिकलेला किंवा केमिकल्स वापरून पिकवलेला असण्याची शक्यता जास्त असते.

७. रंगातील नैसर्गिक छटा :- केवळ एकसारखा पिवळा रंग म्हणजे आंबा गोड असं नसतं. नैसर्गिकरीत्या पिकलेल्या आंब्यावर हिरव्या आणि पिवळ्या रंगाच्या छटा मिसळलेल्या दिसतात. जर पूर्ण आंबा एकसारखा गडद पिवळा किंवा केशरी दिसत असेल, तर तो 'कॅल्शियम कार्बाइड' वापरून पिकवलेला असू शकतो.

८. आकाराचे निरीक्षण करा :- आंबा जितका फुगीर आणि गोलाकार असेल, तितका तो अधिक मांसल आणि गोड असतो. जर आंबा चपटा किंवा खूप जास्त लांबट असेल, तर त्यात कोय मोठी असू शकते आणि रस कमी निघतो.

Web Title : मीठा या खट्टा? सही आम चुनने के 8 आसान तरीके

Web Summary : मीठे आम चुनना मुश्किल हो सकता है। तने के पास फल की खुशबू जांचें। आम थोड़ा नरम होना चाहिए, बहुत कठोर या नरम नहीं। प्राकृतिक रंग भिन्नता और एक गोल आकार देखें। वजन और पानी में डूबना मिठास का संकेत देते हैं।

Web Title : Sweet or Sour? 8 Tricks to Pick the Perfect Mango

Web Summary : Picking sweet mangoes can be tricky. Check the aroma near the stem for a fruity scent. The mango should be slightly soft, not too hard or mushy. Look for natural color variations and a plump shape. Weight and sinking in water indicate sweetness.