उन्हाळ्यात मातीचा माठ म्हणजे घराघरातील 'नॅचरल फ्रिज'! रणरणत्या उन्हाळ्याच्या दिवसाच्या थंडगार आणि नैसर्गिक पाणी मिळावं म्हणून घराघरांत मातीचा माठ वापरला जातो. पण या माठाची योग्य पद्धतीने स्वच्छता केली नाही, तर त्यामध्ये घाण, बुरशी किंवा वास येऊ शकतो, ज्याचा थेट परिणाम पाण्याच्या चवीवर आणि आपल्या आरोग्यावर होतो. त्यामुळे माठ नियमितपणे आणि योग्य पद्धतीने स्वच्छ करणं अत्यंत गरजेचं आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत मातीच्या माठातलं थंडगार पाणी पिण्याची मजा काही औरच असते. पण, यासोबतच माठाची स्वच्छता करणं देखील तितकंच गरजेचं असतं...(how to clean clay pot with salt).
अनेकजण माठ स्वच्छ करण्यासाठी साबण किंवा डिटर्जंटचा वापर करतात, पण ही सर्वात मोठी चूक ठरू शकते! मातीचा माठ स्वच्छ करण्याची एक विशिष्ट पद्धत असते, ज्यामुळे त्यातील नैसर्गिक गारवा टिकून राहतो आणि पाण्याची शुद्धताही कायम राहते. विशेष म्हणजे, घरच्याघरीच काही सोप्या आणि नैसर्गिक उपायांनी (cleaning matka at home naturally) माठ सहज स्वच्छ करता येतो. योग्य पद्धतीने माठ धुतल्यास तो अधिक काळ टिकतो आणि पाण्याची चवही ताजी राहते. माठाला साबण न लावता (how to wash earthen pot properly) नैसर्गिकरित्या घरच्याघरीच कसं धुवावं आणि त्याची छिद्रे कशी मोकळी करावीत, याच्या काही खास 'किचन ट्रिक्स' पाहूयात, ज्यामुळे माठातील पाणी राहील (natural ways to clean matka) नेहमी फ्रेश आणि थंडगार...
मातीचा माठ घरच्याघरीच धुण्याची योग्य पद्धत...
अनेकदा आपल्याला असं वाटतं की, नवा माठ स्वच्छ करण्याची आणि जुना माठ घासून धुण्याची पद्धत वेगवेगळी असावी. मात्र, पूनम देवनानी यांच्या मते, माठ नवा असो वा जुना, तो स्वच्छ करण्याची मूळ पद्धत एकसारखीच असते. माठ स्वच्छ करण्यामागचा मुख्य उद्देश हा त्यावरील सूक्ष्म छिद्रे (Pores) मोकळी करणे हा असतो. या छिद्रांमधूनच पाणी पाझरून बाहेर येते आणि बाष्पीभवनाच्या प्रक्रियेद्वारे माठातील पाणी नैसर्गिकरित्या थंड होण्यास मदत होते.
माठात हात घालण्याची चूक कधीही करू नका!
जर तुम्ही माठ स्वच्छ करताना त्याच्या आत हात घालून तो घासण्याचा प्रयत्न करत असाल, तर पूनम देवनानी यांच्या मते, ही सर्वात मोठी चूक आहे. आपल्या हातावरील चिकटपणा आणि घाम माठाच्या आतील सूक्ष्म छिद्रांना बंद करू शकतो. माठ स्वच्छ करण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे तो पाण्याने भरून, जोरात हलवून धुणे. माठाच्या आतील भागाला कधीही कोणताही स्क्रबर, घासणी किंवा हात लावू नका.
माठ धुतल्यानंतर नेमकं काय करावं ?
माठ साध्या पाण्याने धुतल्यानंतर तो लगेच वापरण्यास सुरुवात करू नका. सर्वातआधी माठ पूर्णपणे पाण्याने भरून घ्या आणि शक्य असल्यास तो पाण्याने भरलेल्या मोठ्या बादलीत २४ तासांसाठी तसाच ठेवून द्या. ही पद्धत नवीन माठाची माती स्थिर करण्यास मदत करते आणि जुन्या माठातील साचलेली घाण सैल करते. २४ तासांनंतर हे पाणी फेकून द्या; लक्षात ठेवा, हे पाणी पिण्यासाठी वापरू नका.
मिठाचा वापर....
माठाच्या बाहेरील भागावर अनेकदा पांढरा थर जमा होतो, जो पाणी थंड होण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण करतो. हा थर घालवण्यासाठी माठाच्या बाहेरील भागावर साधे मीठ टाका आणि ते नीट घासून स्वच्छ करा. मीठ हे एका नैसर्गिक 'क्लींजर'प्रमाणे काम करते. माठाच्या आतील स्वच्छतेसाठी देखील थोडे मीठ टाकून पाण्याने नीट स्वच्छ धुवून घ्या. पण लक्षात ठेवा, आतून स्वच्छ करताना हात किंवा ब्रशने चुकूनही घासू नका.
ब्रेसियरमध्ये एकापुढे एक तीनच हुक का असतात? महिलांना माहीतच नसते खरे कारण...
सुती कापड गुंडाळा...
माठ नीट धुवून आणि स्वच्छ पाण्याने भरल्यानंतर, त्याच्या बाहेरील भागावर एक सुती कापड गुंडाळा. हा सर्वात पारंपारिक आणि अत्यंत फायदेशीर उपाय आहे. सुती कापड माठाच्या बाहेरील पृष्ठभागावर ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते. हे कापड वेळोवेळी ओले करत राहा. जसे कापडातील पाणी सुकू लागते, तसे ते माठाच्या आतील उष्णता बाहेर खेचून घेते, ज्यामुळे माठातील पाणी एकदम थंडगार राहते.
माठ ठेवण्याची योग्य जागा...
फक्त स्वच्छताच नाही, तर माठ कुठे ठेवला आहे ही गोष्ट देखील तितकीच महत्त्वाची असते. माठ नेहमी अशा ठिकाणी ठेवावा जिथे हवेची ये-जा चांगली असेल. खिडकीपाशी किंवा मोकळ्या जागेत माठ ठेवल्यामुळे बाष्पीभवनाची प्रक्रिया वेगवान होते. जर तुम्ही माठ एखाद्या बंद कोपऱ्यात किंवा हवा नसलेल्या ठिकाणी ठेवला, तर तो कितीही स्वच्छ असला तरी पाणी फ्रिजसारखे थंड होऊ शकणार नाही.
उन्हाळ्यात जास्त प्रमाणांत वापरला जाणारा मातीचा माठ घरच्याघरीच नैसर्गिक पद्धतीने स्वच्छ कसा करायचा याची साधीसोपी ट्रिक Masala Kitchen by Poonam Devnani या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे.
