Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > ताकातली गवार.. एकदा ‘अशी’ खा गवारीच्या शेंगांची भाजी- पारंपरिक सात्विक चव

ताकातली गवार.. एकदा ‘अशी’ खा गवारीच्या शेंगांची भाजी- पारंपरिक सात्विक चव

cluster beans recipe , easy to make and tasty too, must try recipes, easy to cook : ताकातील गवारीची भाजी करा झटपट, पाहा रेसिपी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2026 14:16 IST2026-04-27T14:13:44+5:302026-04-27T14:16:29+5:30

cluster beans recipe , easy to make and tasty too, must try recipes, easy to cook : ताकातील गवारीची भाजी करा झटपट, पाहा रेसिपी.

cluster beans recipe , easy to make and tasty too, must try recipes, easy to cook | ताकातली गवार.. एकदा ‘अशी’ खा गवारीच्या शेंगांची भाजी- पारंपरिक सात्विक चव

ताकातली गवार.. एकदा ‘अशी’ खा गवारीच्या शेंगांची भाजी- पारंपरिक सात्विक चव

गवारीची भाजी विविध पद्धतीने करता येते, घरोघरी वेगळ्या प्रकारे ही भाजी करतात. लहान मुलांनाही आवडतील अशा अनेक गवार रेसिपी आहेत. (cluster beans recipe , easy to make and tasty too, must try recipes, easy to cook )ज्या करायलाही सोप्या आहेत आणि मस्त लागतात. गवार शक्यतो परतून केली जाते पण कधी ताकातली गवार खाल्ली का ? फारच सोपी रेसिपी आहे पण एकदम हटके लागते. ताक जरा आंबट वापरलं तर चव अजून छान लागते. पाहा सोपी रेसिपी. 

साहित्य 
गवार, ताक, तेल, जिरे, लाल तिखट, लसूण, हळद, गरम मसाला, मीठ, हिरवी मिरची, कोथिंबीर, दाण्यांचे कुट 

कृती
१. छान ताजी गवार मोडून घ्यायची. स्वच्छ धुवायची. त्याचे तुकडे अगदी लहान न करता मध्यम करायचे. लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. त्या मिक्सरच्या भांड्यात घालायच्या. तसेच त्यात थोडं लाल तिखट घाला, थोडी कोथिंबीरही  आणि वाटण तयार होण्यापुरतं अगदी थोडं पाणी घाला, पेस्ट वाटून घ्या. 

२. कोथिंबीर बारीक चिरुन घ्यायची. हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करायचे. एका कुकरमध्ये तेल घ्यायचे. तेल छान गरम झाले की त्यात जिरे घालायचे. जिरं मस्त तडतडलं की त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घआलायचे आणि नंतर तयार केलेली लाल तिखट, लसणाची  पेस्ट घालायची. छान परतून घ्या. नंतर त्यात गवार घाला आणि जरा परतून घ्या. 

३. त्यात ताक घालायचे. तसेच गरम मसाला घालायचा मग चवीनुसार मीठ घालायचे. चमचाभर हळद घालायची. गरम मसाला घालायचा आणि थोडं दाण्याचं कुट घाला. कोथिंबीर घालायची. कुकरचं झाकण लावायचं आणि मस्त शिट्या काढून घ्यायच्या. कुकर उघडला की भाजी जरा घट्ट आणि मऊ होते. गरमागरम भाजी भात किंवा भाकरी तसेच चपातीसोबत खा.  

Web Title : छाछ वाली ग्वार: एक पारंपरिक, सरल और स्वादिष्ट रेसिपी।

Web Summary : छाछ का उपयोग करके एक अनोखी ग्वार फली की रेसिपी खोजें! इस सरल व्यंजन में ग्वार फली को मसालों के साथ भूनकर, फिर छाछ में मूंगफली पाउडर और धनिया के साथ पकाया जाता है। चावल या रोटी के साथ इस स्वादिष्ट, पारंपरिक सब्जी का आनंद लें।

Web Title : Buttermilk Cluster Beans: A traditional, simple, and flavorful recipe.

Web Summary : Discover a unique cluster beans recipe using buttermilk! This simple dish involves sautéing cluster beans with spices, then cooking them in buttermilk with peanut powder and coriander. Enjoy this flavorful, traditional vegetable with rice or roti.