Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > एकाच प्रकारची आमटी खाऊन कंटाळा आला ?..करा वाटण लावलेली झणझणीत शेंगदाणा आमटी ..खा काहीतरी वेगळं - हटके

एकाच प्रकारची आमटी खाऊन कंटाळा आला ?..करा वाटण लावलेली झणझणीत शेंगदाणा आमटी ..खा काहीतरी वेगळं - हटके

Bored of eating the same kind of amtti?..try spicy peanut amtti with rice, tasty recipes : शेंगदाण्याची झणझणीत आमटी एकदा खाऊन पाहा, नक्कीच आवडेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2026 12:46 IST2026-05-08T12:45:03+5:302026-05-08T12:46:18+5:30

Bored of eating the same kind of amtti?..try spicy peanut amtti with rice, tasty recipes : शेंगदाण्याची झणझणीत आमटी एकदा खाऊन पाहा, नक्कीच आवडेल.

Bored of eating the same kind of amtti?..try spicy peanut amtti with rice, tasty recipes | एकाच प्रकारची आमटी खाऊन कंटाळा आला ?..करा वाटण लावलेली झणझणीत शेंगदाणा आमटी ..खा काहीतरी वेगळं - हटके

एकाच प्रकारची आमटी खाऊन कंटाळा आला ?..करा वाटण लावलेली झणझणीत शेंगदाणा आमटी ..खा काहीतरी वेगळं - हटके

रोजच्या आहारात आमटीचा समावेश असतो. विविध डाळींच्या आमटी आपण आवडीने खातो. उपासाच्या दिवशी छान शेंगदाण्याची आमटी केली जाते. चवीला फार मस्त असते. (Bored of eating the same kind of amtti?..try spicy peanut amtti with rice, tasty recipes )पण शेंगदाण्यांची आमटी फक्त उपासासाठी करता येते असे नाही. वाटण लावलेली शेंगदाणा आमटी करायला अगदी सोपी आहे. तसेच चवीला कमाल लागते. पाहा कशी करायची. 

साहित्य 
शेंगदाणे, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, आलं, कडीपत्ता, तेल, पाणी, मोहरी जिरे, हळद, मीठ, गरम मसाला

कृती
१. शेंगदाणे तासभर भिजत ठेवायचे. जास्त वेळ भिजवले तरी चालेल मात्र तासभर नक्कीच भिजवाच. हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. छान ताजी कोथिंबीर घ्यायची. निवडायची आणि स्वच्छ धुवायची. त्यानंतर लसणाच्या काही पाकळ्या सोलून घ्यायच्या. आल्याच्या लहान तुकडा घ्यायचा. 

२. एका मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, हिरव्या मिरचीचे तुकडे, लसणाच्या पाकळ्या, थोडं जिरं आल्याचा तुकडा घ्यायचे. त्याची पेस्ट वाटून घ्यायची. गरज असल्यास थोडं पाणी घालायचं. छान वाटून घ्यायचं. 

३. भिजवलेले शेंगदाणेही वाटून घ्यायचे. त्याची छान पेस्ट तयार करायची. एका कढईत थोडं तेल घ्यायचं. तेल तापल्यावर त्यात मोहरी घालायची. मोहरी मस्त तडतडली की त्यात जिरे घालायचे. जिरं छान फुलू द्या. कडीपत्ता घाला. कडीपत्ता तडतडला की त्यात तयार केलेली मिरचीची पेस्ट घालायची. छान खमंग परतून घ्यायची. 

४. तयार केलेली शेंगदाण्याची पेस्ट घालायची आणि ढवळून घ्यायची. त्यात दोन चमचे पाणी घालून शिजवून घ्यायचे. त्याला तेल सुटायला लागले की चमचाभर हळद घालायची. चवीनुसार गरम मसाला घालायचा. गरजेनुसार मीठ घालायचे. सगळं  ढवळून घ्यायचं. एक वाफ काढून घ्यायची. नंतर त्यात पाणी ओतायचे. आमटी छान उकळू द्यायची. उकळल्यावर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची.    

Web Title : मूंगफली की मसालेदार आमटी से भोजन को स्वादिष्ट बनाएं।

Web Summary : एक ही तरह की दाल से ऊब गए हैं? इस आसान और स्वादिष्ट मूंगफली की आमटी को आजमाएं! मूंगफली को भिगोकर, मसालों के साथ पीसकर, स्वादिष्ट तड़के में पकाएं। स्वादिष्ट और अनोखे व्यंजन के लिए धनिया से सजाएँ।

Web Title : Spice up your meals with this easy peanut amti recipe.

Web Summary : Tired of the same old lentils? Try this simple and delicious peanut amti! Soak peanuts, grind with spices, and cook in a flavorful tempering. Garnish with coriander for a tasty, unique dish.