बऱ्याच घरांमध्ये अशी पद्धत असतं की स्वयंपाक सकाळी एकदा करून ठेवला जातो. त्यानंतर घरातले लोक त्यांच्या जेवणाच्या वेळा जशा असतील त्यानुसार मग ते अन्न पुन्हा गरम करतात आणि खातात. अशा पद्धतीने तर कित्येक घरात असं दिसून येतं की एकच पदार्थ २- ३ वेळा गरम केला जातो आणि खाल्ला जातो. काही पदार्थांच्या बाबतीत हे ठिक आहे. पण सगळेच पदार्थ तुम्ही या पद्धतीने पुन्हा पुन्हा गरम करून खात असाल तर ते मात्र धोक्याचं आहे. कारण काही पदार्थ असे वारंवार गरम केल्याने शरीरासाठी धोकादायक ठरत असतात. ते पदार्थ नेमके कोणते ते पाहुया...(3 foods that should never be reheated as they turn toxic)
कोणते पदार्थ वारंवार गरम करून खाऊ नयेत?
१. पालक
पालकापासून तयार झालेला कोणताही पदार्थ पुन्हा पुन्हा गरम करून खाऊ नये. पालकामध्ये नायट्रेट्स जास्त प्रमाणात असतात.
वर्षभराची डाळ साठवून ठेवताना लक्षात ठेवा २ सोप्या टिप्स- डाळींमध्ये कधीच किडे होणार नाहीत
जेव्हा तुम्ही पालकाचा कोणताही पदार्थ वारंवार गरम करता तेव्हा त्या नायट्रेट्सपासून दोन धोकादायक पदार्थ तयार होतात जे शरीरातलं हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजनची पातळी कमी करतात. याशिवाय पालकाचे पदार्थ वारंवार गरम केल्याने त्यातील ॲण्टीऑक्सिडंट्स आणि इतर पौष्टिक पदार्थही कमी होत जातात.
२. बटाटा
बटाट्याचे पदार्थ वारंवार गरम करून खाल्ल्याने नॉशिया, डायरिया, फूड पॉईझनिंग असे त्रास होऊ शकतात.
भयंकर राग येऊन तळपायाची आग मस्तकात जाते? ३ गोष्टी करा- आयुष्य होणार नाही बरबाद
याशिवाय त्यातून जे काही इतर घटक तयार होतात ते किडनी आणि लिव्हर या दोघांच्याही कामात अडथळा आणतात. आयुर्वेदानुसार तर बटाटा वारंवार गरम करून खाणे वर्ज्य सांगितले आहे. बटाटा हा नेहमी शिजवल्यानंतर काही वेळातच संपवला पाहिजे.
३. मशरूम
मशरूमचा कोणताही पदार्थ वारंवार गरम करून खाऊ नये. यामुळे बऱ्याचदा ॲसिडीटी, अपचन, पोट फुगल्यासारखं होणे, मळमळ असे त्रास होऊ शकतात. ही सगळी माहिती आहारतज्ज्ञ डिंपल जांगडा यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
