असं म्हणतात की खूप राग आलेला असताना कोणाला काहीही बोलू नये. कारण रागाच्या भरात आपण खूप काही बोलून जातो, जे बोलण्याची खरंच गरज नसते. राग ओसरून जेव्हा आपण थोडे शांत होतो तेव्हा हे जाणवू लागतं की आपण जे काही बोललो किंवा राग आलेला असताना जे काही वागलो ते खूप चुकीचं होतं. नंतर आपला आपल्यालाच पश्चाताच होतो. पण तेव्हा हातात काही नसतं. वेळ निघून गेलेली असते आणि आपण कित्येकांची मनं दुखावून बसलेलो असतो. हे टाळायचं असेल तर रागाच्या भरात स्वत:वर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे (How to Control Anger?). त्यासाठी नेमकं काय करायचं आणि राग आवरून स्वत:ला कसं कंट्रोल करायचं ते पाहुया..(how to stay calm in anger?)
स्वत:चा राग शांत कसा करायचा?
१. राग आलेला असताना आपला जिभेवर कंट्रोल राहात नाही. तोच नेमका आपल्याला सांभाळायचा आहे. कारण तेवढं जमलं तरी पुढचं बरंच काम सोपं होतं. त्यामुळे कितीही राग आला तरी तोंडातून एक शब्दही बाहेर काढू नका. प्रयत्नपुर्वक शांत राहा. मनातल्या मनात आकडे मोजा किंवा एखादं स्तोत्र म्हणा. पण शांत राहा.
वर्षभराची डाळ साठवून ठेवताना लक्षात ठेवा २ सोप्या टिप्स- डाळींमध्ये कधीच किडे होणार नाहीत
२. तुम्हाला त्या वातावरणात राहाणं किंवा काही न बोलता शांत बसणं शक्य होणार नसेल तर रागाच्या भरात काही बोलण्यापेक्षा तिथून शक्य तितक्या लवकर बाहेर पडा. त्या वातावरणात जास्त वेळ बसू नका. कारण बऱ्याचदा गोष्टी सहन होत नाही आणि मग इच्छा नसतानाही काहीतरी बोललं जातं. त्यापेक्षा तिथून निघून जाणंच योग्य.
३. राग आल्यानंतर तो कंट्रोल करण्यासाठी थंडगार पाणी पिणंही खूप फायदेशीर ठरतं. पाणी प्यायल्याने आपला मूड सुधारण्यास मदत होते. थोडा विचार करायला वेळ मिळतो. त्यामुळे खूप राग आला असेल तर पाणी प्या आणि थोडं शांत होण्याचा प्रयत्न करा.
