रोज चालायला जाता तरी पोट कमी होत नाही अशी तक्रार अनेकांची असते. पण चालण्याचा व्यायाम करताना बरेच लोक चुका करतात ज्यामुळे त्यांना हवातसा परिणाम दिसून येत नाही. व्हियेतनामच्या हो ची मिन्ह सिटी चे जुयेन ए जनरल रुग्णालयातील पोषण विभागाचे प्रमुख डॉ.चाउ थी अन्ह यांच्या म्हणण्यांनुसार चालणं हृदयाचे 'आरोग्य आणि सांध्याच्या आरोग्यासाठी एक चांगली सवय आहे. अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी फक्त चालणं पुरेसं नसतं. नियमित स्वरूपात तुम्ही व्यायाम केला, कॅलरीज किती घेताय यावर लक्ष दिलं तरच वजन कमी होण्यासही मदत होते. (Walking But Not Losing Weight Find Out Why)
रोज चालूनही वजन का कमी होत नाही? (Why Do I Walk Every Day And Not Lose Weight)
डॉक्टर सांगतात, एक तास पायी चालल्यानं तुम्ही फक्त २०० ते ३०० कॅलरीज बर्न करू शकता. या कॅलरीज १ वाटी भात किंवा १ छोटी पेस्ट्री खाल्ल्यानं तुम्हाला मिळतात. बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी व्यायाम केला आहे त्यामुळे मी जास्त खाल्लं तरी चालेल. या चुकीच्या समजामुळे वजन कमी होत नाही. म्हणूनच काहीही खाताना ग्लायसेमिक इंडेक्सवर लक्ष द्यायला हवं. अन्न धान्य, भाज्या हळूहळू पचणाऱ्या कार्बोहायड्रेट्सना महत्व द्यायला हवं. ज्यामुळे इन्सुलिनचा स्तर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. (Ref)
रोज चालणं तुमच्या मानसिक आरोग्यासाठी उत्तम आहे पण वजन कमी करण्यासाठी नाही. जास्त फॅट्स असलेले पदार्थ कमी प्रमाणात खायला हवेत. रोजचं खाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवा. वजन किंवा पोटाची चरबी कमी करण्यासाठी वेगानं चालायला हवं. वाढत्या वयात मेटाबॉलिक रेट मंद होतो. फक्त पायी चालल्यानं मांसपेशींमध्ये काही बदल होत नाही. काही लोक फक्त कार्डीओ व्यायाम, जसं की पायी चालणं, ध्यान करणं, स्ट्रेंथ ट्रेनिंगकडे दुर्लक्ष करतात. म्हणून हलक्या व्यायामांचा दीनचर्येत समावेश असायलाच हवा.
वजन कमी होणं हे हॉर्मोन्सवरही अलंबून असते
वजन कमी करण्यासठी सेवन केल्या गेलेल्या कॅलरीज आणि बर्न केल्या गेलेल्या कॅलरीजचे प्रमाण योग्य असायला हवे. झोपेच्या कमतरतेमुळे किंवा दीर्घकाळ ताण-तणावात असल्यामुळे कॉर्टीसोलची पातळ वाढू शकते. ज्यामुळे शरीरात फॅट्स वाढण्याची शक्यता जास्त असते. खासकरून पोटाच्या आजूबाजूला जास्त चरबी जमा होऊ लागते.
