Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Fitness > सकाळी की संध्याकाळी, कोणत्यावेळी व्यायाम केल्यानं जास्त फायदे मिळतात?

सकाळी की संध्याकाळी, कोणत्यावेळी व्यायाम केल्यानं जास्त फायदे मिळतात?

Morning Vs Evening : सकाळी-संध्याकाळी या दोन्ही वेळा व्यायाम करण्यासाठी उत्तम ठरतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 15:53 IST2026-05-11T14:55:12+5:302026-05-11T15:53:25+5:30

Morning Vs Evening : सकाळी-संध्याकाळी या दोन्ही वेळा व्यायाम करण्यासाठी उत्तम ठरतात.

Morning Vs Evening : When is exercising more beneficial, morning or evening | सकाळी की संध्याकाळी, कोणत्यावेळी व्यायाम केल्यानं जास्त फायदे मिळतात?

सकाळी की संध्याकाळी, कोणत्यावेळी व्यायाम केल्यानं जास्त फायदे मिळतात?

स्वत:ला फिट ठेवणं खूपच महत्वाचं आहे. ज्यासाठी तुम्ही रोज व्यायाम करायला हवा. शरीराच्या सर्व अवयवांना व्यवस्थित ऑक्सिजन मिळाला तरच शरीर उत्तमरित्या काम करतं.  फिटनेस एक्सपर्ट्सही नेहमी स्वत:ला  फिट ठेवण्यासाठी चांगलं खाण्याचा आणि व्यायामाचा सल्ला देतात. पण व्यायाम करण्याची योग्यवेळ कोणती, सकाळी व्यायाम करावा की संध्याकाळी असा प्रश्न अनेकांना पडतो. (Morning Vs Evening When is exercising more beneficial)

सकाळी की संध्याकाळी व्यायामसाठी योग्य वेळ कोणती?

१) सकाळी व्यायाम करण्याचे फायदे

 सकाळी व्यायाम केल्यानं शरीर आणि मेंदू दोन्ही फ्रेश राहते. सकाळी रिकाम्या पोटी व्यायाम केल्यानं शरीर वेगानं फॅट्स बर्न करते आणि वाढलेलं वजन कमी करते. सकाळी व्यायाम केल्यानं शरीरात ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते आणि दिवसभर तुम्हाला ताजतवानं वाटते. तसंच मेंदू शांत राहतो. सकाळी नियमित योगा किंवा जॉगिंग करायला हवी. जर तुम्हाला झोप न येण्याची समस्या उद्भवत असेल तर  सकाळच्यावेळी व्यायाम करा.

2) संध्याकाळी व्यायाम करण्याचे फायदे

 संध्याकाळच्यावेळी तुम्ही व्यायाम केला तर बरेच फायदे मिळतील. संध्याकाळी वर्कआऊट केल्यामुळे शरीर खूपच एक्टिव्ह राहते आणि  मसल्स फिट राहण्यासही मदत होते. दिवसभराच्या कामानंतर शरीर आणि मेंदूला शांत ठेवण्यासाठी तुम्ही रोज संध्याकाळच्यावेळी व्यायाम करू शकता. ज्यामुळे संपूर्ण शरीर एक्टिव्ह राहते आणि शरीर मजबूत राहण्यास मदत होते.

कोणत्या वेळेस व्यायाम करणं जास्त फायदेशीर ठरतं?

सकाळी-संध्याकाळी या दोन्ही वेळा व्यायाम करण्यासाठी उत्तम ठरतात. पण तुम्ही सकाळी उठल्यानंतर व्यायाम केला जर जास्त फायदे मिळतील. मॉनिंग वर्क आऊट केल्यानं शरीर एक्टिव्ह राहण्यास मदत होते. तसंच शरीर खूपच एनर्जेटीक राहतं.

वजन कमी करण्यासाठी तुम्ही घरच्याघरीसुद्धा व्यायाम करू शकता. सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जमेल त्यावेळी व्यायाम करा. पुशअप्स, प्लँक हे व्यायाम स्नायू बळकट करण्यासाठी आणि शरीराला आकार देण्यासाठी उत्तम आहेत. एका जागी धावणे  जंपिंग जॅक्स, सूर्यनमस्कार असे व्यायाम कमी जागेत करता येतात.सूर्यनमस्कार हा एक पूर्ण शरीर व्यायाम  आहे जो लवचिकता आणि शक्ती दोन्ही वाढवतो.

Web Title : सुबह या शाम: व्यायाम करने का सबसे अच्छा समय कब है?

Web Summary : व्यायाम आपको फिट रखता है। सुबह का वर्कआउट ऊर्जा बढ़ाता है और वसा जलाता है, जबकि शाम का वर्कआउट मांसपेशियों को सक्रिय करता है और दिमाग को शांत करता है। दोनों समय फायदेमंद हैं; वह समय चुनें जो आपको सूट करे और पुश-अप्स और सूर्य नमस्कार जैसे व्यायामों से सक्रिय रहें।

Web Title : Morning or evening: When is the best time to exercise?

Web Summary : Exercising keeps you fit. Morning workouts boost energy and burn fat, while evening workouts activate muscles and calm the mind. Both times are beneficial; choose a time that suits you and stay active with exercises like push-ups and Surya Namaskar.