Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Fashion > रेडिमेड महागडं पॅडेड ब्लाऊज घरीच धुण्याची १ सोपी ट्रिक, ड्रायक्लिन नको - टेंशन नको - खर्चही नको...

रेडिमेड महागडं पॅडेड ब्लाऊज घरीच धुण्याची १ सोपी ट्रिक, ड्रायक्लिन नको - टेंशन नको - खर्चही नको...

how to wash padded blouse at home : padded blouse washing tips : how to clean padded blouse without damage : महागडे पॅडेड ब्लाऊज ड्राय क्लिनिंग न करता घरीच कसे धुवायचे, याची खास बजेट फ्रेंडली ट्रिक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2026 15:07 IST2026-04-14T14:55:31+5:302026-04-14T15:07:15+5:30

how to wash padded blouse at home : padded blouse washing tips : how to clean padded blouse without damage : महागडे पॅडेड ब्लाऊज ड्राय क्लिनिंग न करता घरीच कसे धुवायचे, याची खास बजेट फ्रेंडली ट्रिक...

how to wash padded blouse at home padded blouse washing tips how to clean padded blouse without damage | रेडिमेड महागडं पॅडेड ब्लाऊज घरीच धुण्याची १ सोपी ट्रिक, ड्रायक्लिन नको - टेंशन नको - खर्चही नको...

रेडिमेड महागडं पॅडेड ब्लाऊज घरीच धुण्याची १ सोपी ट्रिक, ड्रायक्लिन नको - टेंशन नको - खर्चही नको...

सणासुदीचे दिवस असोत किंवा एखादं लग्नकार्य, महागड्या सिल्कच्या साड्या आणि त्यावर डिझायनर ब्लाऊज घालण्याची हौस प्रत्येकीचीच असते. हल्ली तर डीप नेक किंवा डिझायनर बॅक असलेल्या ब्लाऊजमध्ये ब्रा च्या स्ट्रिप्स दिसू नयेत म्हणून 'पॅडेड ब्लाऊज' (Padded Blouse) शिवण्यालाच जास्त पसंती दिली जाते. हे ब्लाऊज दिसायला जितके सुंदर आणि आकर्षक असतात, तितकेच ते नाजूक देखील असतात. बऱ्याचदा आपण हे ब्लाऊज खराब होऊ नयेत म्हणून दरवेळी ड्राय क्लिनिंगला देतो. पण प्रत्येक वेळेस ड्राय क्लिनिंग करणं खिशाला परवडणारं नसतं आणि त्यात वेळही बराच जातो. दुसरीकडे, जर हे ब्लाऊज घरी साध्या कपड्यांसोबत धुतले, तर त्यातील पॅड्सचा आकार बिघडण्याची किंवा ब्लाऊज चुरगळण्याची भीती असते(how to wash padded blouse at home).

पॅडेड ब्लाऊजची फॅशन जितकी दिसायला सुंदर आहे, तितकीच त्या ब्लाऊजची काळजी घेताना प्रत्येकीचीच दमछाक होते. या ब्लाऊजमधील पॅड्स अत्यंत नाजूक असतात. एकदा का या पॅड्सचा आकार बिघडला की, अख्ख्या ब्लाऊजची फिटिंग आणि लूक खराब होतो. मग अशा वेळी प्रश्न पडतो की, हे नाजूक पॅडेड ब्लाऊज घरच्या घरी सुरक्षितपणे कसे धुवायचे? यामुळेच अनेकजण धास्तीपोटी हे ब्लाऊज धुण्यासाठी थेट 'ड्राय क्लिनिंग' करण्यालाच प्राधान्य देतात. महागड्या साडीवरील नाजूक पॅडेड ब्लाऊज (how to clean padded blouse without damage) घरच्याघरी धुणे अगदी सहज शक्य आहे. घरच्याघरीच योग्य पद्धतीने, काळजीपूर्वक पॅडेड ब्लाऊज कसे धुवावे, जेणेकरून ते खराब न होता त्याची फिटिंग कायम राहील... 

महागडे पॅडेड ब्लाऊज ड्राय क्लिनिंग न करता घरीच कसे धुवायचे ? 

१. घामाचे डाग अशा प्रकारे घालवा :- पॅडेड ब्लाऊजवर जर घामाचे डाग लागले असतील, तर तुम्हाला सर्वात आधी ते डाग काढले पाहिजेत. यासाठी लिक्विड डिटर्जंट घ्या. डाग असलेल्या जागी ते थोडेसे लावा. त्यानंतर हलक्या हाताने घासून डाग साफ करण्याचा प्रयत्न करा. ब्लाऊज जास्त घासून चोळू किंवा रगडू नका. त्यानंतर ओलं कापड घेऊन हलकेच दाब देत ब्लाऊजवरील लिक्विड डिटर्जंट काढून स्वच्छ करून घ्या. 

२. घरच्याघरी अशा प्रकारे धुवा 'पॅडेड ब्लाऊज' :- पॅडेड ब्लाऊज कधीही वॉशिंग मशीनमध्ये धुवायला टाकू नये, यामुळे ब्लाऊजमध्ये लावलेले पॅड्स पूर्णपणे खराब होऊ शकतात. पॅडेड ब्लाऊज असो किंवा ब्रा, त्या नेहमी हलक्या हातानेच धुवाव्यात. पॅडेड ब्लाऊज कधीही गरम पाण्याने धुवू नका. गरम पाण्यामुळे पॅड्स सैल आणि खराब होऊ शकतात. त्यामुळे ब्लाऊज धुण्यासाठी नेहमी नॉर्मल पाण्याचा (Normal Water) वापर करा. पाण्यात थोडे लिक्विड डिटर्जंट टाका. ब्लाऊज पाण्यात बुडवून ठेवा आणि थोड्या वेळाने बाहेर काढून स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. पावडरऐवजी लिक्विड डिटर्जंट वापरा, जेणेकरून डाग लवकर निघतील आणि कपड्यावर पांढरे डाग राहणार नाहीत.

३. धुतल्यानंतर पॅडेड ब्लाऊज अशा प्रकारे सुकवा :- पॅडेड ब्लाऊज कधीही वॉशिंग मशीनमध्ये सुकवू नका. तसेच तो जोरात पिळू नका, कारण यामुळे पॅडचा आकार बिघडू शकतो. पॅडेड ब्लाऊज सुकवण्यासाठी तो एका टॉवेलमध्ये ठेवा आणि हलकेच दाबा. असे केल्याने त्यातील अतिरिक्त पाणी निघून जाईल. हा ब्लाऊज थेट कडक उन्हात सुकवू नका. सावलीत ब्लाऊज उलटा करून वाळत घाला. तसेच, हा ब्लाऊज कपाटात ठेवतानाही विशेष काळजी घ्या. पॅडचा आकार तसाच टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही त्यामध्ये एखादी गोलाकार वस्तू ठेवू शकता. ब्लाऊज ठेवताना एकावर एक न रचता, पॅड्स एकमेकांत अडकवून ठेवावेत जेणेकरून जागाही वाचेल आणि आकारही खराब होणार नाही.

केळीच्या सालांचा ‘असा’ हेअर मास्क लावा-केस चमकतील काचेसारखे-होतील गुडघ्यापर्यंत लांब....

महागडे पॅडेड ब्लाऊज धुताना कोणती काळजी घ्यावी ? 

१. पॅडेड ब्लाऊजसाठी कधीही कपडे धुण्याची पावडर वापरू नका. त्याऐवजी सौम्य बेबी शाम्पू किंवा अगदी थोड्या प्रमाणात हेअर कंडिशनर वापरून ब्लाऊज धुवा. यामुळे ब्लाऊजच्या कापडाची आणि पॅडचा मऊपणा टिकून राहतो.

२. ब्लाऊज पाण्यात भिजवण्यापूर्वी त्याचे सर्व हुक किंवा चेन नीट लावून घ्या. उघड्या हुकमुळे धुताना ब्लाऊजच्या नाजूक कापडात अडकून ते फाटू शकते.

३. धुताना किंवा वाळवताना पॅड्स कधीही उलटे करू नका किंवा मधून दुमडू नका. एकदा का पॅडला सुरकुती पडली, तर ती इस्त्री करूनही निघत नाही आणि ब्लाऊज घातल्यावर तो भाग ओबडधोबड दिसतो.

सब्जा की चिया सीड्स? वजन कमी करण्यासाठी तब्येतीसाठी फायद्याचं काय, खिशाला परवडतं काय?

४. ओला पॅडेड ब्लाऊज कधीही हँगरला लटकवून वाळवू नका. ओलेपणामुळे ब्लाऊज जड असतो, त्यामुळे हँगरला लटकवल्यास खांद्याकडचा आकार आणि पॅड्स खाली खेचले जाऊन ब्लाऊजची फिटिंग बिघडू शकते. त्याऐवजी सपाट जागी पसरवून वाळवा.

५. आधी पाण्यात लिक्विड डिटर्जंट टाकून त्याचा फेस करून घ्या आणि मगच त्यात ब्लाऊज भिजवा. थेट पॅड्सवर डिटर्जंट टाकल्यास त्यातील केमिकल्समुळे पॅड्स कडक होऊ शकतात.

६. पॅडेड ब्लाऊजच्या पॅड्सवर कधीही थेट परफ्यूम स्प्रे करू नका. परफ्यूममधील अल्कोहोलमुळे पॅड्सच्या आतलं मटेरियल खराब होऊन त्याला विचित्र वास येऊ शकतो.

Web Title : पैडेड ब्लाउज को घर पर धोने का आसान तरीका: ड्राई क्लीनिंग की ज़रूरत नहीं!

Web Summary : ड्राई क्लीनिंग से बचते हुए, नाज़ुक पैडेड ब्लाउज को घर पर सुरक्षित रूप से धोएं। लिक्विड डिटर्जेंट से दागों को धीरे से हटाएं। लिक्विड डिटर्जेंट के साथ सामान्य पानी में हाथ से धोएं, गर्म पानी और वाशिंग मशीन से बचें। छाया में सपाट सुखाएं, और आकार बनाए रखने के लिए सावधानी से स्टोर करें।

Web Title : Easy Home Washing Trick for Padded Blouses: No Dry Cleaning!

Web Summary : Safely wash delicate padded blouses at home, avoiding dry cleaning. Remove stains gently with liquid detergent. Hand wash in normal water with liquid detergent, avoiding hot water and washing machines. Dry flat in the shade, and store carefully to maintain shape.