-निकिता बॅनर्जी
उन्हाळा आला की समर फॅशनची चर्चा असतेच. पण आता लग्नात जसे केवळ लग्नाचे कपडे घालून चालत नाही ते कपडे, रंग रिल आणि फोटोत कसे दिसतील याचा विचार केला जातो, तसेच समर फॅशनचेही झाले आहे. तसेही गेली काही वर्षे उन्हाळ्यात जगभरच फुलाफुलांच्या कपड्यांचा अर्थात फ्लोरल प्रिंट्सचा दबदबा आहे. पण यावर्षी त्याला नवीन नाव आहे समर स्पेशल सोशल मीडिया रेडी स्टाइल.
कृती सेनन आणि अनन्या पांडे यांसारख्या जेन-झी अभिनेत्रींनी फ्लोरल ट्रेंडला नवा ट्विस्ट दिला आहे. कृती सेननची स्टाइल नेहमीच सॉफ्ट ग्लॅम असते. म्हणजे फार भडक नाही; पण देखणी. तिचे कपडेही फुलाफुलांचे दिसतात(Ananya Panday floral dress).
अनन्या पांडेचे मिनी ड्रेसेस, को-ऑर्ड सेट्स यातही फ्लोरल प्रिंट्स दिसतात. पण ही फुलंही नाजूकसाजूक नाही तर बोल्ड ठसठशीत दिसतात.
यंदाच्या उन्हाळ्यात जेन-झी तरुणींमध्ये ही ठसठशीत फुलांची फॅशन दिसते. त्यामुळे मोठी फुलं जसं की चाफा, गुलाब ते अगदी सूर्यफुलंही कपड्यांसह दागिन्यांसाठीही निवडले जातात. रंगही गुलाबी, पिवळे, हिरव्याच्या छटांसह वापरले जाातात(Kriti Sanon floral outfit).
मुख्य म्हणजे हा बदल फक्त तरुणींच्या कपड्यांपुरताच मर्यादित नाही, तर मुलांच्या शर्टवरही फ्लोरल ठसठशीत प्रिंट दिसत आहेत. यंदाच्या उन्हाच्या तडाख्यात कॉटन, लिननसह फुलापानांची चलती आहे. आणि कपडे घालताना आपण दिसतो कसे यापेक्षा फोटो कसे येतील, याचा विचार अधिक होताना दिसत आहे.
