Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > केस खूपच गळतात? ताकाने केस धुण्याचा पारंपारीक उपाय पाहा नेमका कसा करायचा..

केस खूपच गळतात? ताकाने केस धुण्याचा पारंपारीक उपाय पाहा नेमका कसा करायचा..

Benefits Of Buttermilk For Hairs : ताक डोक्याची त्वचा स्वच्छ करते. ज्यामुळे कोंडा आणि केसांचा कोरडेपणा दूर होतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 17:44 IST2026-05-19T15:41:29+5:302026-05-19T17:44:30+5:30

Benefits Of Buttermilk For Hairs : ताक डोक्याची त्वचा स्वच्छ करते. ज्यामुळे कोंडा आणि केसांचा कोरडेपणा दूर होतो.

Try the traditional remedy of washing your hair with buttermilk | केस खूपच गळतात? ताकाने केस धुण्याचा पारंपारीक उपाय पाहा नेमका कसा करायचा..

केस खूपच गळतात? ताकाने केस धुण्याचा पारंपारीक उपाय पाहा नेमका कसा करायचा..

उन्हाळ्याच्या दिवसांत ताकाचं सेवन मोठ्या प्रमाणात केलं जातं. ताक शरीराला गारवा देण्यासोबत शरीराला बऱ्याचप्रकारे फायदा देते. ताक प्यायल्यानं शरीराला  गारवा मिळतो इतकंच नाहीतर त्वचा आणि केसांनाही बरेच फायदे मिळतात. ताक डोक्याची त्वचा स्वच्छ करते. ज्यामुळे कोंडा आणि केसांचा कोरडेपणा दूर होतो. ताकातील प्रोटीन केसांना पोषण देते आणि केसांना लागणारी सर्वच आवश्यक पोषक तत्व देते.  (Benefits Of Buttermilk For Hairs)

ताकात कोणती पोषक तत्व असतात?

ताकात पोषक तत्व असतात जे केसांना पोषण देतात. यात लॅक्टिक एसिड, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, व्हिटामीन डी, बी-१२, कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न, पोटॅशियम, सोडीयम, मॅग्नेशियम असते जे केसांना निरोगी ठेवण्यास मदत करते याशिवाय केसांना लांब, दाट बनवते. 

ताक केसांसाठी एक नॅच्युरल हेअर स्ट्रेटनरप्रमाणे काम करते.  नारळाच्या दुधासोबत ताक मिसळून केसांना लावल्यानं केस नैसर्गिकरित्या दाट होतात. नारळाचं दूध आणि ताकाचं प्रमाण  २:१ असं ठेवा. हे मिश्रण केसांना लावून २ तासांसाठी तसंच ठेवून नंतर केस धुवा. या उपायानं केस लांबसडक-दाट होण्यास मदत होईल.

केसांसाठी ताक कसे वापरावे?

ताक केसांना अनेक प्रकारे फायदे देते. ताक वापरून तुम्ही हेअर मास्क किंवा हेअर पॅक बनवू शकता. दह्यात तीन ते चार चमचे ताक आणि २ चमचे ऑलिव्ह ऑईल, एक केळी घाला आणि त्यात २ ते ३ चमचे मध घाला. हे सर्व पदार्थ एकत्र करून केसांना २० मिनिटांसाठी लावून ठेववा. त्यानंतर केस स्वच्छ धुवा.

ताकात लिंबाचा रस मिसळून १५ मिनिटं केसांची मालिश करा आणि कोमट पाण्यानं केस धुवा. या उपायानं खाज, कोंडा दूर होतो. कोंडा काढून टाकण्यासाठी तुम्ही व्हिनेगर आणि लिंबाचा रस  वापरू शकता.  ताक तुम्हाला सहज कुठेही उपलब्ध होईल.  जर तुम्हाला हेल्दी, निरोगी केस हवे असतील तर तुम्ही हा असरदार उपाय करू शकता. ताकाच्या मदतीनं तुम्ही घरच्याघरी फेस मास्क आणि हेअर मास्क तयार करून केसांना आणि त्वचेलाही पोषण देऊ शकता.

Web Title : बालों के लिए छाछ: बालों का झड़ना रोकने और विकास के लिए पारंपरिक उपाय

Web Summary : छाछ बालों को आवश्यक पोषक तत्वों से पोषण देता है, रूसी और सूखापन से लड़ता है। छाछ और नारियल के दूध का मिश्रण स्वाभाविक रूप से बालों को घना कर सकता है। जैतून का तेल, केला और शहद के साथ छाछ हेयर मास्क भी स्वस्थ बालों को बढ़ावा देते हैं। नियमित उपयोग से बाल मजबूत और लंबे हो सकते हैं।

Web Title : Buttermilk for Hair: Traditional Remedy for Hair Fall and Growth

Web Summary : Buttermilk nourishes hair with essential nutrients, combating dandruff and dryness. A mixture of buttermilk and coconut milk can naturally thicken hair. Buttermilk hair masks with olive oil, banana, and honey also promote healthy hair. Regular use can lead to stronger, longer hair.