आपल्या प्रत्येकाला आपली त्वचा स्वच्छ, मऊ आणि चमकदार असावी असं वाटतं. पण अनेकदा चेहऱ्यावर येणारे अनावश्यक केस सौंदर्यात अडथळा आणतात.(Skin care Tips) ओठांच्या वरचे केस, गालावरची लव किंवा हनुवटीवरील केस काढण्यासाठी अनेकजण पार्लरमध्ये जाऊन थ्रेडिंग, वॅक्सिंग किंवा महागड्या लेझर ट्रिटमेंटचा आधार घेतात.(Remove unwanted facial hair) पण या पद्धती वेदनादायक तर असतातच पण कधीकधी संवेदनशील त्वचेवर पुरळ किंवा काळेपणाही आणतात. (Painful waxing vs natural remedies)
जर आपल्याला घरच्या घरी कोणत्याही वेदनेशिवाय आणि नैसर्गिक पद्धतीने या समस्येपासून सुटका मिळवायची असेल तर स्वयंपाकघरातील बटाटा हा रामबाण उपाय ठरु शकतो.(Potato and gram flour face mask) बटाट्यामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग घटक असतात, जे आपल्या त्वचेवरील डाग कमी करण्यास मदत करतात. तसेच यात २ पदार्थ मिसळवल्यास हेअर रिमूव्हल मास्क तयार होईल. हा उपाय केवळ केस काढण्यास मदत करत नाही, तर त्वचेवरील काळे डाग दूर करून चेहरा काचेसारखा स्वच्छ आणि तजेलदार बनवतो. पाहूया हा हेअर रिमूव्हल मास्क कसा तयार करावा.
हेअर रिमूव्हल मास्क तयार करण्यासाठी लागणारे साहित्य
बटाट्याचा रस - २ चमचे
बेसनाचे पीठ - १ मोठा चमचा
मध किंवा लिंबाचा रस - १ चमचा
कृती
1. एका बाऊलमध्ये ताज्या बटाट्याचा रस घ्या. त्यात एक चमचा बेसन किंवा एक चमचा मध, लिंबाचा रस मिसळा हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करुन पेस्ट घट्ट तयार करा. सगळ्यात आधी चेहरा स्वच्छ धुवून कोरडा करा. तयार झालेली पेस्ट चेहऱ्यावर जिथे नको असलेले केस आहेत, तिथे जाड थरात लावा.
2. हा मास्क २० ते ३० मिनिटे तसाच राहू द्या, जोपर्यंत पूर्णपणे वाळत नाही. मास्क वाळल्यानंतर केसांच्या वाढीच्या विरुद्ध दिशेने हलक्या हाताने घासून काढा. नंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा आणि हलके मॉइश्चरायझर लावा.
3. बटाट्यामध्ये असणारे कॅटेकोलेज एन्झाईम त्वचेचा रंग उजळवते. वाळल्यानंतर जेव्हा आपण बेसन घासून काढतो, तेव्हा ते केसांच्या मुळांना कमकुवत करते आणि हळूहळू केस गळून पडतात. हा उपाय आठवड्यातून २ ते ३ वेळा केल्यास फरक दिसेल.
