Lokmat Sakhi >Beauty > केस खूप गळतात, फार पातळ झाले? त्यावर उत्तम उपाय; तुमच्या स्वयंपाकघरातलं हे तेल

केस खूप गळतात, फार पातळ झाले? त्यावर उत्तम उपाय; तुमच्या स्वयंपाकघरातलं हे तेल

केस गळतीवर दुकानं किंवा मेडिकल धुंडाळत बसण्याची गरज नाही. याचा उपचार आपल्या स्वयंपाकघरातच आहे. मोहरीचं तेल केसांसाठी अतिशय गुणकारी आहे. हे तेल केस गळती तर थांबवतेच शिवाय केसांचा पोत सुधारतो आणि चमकही येते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:48 PM2021-09-24T16:48:52+5:302021-09-24T17:08:04+5:30

केस गळतीवर दुकानं किंवा मेडिकल धुंडाळत बसण्याची गरज नाही. याचा उपचार आपल्या स्वयंपाकघरातच आहे. मोहरीचं तेल केसांसाठी अतिशय गुणकारी आहे. हे तेल केस गळती तर थांबवतेच शिवाय केसांचा पोत सुधारतो आणि चमकही येते.

Mustard oil for hair: Hair falls out too much, too thin? Great solution for this in your kitchen | केस खूप गळतात, फार पातळ झाले? त्यावर उत्तम उपाय; तुमच्या स्वयंपाकघरातलं हे तेल

केस खूप गळतात, फार पातळ झाले? त्यावर उत्तम उपाय; तुमच्या स्वयंपाकघरातलं हे तेल

Highlightsतज्ज्ञ सांगतात की मोहरीच्या तेलातील पोषक तत्त्व केसांची मुळं घट्ट करतात. मोहरीच्या तेलानं टाळूला मसाज केल्यास रक्तप्रवाह सुधारतो.मोहरीच्या तेलामुळे केस गळती थांबते तसेच केस वाढण्यासही मोहरीचं तेल उपयोगी पडतं. यासाठी मोहरीच्या तेलाचा पॅक केसांना लावावा लागतो.

केस गळणं ही खूप काही टेन्शन घेण्याची गोष्ट नसते असे तज्ज्ञ म्हणतात. कारण सामान्यपणे जे केस गळतात त्यांच्या जागी नवे केस येतात. पण केस गळती ही चिंतेची बाब तेव्हा होते जेव्हा केस गळण्याचं प्रमाण वाढतं, केस पातळ होतात तेव्हा. केस गळती थांबवू या नावाखाली असंख्यं तेल, औषधं, जेल, सिरम बाजारात आहेत. पण ती केस गळतीवर किती परिणामकारक ठरतात हा अभ्यासाचा विषय आहे. केस गळतीवर दुकानं किंवा मेडिकल धुंडाळत बसण्याची गरज नाही. याचा उपचार आपल्या स्वयंपाकघरातच आहे. मोहरीचं तेल केसांसाठी अतिशय गुणकारी आहे. हे तेल केस गळती तर थांबवतेच शिवाय केसांचा पोत सुधारतो आणि चमकही येते.

Image: Google

केसांसाठी मोहरीचं तेल का वापरावं?

 1. केस गळतीवर परिणामकारक उपाय करायचा असेल तर मोहरीचं तेल वापरावं. तज्ज्ञ सांगतात की मोहरीच्या तेलातील पोषक तत्त्व केसांची मुळं घट्ट करतात. मोहरीच्या तेलानं टाळूला मसाज केल्यास रक्तप्रवाह सुधारतो. केसांच्या मुळांखालचा रक्तप्रवाह सुधारला की केस गळतीही कमी होते.

2. केस कोरडे आणि रुक्ष असतील तर मोहरीचं तेल वापरणं हा उत्तम उपाय आहे. मोहरीच्या तेलामुळे कोरड्या झालेल्या केसांमधे जिवंतपणा येतो. केस धुण्याच्या काही तास आधी जर केसांना मोहरीचं तेल लावलं तर केस धुतल्यानंतर मऊ, मुलायम आणि चमकदार होतात.

Image: Google

3. मोहरीच्या तेलानं डोक्याला मसाज केल्यास तणाव निघून जातो. तज्ज्ञ सांगतात की मोहरीच्या तेलातील पोषक तत्त्व केसांची मुळं घट्ट करतात. तर मिळतेच शिवाय केसासंबंधीच्या अनेक समस्याही सहज सुटतात, केस चांगले होतात.

4. मोहरीच्या तेलात सेलेनियम, ओमेगा 3 फॅटी अँसिड आणि प्रथिनं असतात. यात अँण्टिऑक्सिडण्टस असतात. तसेच यात ब 3 अर्थात नियासिन हा घटक असतो मोहरीच्या तेलातील मॅग्नेशियम, कॅल्शियम, झिंक यांचं विपुल प्रमाणामुळे मोहरीचं तेल केसांसाठी पोषक ठरतं.

5. केस गळतीसोबतच केसांना दोन तोंडं फुटणं ही समस्याही असते. यामुळे केसांचं सौंदर्य बिघडतं, केसांची वाढही खुंटते. ही समस्या घालवण्यासाठी केस धुण्यापूर्वी काही तास अगोदर हलक्या हातानं मोहरीच्या तेलानं केसांना मसाज करावा. तसेच केस धुतल्यानंतर अगदी थोडं तेल घेऊन ते केसांना लावावं. मोहरीच्या तेलातील जीवनसत्त्वं, खनिजं केसांच्या समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

Image: Google

केस वाढीसाठी मोहरीच्या तेलाचा लेप

मोहरीच्या तेलामुळे केस गळती थांबते तसेच केस वाढण्यासही मोहरीचं तेल उपयोगी पडतं. यासाठी मोहरीच्या तेलाचा पॅक केसांना लावावा लागतो. हा पॅक तयार करण्यासाठी एक वाटी दही, 3 ते 4 चमचे मोहरीचं तेल आणि एक सुती रुमाल घ्यावा.

सर्वात आधी दही आणि मोहरीचं तेल एकत्र करुन चांगलं मिसळून घ्यावं. हा लेप केसांच्या मुळांना आणि संपूर्ण केसांना लावावा. केसांना लेप लावून झाल्यावर एक रुमाल पाण्यात भिजवून पिळून घ्यावा. लेप लावलेल्या केसांना हा रुमाल गुंडाळावा. 30 - 40 मिनिटं लेप केसांवर राहू द्यावा. नंतर केस धुवावेत. आठवड्यातून दोन वेळेस केसांना मोहरीचा हा लेप लावावा. केस नुसते पाण्यानं धुतल्यास केसांवर तेल राहातं. त्यामुळे केस धुण्यासाठी सौम्य शाम्पूचा उपयोग करावा. केसांवर अजिबातच तेल नको असल्यास दोनदा शाम्पू लावावा.

Web Title: Mustard oil for hair: Hair falls out too much, too thin? Great solution for this in your kitchen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.