केस पांढरे होणे ही सध्या प्रत्येक तरुण पिढीसह वाढत्या वयातील लोकांमध्ये ही पाहायला मिळणारी सामान्य समस्या आहे. प्रदूषण, चुकीचा आहार आणि मानसिक ताण यामुळे केस पिकू लागतात.(Hair Color Tips) बाजारात मिळणारे महागडे हेअर कलर्स किंवा डाय तात्पुरता निकाल देतात खरा पण त्यात असणारे केमिकल्स केसांचा नैसर्गिक पोत खराब करतात. यामुळे केस कोरडे होणे, गळणे आणि मुळांपासून कमकुवत होणे यांसारख्या समस्या उद्भवतात. (How to cover white hair without chemical dye)
अनेकदा आई-आजी केसांना काळे करण्यासाठी मेहेंदी लावतात. पण यामुळे केसांचे जास्ती प्रमाणात नुकसान होते.(Long lasting natural hair color at home) पण आपल्या निसर्गात असे अनेक घटक आहेत जे महागड्या डायपेक्षा केसांना सुंदर रंग तर देतील आणि केसांना मुळापासून पोषणही मिळेल. महागड्या डायपेक्षा घरच्या घरी तयार केलेला मेहेंदीचा हा रंग केसांची वाढ देखील करतो.
केसांना नैसर्गिंक बर्गंडी रंग येण्यासाठी आपल्याला १ बीट, १ चमचा कॉर्नफ्लोअर आणि १ ते २ चमचे ताज्या कोरफडीचा गर लागेल. त्यासाठी सगळ्यात आधी बीट स्वच्छ धुवून त्याची साल काढा. तो किसून घ्या आणि कापडाने पिळून त्याचा रस काढा किंवा मिक्सरमध्ये वाटून आपण त्याचा रसही बनवू शकतो. यानंतर गॅसवर पातेले ठेवून त्यात बिटाचा रस ओता, त्यात १ चमचा कॉर्नफ्लोअर घाला. मिश्रण घट्टहोईपर्यंत शिजवा. मिश्रणाला जेलसारखा घट्टपणा दिसू लागले की गॅस बंद करा. थंड झाल्यावर त्यात ताजा कोरफडीचा गर घाला आणि मिश्रण चांगले फेटून घ्या.
केसांना डाय लावण्यापूर्वी आपले केस पूर्णपणे स्वच्छ करा. हा डाय ज्याप्रमाणे मेहेंदी लावतो अगदी त्याप्रमाणे केसांचे लहान भाग करुन लावा. १ ते २ तास राहू द्या. नंतर साध्या पाण्याने केस धुवा. दुसऱ्या दिवशी सौम्य शाम्पूने केस धुवू शकता. यामुळे केसांना हलका, नैसर्गिक लाल किंवा बर्गंडी रंग मिळेल.
दुसरा उपाय म्हणजे एका लोखंडी कढईत मेहेंदी पावडर घ्या. त्यात बीट सोलून त्याचे बारीक तुकडे करा किंवा किसून घ्या. त्याचे पाणी तयार करुन गरम करा. त्यात २ चमचे कॉफी पावडर घाला. मेहेंदीची पेस्ट तयार करुन रात्रभर झाकून ठेवा. नंतर केसांना लावा. तासाभराने किंवा १.५ तासाने केस साध्या पाण्याने धुवा.
