केस विंचरताना कंगव्यात अडकलेले केसांचे गुच्छ पाहिले की मनात धडकी भरते. आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत प्रदूषण, रासायनिक उत्पादनांचा अतिवापर आणि पोषक तत्वांची कमतरता यामुळे केस गळणे ही एक सामान्य समस्या बनली आहे.(Best overnight hair growth treatment) अनेकदा महागडी तेले आणि शाम्पू वापरूनही केस गळती थांबत नाही, कारण केसांच्या मुळांना हवे तसे पोषण मिळत नाही. अशावेळी रात्री झोपण्यापूर्वी केसांना लावलेले 'आयुर्वेदिक टोनर' औषधासारखे काम करते. (Home remedies for thinning hair)
रात्रीची वेळ ही केसांच्या दुरुस्तीसाठी सर्वात प्रभावी मानली जाते. जेव्हा आपण झोपतो, तेव्हा आपले शरीर आणि त्वचा स्वत:ला रेपिअर करण्याचे काम करते.(Ayurvedic secrets for long and dense hair) अशावेळी हे आयुर्वेदिक टोनर केसांना लावल्यास केसांची मुळे मजबूत होतात. हे टोनर केसांना चिकटपणा देत नाही त्यामुळे आपल्याला शांत झोपही लागते.(How to stop hair fall overnight) यात असणारे घटक टाळूवरील रक्ताभिसरण वाढवतात, ज्यामुळे केसगळती थांबते आणि नवीन केसांची वाढ होण्यास मदत होते. दाट-लांबसडक आणि रेशमी केस हवे असतील तर घरच्या घरी बनवलेले हे आयुर्वेदिक टोनर नक्की ट्राय करा.
आयुर्वेदिक टोनर बनवण्यासाठी आपल्याला तांदूळ- १ मोठा चमचा, चहापावडर- १ मोठा चमचा, मेथीचे दाणे-१ मोठा चमचा, लवंगा - ६ ते ७, मूठभर कढीपत्ता, आल्याचा तुकडा आणि पाणी दीड ग्लास. हे सर्व घटक केसांसाठी खूप फायदेशीर आहेत.
टोनर बनवण्यासाठी गॅसवर पातेले ठेवा. त्यात वरील सर्व घटक आणि पाणी घालून ५ मिनिटे उकळवून घ्या. हे मिश्रण गाळून घ्या आणि एका स्प्रे बाटलीत भरा. हा टोनर नैसर्गिक असल्यामुळे रेफ्रिजरेटरमध्ये १५ दिवसच ठेवू शकतो. गरम ठिकाणी ठेवल्यास लवकर खराब होईल.
आपले केस अतिप्रमाणात गळत असतील तर आठवड्यातून तीन वेळा हा घरगुती हेअर फॉल कंट्रोल टोनर वापरु शकता. हे टोनर केसांच्या मुळांवर भरपूर प्रमाणात लावा. रात्री झोपण्यापूर्वी देखील हा टोनर लावता येईल. ३० ते ४० मिनिटानंतर केसांना शाम्पू लावून केस धुवा.
या आयुर्वेदिक टोनरमुळे केसगळती नियंत्रणात राहते. केसांच्या वाढीस हा टोनर मदत करतो. जर आपले केस वाढत नसतील तर हा टोनर नक्की केसांसाठी वापरुन पाहा. यामुळे केसांची मुळे मजबूत होऊन केसगळती रोखण्यास मदत होईल.
