वाढता उन्हाळा, प्रदूषण, तणाव आणि चुकीची जीवनशैली यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स, काळे डाग आणि वांग येणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. सुंदर आणि डागविरहित आपली त्वचा असावी असं प्रत्येकाला वाटतं.(Remove Acne Scars Fast) यासाठी आपण रासायनिक क्रीम किंवा महागड्या ब्यूटी ट्रीटमेंट्सचा आधार घेतो. यामुळे त्वचेत काही प्रमाणात फरक जाणवू लागतो पण अवघ्या काही दिवसांत पुन्हा चेहरा निस्तेज दिसतो. अशावेळी आपल्या स्वयंपाकघरात आढळणाऱ्या पांरपरिक मसाल्यांपैकी एक असलेले जायफळ आपल्या त्वचेसाठी वरदान ठरु शकते. (Spotless Skin Treatment)
जायफळमध्ये नैसर्गिकरित्या अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे त्वचेच्या खोलवर जाऊन डागांना फिकट करण्यास मदत करतात. सुरकुत्या, वांग आणि पिंपल्सच्या खुणा घालवण्यासाठी जायफळ अत्यंत प्रभावी मानले जाते.(Nutmeg Benefits for Pimples) घरच्या घरी तयार केलेलं हे क्रीम त्वचेवर लावल्यास फायदा होईल. हे प्रभावी होममेड जायफळ क्रीम कसे बनवायचे आणि त्याचे त्वचेसाठी होणारे फायदे काय आहेत पाहूया.
साहित्य
जायफळ पावडर - १ मोठा चमचा
कोरफडीचा गर - २ मोठे चमचे
गुलाब पाणी - १ चमचा
बदाम तेल किंवा व्हिटॅमिन ई कॅप्सूल - २ थेंब
हळद - चिमूटभर
क्रीम बनवण्याची कृती
1. सर्वात आधी एका वाटीमध्ये २ चमचे कोरफड जेल घ्या. कोरफड त्वचा हायड्रेट ठेवण्यास आणि थंडावा देण्यास मदत करते.
2. या जेलमध्ये जायफळ पावडर किंवा जायफळाचा उगाळलेला गंध नीट मिसळा. जायफळ चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरते.
3. आता यामध्ये थोडे गुलाब पाणी आणि चिमूटभर हळद टाकून सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करा. जर आपली त्वचा जास्त कोरडी असेल, तर त्यात बदामाच्या तेलाचे दोन थेंब किंवा ई-व्हिटॅमिनची एक कॅप्सूल फोडून टाका.
4. हे मिश्रण जोपर्यंत क्रीमसारखे मऊ आणि एकजीव होत नाही, तोपर्यंत व्यवस्थित फेटून घ्या.
5. तयार झालेले हे घरगुती जायफळ क्रीम एका लहान काचेच्या डबीत भरून ठेवा. हे क्रीम आपण फ्रीजमध्ये ७ ते १० दिवसांपर्यंत ठेवू शकतो. रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वच्छ चेहऱ्यावर हे क्रीम लावून हलका मसाज करा.
6. जायफळ त्वचेतील मेलॅनिनचे प्रमाण संतुलित करते, ज्यामुळे सुरकुत्या- वांग कमी होते. यात असणारे अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मामुळे पिंपल्स येत नाही आणि काळे डागही फिकट होतात. नियमित वापरामुळे त्वचेचा काळपटपणा दूर होऊन चेहरा नैसर्गिकरित्या उजळतो. ही क्रीम त्वचेवर लावण्याआधी पॅच टेस्ट नक्की करा.
