Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > केस पातळ झाले-कपाळ मोठं दिसतं? ३ पदार्थांचा हेअर मास्क लावा, कंबरेपर्यंत लांब होतील केस

केस पातळ झाले-कपाळ मोठं दिसतं? ३ पदार्थांचा हेअर मास्क लावा, कंबरेपर्यंत लांब होतील केस

Homemade Hair Mask For Long Hairs : केस मेंटेन ठेवणं कठीण जातं. काही सहज उपलब्ध होणारे  घरगुती पदार्थ तुमच्या केसांना एक चांगला टेक्चर देऊ शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 14:58 IST2026-05-07T14:41:56+5:302026-05-07T14:58:11+5:30

Homemade Hair Mask For Long Hairs : केस मेंटेन ठेवणं कठीण जातं. काही सहज उपलब्ध होणारे  घरगुती पदार्थ तुमच्या केसांना एक चांगला टेक्चर देऊ शकतात.

Homemade Hair Mask For Long Hairs : Onion And Moringa Will Give You Long Hair Up To Knees | केस पातळ झाले-कपाळ मोठं दिसतं? ३ पदार्थांचा हेअर मास्क लावा, कंबरेपर्यंत लांब होतील केस

केस पातळ झाले-कपाळ मोठं दिसतं? ३ पदार्थांचा हेअर मास्क लावा, कंबरेपर्यंत लांब होतील केस

प्रत्येक मुलीला असं वाटतं की केस सुंदर, लांब असावेत. त्यासाठी आजकाल हेअर केअर ट्रिटमेंट्स बऱ्याच मुली करून घेतात. त्यांचा असा समज असतो की वेळोवेळी पार्लरला जाऊन स्पा, केरेटीन किंवा इतर ट्रिटमेंट घेत राहिल्यानं केस मेंटेन राहतात. पण वास्तविक पाहता ठराविक वेळेनंतर केस पुन्हा खराब होऊ लागतात आणि पैसे वाया जातात. (Onion And Moringa Will Give You Long Hair).

अशावेळी केस मेंटेन ठेवणं कठीण जातं. काही सहज उपलब्ध होणारे  घरगुती पदार्थ तुमच्या केसांना एक चांगला टेक्चर देऊ शकतात. यासाठी तुम्हाला किचनमध्ये असलेल्या काही पदार्थांचा हेअर मास्क तयार करावा लागेल. (Homemade Hair Mask For Long Hairs)

महागड्या उत्पादनांना बाय म्हणा!

जर तुम्ही केसांना महागडी उत्पादनं लावून दमला असाल तर  ३ असे पदार्थ केसांना लावू शकता. ज्यामुळे तुमचे केस गुडघ्यापर्यंत लांब होतील. आलं, कांदा, मोरींगा पावडरपासून तयार करा हेअर मास्क. आलं, कांदा, मोरींगा पावडरपासून तयार केलेला हा हेअर मास्क केसांसाठी बराच फायदेशीर ठरतो. हा  हेअर मास्क घरच्याघरी तयार करणं खूपच सोपं आहे. हा हेअर मास्क तुम्ही अनेक आठवडे स्टोअर करून ठेवू शकता. हा हेअर मास्क लावल्यानंतर महिन्याभरातच तुम्हाला चांगला परिणाम दिसून येईल.

हा हेअर मास्क कसा तयार करायचा?

हा हेअर मास्क घरच्याघरी तयार करणं खूप सोपं आहे. त्यासाठी आल्याचा तुकडा, १ छोटा कांदा घेऊन व्यवस्थित बारीक करून घ्या. सुती कापडात ठेवून  याचा पूर्ण रस काढून घ्या. नंतर यात मोरींगा पावडर मिसळून पेस्ट तयार करा. तयार आहे हेअर मास्क.

हा हेअर मास्क लावण्याची योग्य पद्धत कोणती?

 ही पेस्ट तुम्हाला १ महिना केसांना लावायची आहे. नंतर तुम्हाला याचा परिणाम दिसून येईल. हा मास्क तुम्ही अर्धा तास लावून ठेवू शकता. नंतर स्वच्छ पाण्यानं केस धुवा.

हा हेअर मास्क लावण्याचे फायदे

हा हेअर मास्क लावल्यानं केस नैसर्गिकरित्या मजबूत होतील. केसांची लांबी वाढेल. केस मऊ होतील आणि केसांना टक्कल पडणार नाही. याचा चांगला परिणाम केसांवर दिसून येईल.

Web Title : बाल पतले हो रहे हैं? अदरक, प्याज, मोरिंगा मास्क से पाएं लंबे बाल।

Web Summary : महंगे उत्पादों को छोड़ें! अदरक, प्याज और मोरिंगा पाउडर से बने घरेलू हेयर मास्क का उपयोग करें, ताकि बाल लंबे, मजबूत और मुलायम हों। सर्वोत्तम परिणामों के लिए नियमित रूप से लगाएं।

Web Title : Hair thinning? Try this ginger, onion, moringa mask for growth.

Web Summary : Ditch expensive products! Use a homemade hair mask of ginger, onion, and moringa powder for long, strong, and soft hair. Apply regularly for best results.