Lokmat Sakhi >Beauty > Hair Care Tips : माधुरीनं शेअर केला HDW फॉर्म्युला; वाढत्या वयात लांब केस टिकवण्याचं सिक्रेट

Hair Care Tips : माधुरीनं शेअर केला HDW फॉर्म्युला; वाढत्या वयात लांब केस टिकवण्याचं सिक्रेट

Hair Care Tips : केसांच्या मुळांवर फक्त शॅम्पूचा वापर केला पाहिजे. केस धुतल्यानंतर टॉवेलने आपले केस पुसा आणि नैसर्गिकरित्या कोरडे राहू द्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 06:48 PM2021-07-18T18:48:50+5:302021-07-18T19:21:52+5:30

Hair Care Tips : केसांच्या मुळांवर फक्त शॅम्पूचा वापर केला पाहिजे. केस धुतल्यानंतर टॉवेलने आपले केस पुसा आणि नैसर्गिकरित्या कोरडे राहू द्या.

Hair Care Tips : Madhuri dixit nene hair care tips for long healthy shiny and damage free hair | Hair Care Tips : माधुरीनं शेअर केला HDW फॉर्म्युला; वाढत्या वयात लांब केस टिकवण्याचं सिक्रेट

Hair Care Tips : माधुरीनं शेअर केला HDW फॉर्म्युला; वाढत्या वयात लांब केस टिकवण्याचं सिक्रेट

Highlights. शरीर आणि त्वचेवरचं हे सौंदर्य जपण्यासाठी माधुरी काय करत असेल असं कुतुहल सगळ्यांनाच असतं.  या टिप्सचा वापर करून तुम्ही दीर्घकाळ आपल्या केसांना लांब आणि चमकदार ठेवू शकता.  माधुरी सांगते की  केसांचा कोणताही मास्क किंवा तेल लावणे पुरेसे नाही. या दोन्ही पद्धती आपल्या केसांना एक्स्ट्रा केअर आणि कंडिशनिंग देण्यासाठी आहेत.

(Image Credit-Wikipedia)

माधुरी दिक्षित आपल्या चाहत्यांसह नेहमीच ब्यूटी टिप्स शेअर करत असते. अलिकडेच तिनं  काळ्या, दाट, चमकदार केसांचे सिक्रेट सांगितले आहे.आजही माधुरी तिच्या नैसर्गिक सौंदर्यासाठीच ओळखली जाते. शरीर आणि त्वचेवरचं हे सौंदर्य जपण्यासाठी माधुरी काय करत असेल असं कुतुहल सगळ्यांनाच असतं.  या टिप्सचा वापर करून तुम्ही दीर्घकाळ आपल्या केसांना लांब आणि चमकदार ठेवू शकता.  
 

हेअर केअर टिप्स

केसांचे ट्रिमिंग रेग्युलर करा

उष्णता केसांचे बरेच नुकसान करते. म्हणून जेव्हा आपण घरी राहता तेव्हा केस नैसर्गिकरित्या कोरडे होऊ द्या, ड्रायर वापरू नका. कोमट पाण्याने केस धुवा. शॅम्पूसाठी कधीही गरम पाण्याचा वापर करू नका. केसांच्या मुळांवर फक्त शॅम्पूचा वापर केला पाहिजे. केस धुतल्यानंतर टॉवेलने आपले केस पुसा आणि नैसर्गिकरित्या कोरडे राहू द्या.

जर ओल्या  केसांतून हलके पाणी बाहेर येत असेल तर आपण काही काळ मायक्रो फायबर हेयर रॅपने आपले केस लपेटू शकता आणि नंतर ते उघडे ठेवू शकता. यामुळे केस डॅमेज होणार नाहीत.  जर आपल्याला वारंवार केसांना स्पर्श करण्याची सवय असेल तर हे टाळा. कारण ही सवय केसांमध्ये तणाव निर्माण करते, केसांची मुळे पटकन तेलकट बनतात.

हा आहे माधुरीचा HDW फॉर्म्युला

माधुरी सांगते की  केसांचा कोणताही मास्क किंवा तेल लावणे पुरेसे नाही. या दोन्ही पद्धती आपल्या केसांना एक्स्ट्रा केअर आणि कंडिशनिंग देण्यासाठी आहेत. तर आपल्या केसांची खरी काळजी आपल्या काही खास गोष्टींवर अवलंबून असते.

H- Healthy Habits (चागंल्या सवयी)

D- Healthy Diet (पौष्टिक अन्न)

W- Proper Water (पुरेसं पाणी) 

माधुरीच्या मते सुंदर आणि जाड केसांसाठी या मूलभूत गोष्टी आहेत. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे. तरच आपल्या केसांवर इतर केसांची निगा राखण्यासाठी टिप्स दिसतील. केस निरोगी ठेवण्यासाठी आणि गळण्यापासून बचाव करण्यासाठी माधुरी विशिष्ट पूरक आहार घेण्याची शिफारस करते. यामध्ये बायोटिन, ओमेगा -3 आणि फिश ऑइल कॅप्सूलचा समावेश आहे. माधुरी सांगते की केसांना निरोगी बनविण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच हे सर्व पूरक आहार घ्या. जेणेकरून त्यांचा तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होणार नाही.

 केस विंचरण्याची योग्य पद्धत

माधुरी म्हणते की कधीही वेगाने केस विंचरू नये. यामुळे केसांचे नुकसान होते. नेहमीच केसांचा ब्रश आणि कंगवा आरामात वापरा.  माधुरीने ओल्या केसांना कधीही न विंचरण्याचा सल्ला दिला. ती म्हणते की  आपल्याला ओल्या केसांमधील गुंता सोडवायचा असेल तर नेहमीच जाड दात असलेला कंगवा वापरा. ओल्या केसांवर केसांचा ब्रश वापरु नये.

माधुरी या चार गोष्टींनी घरी केस तेल बनवते

केसांना जाड आणि चमकदार ठेवण्यासाठी माधुरी दीक्षित घरी स्वतःचे केस तेल बनवते. हे केश तेल बनवण्याची पद्धतही तिनं आपल्या चाहत्यांसह शेअर केली आहे. हे तेल तयार करण्यासाठी आपल्याला चार गोष्टींची आवश्यकता आहे.

अर्धा कप नारळाचं तेल 

15 ते 20 कढीपत्ता

2 चमचे कांद्याची पेस्ट

1/2 चम्मचे मेथीचे दाणे

सर्व प्रथम, गरम करण्यासाठी नारळाचं तेल ठेवा. हे तेल गरम झाल्यावर त्यात मेथीचे दाणे घाला. एक मिनिटानंतर कांदा आणि कढीपत्ता घाला. या सर्व गोष्टी मंद आचेवर ५ ते ७ मिनिटे शिजवा. त्यानंतर तेल थंड होऊ द्या. तेल थंड झाल्यावर ते गाळून एका काचेच्या भांड्यात ठेवा. आठवड्यातून दोन ते तीनवेळा तुम्ही या तेलाचा वापर करू शकता
 

Web Title: Hair Care Tips : Madhuri dixit nene hair care tips for long healthy shiny and damage free hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.