Panghrun Movie Review : - हळुवार खुलत जाणारी 'ही' अनोखी गाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 10:55 AM2022-02-04T10:55:51+5:302022-02-04T11:32:21+5:30

Panghrun Movie Review : नात्यांची गुंफण, मानवी नात्यातील अनेक छटा आणि त्यातून घडणारा हा एक प्रवास..जाणून घ्या कसा आहे महेश मांजरेकर दिग्दर्शित 'पांघरूण' सिनेमा..

Gauri ingawale and Amol bavdekar marathi film Panghrun movie review | Panghrun Movie Review : - हळुवार खुलत जाणारी 'ही' अनोखी गाठ

Panghrun Movie Review : - हळुवार खुलत जाणारी 'ही' अनोखी गाठ

googlenewsNext
Release Date: February 04,2022Language: मराठी
Cast: गौरी इंगवले, अमोल बावडेकर, विद्याधर जोशी
Producer: Director: महेश मांजरेकर
Duration: 2 तास 11 मिनिटंGenre:
लोकमत रेटिंग्स

चित्राली चोगले

Panghrun Movie Review :  'देह आला की मायेचे पाश त्याच्याभोवती येणारच...' अगदी छोटं पण बरंच काही सांगून जाणारं हे वाक्य. या आशयाच्या भोवती खुलत जाणारा 'पांघरुण'(Panghrun Movie) हा सिनेमा. नात्यांची गुंफण, मानवी नात्यातील अनेक छटा आणि त्यातून घडणारा हा एक प्रवासच आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. पण हा प्रवास करावा की नाही? चला पाहुयात.

महाराष्ट्रातील कोकणातील एक छोटं गाव आणि पूर्व स्वातंत्राचा काळ. ही गोष्ट तशी लक्ष्मीची (गौरी इंगवले) पण तिच्यासोबत गोष्टीत अनेक घटक आहेत आणि त्यातूनच ती पुढे खुलत आणि रंगत जाते. लक्ष्मीचे वडील ब्रिटिश अधिकाऱ्याकडे नोकरी करतात म्हणून त्याच साहेबांच्या मुलीसोबत लक्ष्मीची छान मैत्री जमलेली असते. अगदी 13-14 व्या वर्षी विधवा झालेल्या लक्ष्मीला याच मैत्रिणीचा खूप छान आधार मिळतो. या वयातील आकर्षण, खेळकरपणा आणि तितकीच निरागसता सगळं लक्ष्मीमध्ये आहे. त्याकाळी विधवाविवाहाला मान्यता मिळाल्यामुळे लक्ष्मीचे वडील सुद्धा तिच्यासाठी स्थळ शोधून लागतात. लक्ष्मीच्या मनात मात्र काहीतरी वेगळं असतं. अशातही वडिलांच्या आज्ञेत असलेली लक्ष्मी त्यांच्या शब्दाबाहेर न जातात जवळपास तिच्या वडिलांच्या वयाच्या असलेल्या अंतू भटजींसोबत लग्न करण्यासाठी तयार होते. अंतू भटजींच्या पत्नीचा अकाली मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या दोन मुलींसाठी त्यांना आई हवी असते खरं पण पत्नी हवी का? हा प्रश्न त्यांच्या मनात सतत रेंगाळत असतो कारण ते अद्याप त्यांच्या पहिल्या पत्नीला विसरू शकले नसतात. अंतू भटजी या विद्वानाच्या घरी लक्ष्मी लग्न करून घेते आणि आपल्या बहिणींच्या वयाच्या असलेल्या दोन मुलींना आई म्हणून छान सांभाळून ही लागते.

 

आई पत्नी म्हणून वावरताना लक्ष्मीच्या स्वतःच्या काही गरजा असतात एक स्त्री म्हणून, एक माणूस म्हणून पण त्या कुठेतरी पतीकडून पूर्ण होताना दिसत नाहीत. सगळं छान सुरु असतं पण एका स्त्रीला सुद्धा शारीरिक गरज असते हे तिचे पती अंतू भटजी काही समजू शकत नाहीत. आपल्या पूर्व पत्नीला न विसरल्यामुळे लक्ष्मीला पूर्णपणे पत्नी म्हणून ते स्वीकारू शकत नसतात. त्यामुळे दोघांमध्ये शारीरिक दुरावा असतो. वयात आलेल्या लक्ष्मीची घालमेल, तिची तडफड त्यामुळे सतत होताना दिसते. ती अनेकदा आपल्या पतीला ते सांगायचा, त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्नदेखील करते पण त्यातून काहीच साध्य होत नाही. एकीकडे पतीपासून असलेला दुरावा आणि दुसरीकडे भटजींचा शिष्य असलेल्या माधवचा घरात असलेला सततचा वावर, त्याची लक्ष्मीवर रोखलेली नजर आणि हा सगळा मोहपाश. यातून लक्षमी लांब राहू शकते का? आपले पती अंतू भटजी यांच्याकडून प्रेम मिळवू शकते का? या दोघांमध्ये होत असलेली तिची परफड पुढे काय रंग घेते? या सगळ्याची उत्तर मिळवण्यासाठी तुम्हाला पांघरुण हा सिनेमा पाहावा लागेल. आता तो पाहावा की नाही? हा प्रश्न जर असेल, तर अगदी एका वाक्यात सांगायचं झालं तर पहावा आणि नक्की पहावा.


पांघरुण ही नक्कीच एक हळुवार उलगडत जाणारी अनोखी गाठ आहे. विविध टप्प्यांवर विविध छटांमधून हा सिनेमा एक सुखद अनुभव देणारा ठरतो. खास करून या सिनेमातील सगळीच पात्र इतकी उत्तम वटवली गेली आहेत की त्यामुळे या सिनेमाचा प्रभाव अधिक पडतो. एक अतिशय निपुण दिग्दर्शक सिनेमा पाहण्याचा आनंद आणि अनुभव यासाठी किती म्हटवाचा असतो हे हा सिनेमा त्यांच्या अनेक छोट्या-छोट्या गोष्टीतून अगदी सहज सांगून जातो. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी कमाल केली आहे. हा दिग्दर्शकाचा सिनेमा आहे हे या सिनेमातूनच असं अनेकदा पटतं. सिनेमातील मुख्य दोन पात्र लक्ष्मी म्हणजेच गौरी इंगवले आणि अंतू भटजी म्हणजेच अमोल बावडेकर या दोघांनी अप्रतिम कामं केली आहेत. हा सिनेमा गौरीचा तर आहेच पण अमोलचा अभिनय म्हणजे क्या बात. पात्रासाठी योग्य असलेला ठेहराव, प्रगल्भता अमोल ने उत्तम निभावून नेलं आहे. इतर पात्रांनी या दोघांना मदतच केली आहे. तुम्ही जर कमर्शिअल सिनेमाचे फॅन असाल तर हा सिनेमा थोडा स्लो आहे असं वाटू शकतं पण सिनेमा शेवट पर्यंत गुंतवून ठेवतो. शेवटाकडच्या काही सीन्सचा जरा आधीच अंदाज येतो खरा पण ते अश्या टप्प्यावर असतं की आपण सिनेमात रमलेले असतो. कथा, पटकथा, गाणी सगळं उत्तम जुळून आलं आहे. त्यामुळे हा सिनेमा एक सुखद अनुभव नक्कीच ठरतो. काही ठिकाणी सिनेमात चढ-उतार आहेत, अनेक ठिकाणी सिनेमा रेंगाळला आहे असं सुद्धा वाटू शकतं, काही महत्त्वाच्या सीन्सचा आधीच अंदाज बांधू शकत असल्यामुळे जरा शेवतचा अंदाज येऊ लागतो, त्यामुळे जरा हिरमोड होतो पण सिनेमा पाहून बाहेर येताना छान अनुभव घेऊन जाण्याची एक जाणीव असते. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर 'पांघरुण'ची 'ही अनोखी गाठ' हळुवार खुलत एक छान रंजक अनुभव देऊन जाते.

Web Title: Gauri ingawale and Amol bavdekar marathi film Panghrun movie review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.