Tumbbad Movie Review : गूढ कथा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 03:21 PM2018-10-12T15:21:53+5:302018-10-12T17:44:47+5:30

अलीकडच्या काळात वेगवेगळ्या धाटणीच्या, आशयाच्या चित्रपटांची चलती आहे. ‘तुम्बाड’ हा याच शृखंतेतील चित्रपट.

Tumbbad Movie Review : गूढ कथा | Tumbbad Movie Review : गूढ कथा

Tumbbad Movie Review : गूढ कथा

Next
Release Date: October 12,2018Language: हिंदी
Cast: सोहम शाह, रंजिनी चक्रवर्ती, ज्योती मालशे, अनीता दाते, हरीश खन्ना
Producer: सोहम शहा, आनंद एल राय़ मुकेश शाहDirector: राही बर्वे आनंद गांधी
Duration: 1 तास 53 मिनिटंGenre:
लोकमत रेटिंग्स

- जितेन्द्र कुमार  

अलीकडच्या काळात वेगवेगळ्या धाटणीच्या, आशयाच्या चित्रपटांची चलती आहे. ‘तुम्बाड’ हा याच शृखंतेतील चित्रपट. गुढ वलय असलेला हा चित्रपट मुळात एक भयपट आहे. पण प्रत्यक्षात चित्रपट पाहताना हॉररपेक्षा तो सायकॉलॉजिकल ड्रामा अधिक वाटतो. ही कथा आहे, सृष्टीच्या जन्माची. देवीच्या गर्भातून १३ कोटी देवी-देवता जन्म घेतात, इथून या कथेची सुरूवात होते.
सदाशिव ,त्याचा मोठा भाऊ विनायक (सोहम शहा) आणि विधवा आई (ज्योती मालशे) या महाराष्ट्राच्या तुम्बाड नावाच्या गावात राहणाºया कुटुंबाची ही कथा.  विनायकने सृष्टीच्या जन्माची एक कथा ऐकलेली असते. त्यानुसार, सृष्टीदेवीच्या गर्भातून १३ कोटी देवी-देवता जन्म घेतला. पण देवीचा पहिला पुत्र हस्तर प्रचंड लोभी असतो. त्याला सगळे काही मिळवायचे असते.  दाग-दागिने हडपल्यानंतर हस्तर अन्न चोरायला जातो. त्याची ती लोभी वृत्ती बघून  देव-देवता क्रोधित होतात. पण देवी त्याला वाचवते आणि आपल्या गर्भात लपवते. याच तुम्बाड गावात एक खजिनाही लपलेला असतो. विनायक आणि त्याच्या आईला हा खजिना हवा असतो. खजान्याच्या लालसेने तो अनेक वर्षांनंतर तुम्बाडमध्ये येतो.
तुम्बाड या चित्रपटात  एक किल्ला आहे. एका शापामुळे या किल्ल्यात सतत पाऊस पडत असतो. एक देवीचा गर्भ आहे, जिथे हस्तर असतो. जो कायम भुकेला असतो आणि पीठ खावूनच त्याची भूक शमणारी असते. या चित्रपटात एक मुलगा आहे, जो आपल्या वडिलांना हस्तरला खाण्यात गुंतवून त्याच्या शरीरातून सांडणारे सोने मिळवण्याचा उपाय सांगतो. हस्तरला खूपसा-या पीठाच्या बाहुल्या खायला देण्याची आणि खाण्यात गुंतवून ठेवण्याची कल्पना तो देतो. पण याचा परिणाम म्हणजे, यातून अनेक हस्तर जन्म घेतात. वाचायला, पाहायला हे सगळे गूढ वाढत असले तरी चित्रपटात काहीतरी खटकते आाणि कंटाळा आणते.
 
 
 


 

Web Title: Tumbbad Movie Review : गूढ कथा

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app