Laxmii Movie Review: 2020 मधील अक्षय कुमारचा सर्वात ‘बकवास’ सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2020 11:05 AM2020-11-10T11:05:14+5:302023-08-08T19:47:32+5:30

‘लक्ष्मी’ हा हॉरर-कॉमेडी सिनेमा सिनेमा एका संवेदनशील मुद्यावर भाष्य करतो, मात्र मनोरंजनाच्या बाबतीत चित्रपटाची कथा अगदीच अपेक्षाभंग करते.

Laxmii Review: Akshay Kumar’s ‘Laxmii’ Is the Worst Film of 2020 | Laxmii Movie Review: 2020 मधील अक्षय कुमारचा सर्वात ‘बकवास’ सिनेमा

Laxmii Movie Review: 2020 मधील अक्षय कुमारचा सर्वात ‘बकवास’ सिनेमा

ठळक मुद्देम्हणायला लक्ष्मी एक हॉरर कॉमेडी सिनेमा आहे. मात्र चित्रपट घाबरवत नाही.
Release Date: November 09,2020Language: हिंदी
Cast: अक्षयकुमार, कियारा आडवानी, शरद केळकर, राजेश शर्मा, अश्विनी काळसेकर
Producer: शबीना खान, तुषार कपूरDirector: राघव लॉरेन्स 
Duration: 2 तास 21 मिनिटGenre:
लोकमत रेटिंग्स

अनेक वादानंतर आणि दीर्घ प्रतीक्षेनंतर अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’ हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला. ट्रेलर रिलीज होताच या सिनेमाने अनेक वाद ओढवून घेतले. अर्थात सरतेशेवटी ‘कंचना’ या तेलगू सिनेमाचा रिमेक असलेला हा सिनेमा पे्रक्षकांपर्यंत पोहोचला. ‘लक्ष्मी’ हा हॉरर-कॉमेडी सिनेमा तृतीयपंथीयांकडे बघण्याची समाजाची संकुचित वृत्तीवर प्रहार करतो. सिनेमा एका संवेदनशील मुद्यावर भाष्य करतो, मात्र मनोरंजनाच्या बाबतीत चित्रपटाची कथा अगदीच अपेक्षाभंग करते.

कथा- आसिफ (अक्षय कुमार) व रश्मी (कियारा अडवाणी) यांची ही कथा आहे. दोघांचा प्रेमविवाह आहे.घरून पळून जाऊन लग्न करणा-या या जोडप्याचा नवा नवा संसार सुरु झाला असतानाच रश्मीने तिच्या कुटुंबाला एकदा भेटावे, अशी आसिफची इच्छा असते. रश्मीच्या आईवडिलांच्या लग्नाचा वाढदिवस असतो. अशात रश्मीची आई तिला घरी बोलवते आणि इथून सिनेमाची कथा सुरू होते. यावेळी रश्मीच्या कुटुंबाची मन वळवणार, त्यांना राजी करणार, अशी खूनगाठ बांधून आसिफ, रश्मी दोघेही रश्मीच्या घरी जातात. मात्र रश्मीच्या वडिलांचा  आसिफवरचा राग कायम असतो. अर्थात रश्मीचा भाऊ (मनु ऋषी)आणि त्याची पत्नी (अश्विनी कालसेकर) यांनी मनातून आसिफला स्वीकारले असते. रश्मीच्या माहेरच्या घराच्या बाजूला एक मोठा खाली प्लॉट असतो. तिथे भूतप्रेतांचा वास असल्याचे मानले जात असते. आसिफचा मात्र भूतप्रेतांवर विश्वास नसतो. तो आजूबाजूच्या मुलांना या मोकळ्या जागेवर खेळायला घेऊन जातो. मात्र या जागेवर खेळण्यासाठी स्टंप गाडताना अचानक त्याला भुताटकीचा भास होता. अचानक वातावरण बदलते. सगळी मुलं घाबरून आपआपल्या घरी पळून जातात, आसिफही घरी येतो. यानंतर सुपरनॅचरल पॉवरचा खेळ सुरु होता. रश्मीची आई घरी एक पूजा करते. यावेळी घरात एक आत्मा असल्याचे स्पष्ट होते.  इकडे आसिफचे वागणे बदलते.आत्म्याच्या प्रभावाखाली त्याला लाल बांगड्या घालणे आवडू लागते. दुकानातील लाल साडीवर तो भाळतो. आंघेळ करताना अंगावर हळदीचे उटणे लावतो. मात्र आत्म्याने शरीर सोडताना काहीही आठवत नाही. काही घटनाक्रमानंतर आसिफच्या शरीरातील आत्मा बोलू लागते. मी लक्ष्मी आहे आणि बदला घेण्यासाठी आली आहे, असे ती सांगते. आसिफवरचा भूतप्रेतापासून सोडवण्यासाठी पीर बाबाची मदत घेतली जाते आणि यादरम्यान ‘लक्ष्मी’ची स्टोरी सर्वांना कळते. पीर बाबाच्या मदतीने आसिफच्या शरीरातून लक्ष्मी बाहेर पडते. पण लक्ष्मीची कहाणी ऐकून आसिफ विचलित होतो आणि असे काही करतो की, सिनेमाचा अख्खा क्लायमॅक्सच बदलतो. आसिफ लक्ष्मीला न्याय मिळवून देण्यासाठी काय करतो, यासाठी तुम्हाला चित्रपट बघावा लागेल.

तुम्ही राघव लॉरेन्सचा ‘कंचना’ हा सिनेमा बघितला असेल तर कथा तिच आहे मात्र थोड्या वेगळ्या रूपात व ढंगात पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अर्थात राघव लॉरेन्सचा हा प्रयत्न पूर्णपणे फसला आहे.  पहिला सीन जबरदस्त आहे. अक्षय कुमारची धमाकेदार एन्ट्रीने सिनेमाची सुरुवात होते. पण कथा जशीजशी पुढे सरकते तशी तुमची निराशा होते.  लक्ष्मी या भुताचा अंगसत संचार झाल्यानंतरचा त्याचा अभिनय ओव्हरअ‍ॅक्टिंग वाटतो.

राघव लॉरेन्सने सिनेमाचे दिग्दर्शन केले असल्याने अक्षयच्या या सिनेमावर नको इतका साऊथचा प्रभाव जाणवतो. ‘कंचना’ प्रदर्शित होऊन 10 वर्षे झालीत. इतक्या वर्षांनंतर हिंदीत याचा रिमेक तयार होत असेल तर काळानुरूप आणि बॉलिवूड प्रेक्षकानुरूप सुसंगत बदल अपेक्षित आहेत. राघव लॉरेन्सने मात्र जशाच्या तसा रिमेक रिमेक बनून प्रेक्षकांच्या माथी मारला आहे.  साऊथच्या सिनेमातील व्याकरण थेट हिंदीत वापरलेले पाहून डोक्याचा पार भुगा होतो.  साऊथचे सिनेमे आवडत असतील तर ठीक. मात्र असे नसेल तर पहिलेच गाणे खटकते आणि यानंतर सिनेमातील इंटरेस्ट संपतो. या चित्रपटातील प्रत्येक गाणे कथेला सुरूंग लावण्याचे काम करतो. बुर्ज खलीफा हे गाणे हिट आहे. मात्र सिनेमात ते खटकते.

म्हणायला लक्ष्मी एक हॉरर कॉमेडी सिनेमा आहे. मात्र चित्रपट घाबरवत नाही. कॉमेडीचे म्हणाल तर ओढूनताणून डायलॉगच्या माध्यमातून विनोद निर्माण करण्याचा थिल्लर प्रयत्न स्पष्ट दिसतो. अक्षयचा सुरुवातीचा अभिनय जबरदस्त आहे. कियारानेही तिच्या भूमिकेला न्याय दिला आहे. खºया लक्ष्मीच्या भूमिकेत शरद केळकर काही क्षण दिसतो, मात्र स्वत:ची छाप सोडून जातो. अन्य कलाकारांनीही आपल्या आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे. मात्र उत्तरार्धात चित्रपटाची कथा पूर्णपणे भरकटते. उरतो तो केवळ सावळागोंधळ. 
एकंदर काय तर अक्षयचे चाहते असाल तर हा सिनेमा बघा, अन्यथा न बघितलेला उत्तम.

Web Title: Laxmii Review: Akshay Kumar’s ‘Laxmii’ Is the Worst Film of 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.