गुडगाव : एक रोमांचक कथा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2017 09:02 AM2017-08-03T09:02:47+5:302017-08-03T14:32:47+5:30

गुडगावमधील वाढती गुन्हेगारी, संदिग्ध हत्या व अपहरणाच्या घटनांच्या हेडलाईन्सने या शहराबद्दलची एक नकारात्मक प्रतिक्रियाही तयार झाली आहे. आपल्या मनातील याच नकारात्मक प्रतिक्रियेला विविध पात्रांच्या माध्यमातून आकार देण्याचा प्रयत्न दिग्दर्शक शंकर रमन यांनी ‘गुडगाव’ या आपल्या चित्रपटातून केला आहे.

गुडगाव : एक रोमांचक कथा | गुडगाव : एक रोमांचक कथा

गुडगाव : एक रोमांचक कथा

googlenewsNext
Release Date: August 03,2017Language: हिंदी
Cast: अक्षय ओबेरॉय,पंकज त्रिपाठी,रागिनी खन्ना
Producer: राकेश भगवानीDirector: शंकर रमन
Duration: 2 तासGenre:
लोकमत रेटिंग्स
ong>- जान्हवी सामंत

‘गुडगाव’ म्हटले की, आपल्या डोक्यात अनेक प्रतिमा येतात. एक सुसज्ज शहर, गडगंज श्रीमंती, लक्झरी बंगले, या बंगल्यासमोरच्या अलिशान गाड्या, मोठमोठे उद्योगधंदे असे सगळे सगळे. अनेकांसाठी गुडगाव म्हणजे स्वप्नांचे शहर आहे. पण या स्वप्नांच्या शहराला एक काळी किनारही आहे. गुडगावमधील वाढती गुन्हेगारी, संदिग्ध हत्या व अपहरणाच्या घटनांच्या हेडलाईन्सने या शहराबद्दलची एक नकारात्मक प्रतिक्रियाही तयार झाली आहे. आपल्या मनातील याच नकारात्मक प्रतिक्रियेला विविध पात्रांच्या माध्यमातून आकार देण्याचा प्रयत्न दिग्दर्शक शंकर रमन यांनी ‘गुडगाव’ या आपल्या चित्रपटातून केला आहे.

चित्रपटाची कथा केहरी सिंह(पंकज त्रिपाठी) या भूमाफियाभोवती फिरते. बडे राजकारणी आणि अधिका-यांना हाताशी धरून गैरमार्गाने रिअल इस्टेट क्षेत्रात मोठे साम्राज्य उभे करणा-या केहरी सिंहचे गरिबांच्या लाटलेल्या जमिनीवर अलिशान प्रोजेक्ट उभारण्याचे स्वप्न असते. मुलगी प्रीत(रागिनी खन्ना) हिच्या नावाने केहरी सिंहने रिअल इस्टेट एजन्सी उघडलेली असते. कारण प्रीत ही त्याची ‘लकी चार्म’ असते. प्रीतचा शब्द म्हणजे केहरी सिंहसाठी काळ्या दगडावरची रेष असते.  प्रीतवर  जीवापाड करणा-या केहरी सिंहचे मुलगा निक्की (अक्षय ओबेरॉय) याच्याकडे मात्र पुरते दुर्लक्ष होते. पित्याकडून होणारी उपेक्षा आणि व्यावसायिक पातळीवरचे अपयश यामुळे निक्की निराश होतो. आपल्या या स्थितीला बहीण प्रीत जबाबदार मानून त्याचे मन तिच्याबद्दलच्या द्वेषाने भरून येते. या द्वेषापोटी आणि पैशाच्या लालसेने निक्की बहीण प्रीतच्या अपहरणाची योजना आखतो. पण नंतर काय घडते, यासाठी तुम्हाला चित्रपटच बघावा लागेल.

१ तास ३७ मिनिटांचा हा चित्रपट हळूहळू उलगडत जातो. केवळ केहरी सिंहच्या कुटुंबातील तणावच नाही तर या कुटुंबातील प्रत्येक पात्राचे अंतरंग हळूहळू प्रेक्षकांसमोर येतो. शहरातील संदिग्ध, भयावह असे अनेक अंधारे कोपरे तुम्ही यात पाहू शकता. म्हणजेच, बोकाळलेला भ्रष्टाचार, पैशाचा लोभ, या लोभातून निर्माण झालेली अराजकता शिवाय सामान्यांचा जीवन जगण्यासाठीचा संघर्ष असे सगळे यात दिसते. संथपणे पुढे सरकणाºया या कथेत दिग्दर्शक शंकर रमण एकाचवेळी एक शीतल तेवढीच क्रूर कथा सांगून आपल्याला धक्का देतात. चित्रपट हळहळू पुढे सरकतो आणि आपल्या धक्क्यावर धक्के देतो. पंकज त्रिपाठी, शालिनी वत्स आणि अक्षय ओबेराय यांचा अभिनय काबीलेतारिफ आहे. त्यांचा अभिनय पडद्यावरची पात्र जणू जिवंत करतो. आमिर बशीरच्या वाट्याला फार मोठी भूमिका नाही. पण छोट्याशा भूमिकेतही तो लक्षात राहतो. एकंदर काय, तर हा एक रोमांचक चित्रपट आहे. वेळ असेल तर हा चित्रपट नक्की बघता येईल.

Web Title: गुडगाव : एक रोमांचक कथा

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.