Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency: तळे येथील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 17:44 IST2024-05-08T17:42:42+5:302024-05-08T17:44:09+5:30
ग्रामस्थ एका ठिकाणी जमा झाले. मात्र, कोणीही मतदान नाही केले

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency: तळे येथील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
खेड : रायगड लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या दापोली विधानसभा मतदारसंघातील खेड तालुक्यामधील तळे देऊळवाडी मतदान केंद्रांतर्गत येणाऱ्या मसोबाची वाडी येथील ग्रामस्थांनी मंगळवारी झालेल्या मतदानावर बहिष्कार टाकला. या वाडीतील सुमारे ७० ते ७५ ग्रामस्थ एका ठिकाणी जमा झाले. मात्र, कोणीही मतदान केले नाही.
याबाबत गेल्या महिन्यातच मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे त्यांनी प्रशासनाला पत्रव्यवहार करून कळवले होते. गेल्या वर्षी अतिवृष्टीमध्ये वाडीला जोडणारा रस्ता वाहून गेला होता. मात्र, पावसाळा तोंडावर आला तरीही रस्त्याचे काम झालेले नाही. या कामाचा पाठपुरावा करूनही ते काम पूर्ण झालेले नाही. यासाठी त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता.
मंगळवारी मतदान पार पडत असताना तळे मसोबाचीवाडी येथील सुमारे ७० ते ७५ मतदारांनी मतदान केले नाही. दरम्यान, संबंधित प्रशासनाच्या एकाही अधिकाऱ्याने तळे मसोबाची वाडी येथील ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्या रस्त्याची समस्या समजून घेण्यात स्वारस्य दाखवले नाही, असा आरोप या वाडीतल ग्रामस्थांनी केला आहे.