Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency: ९६ वर्षीय आजोबांनी खास दुबईहून येवून केले मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 17:51 IST2024-05-08T17:49:32+5:302024-05-08T17:51:44+5:30
खेड : पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून प्रत्येक वेळी मतदानाचा हक्क बजावणारे खेड तालुक्यातील वाडी जैतापूर येथील ९६ वर्षीय गौरीहर खातू ...

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency: ९६ वर्षीय आजोबांनी खास दुबईहून येवून केले मतदान
खेड : पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून प्रत्येक वेळी मतदानाचा हक्क बजावणारे खेड तालुक्यातील वाडी जैतापूर येथील ९६ वर्षीय गौरीहर खातू यांनी १८व्या लोकसभेसाठी मंगळवारी मतदान केले. तेवढ्यासाठी ते दुबईहून खेडमध्ये आले आहेत.
२१ सप्टेंबर १९२८ रोजी खेड येथे जन्म झालेले गौरीहर खातू यांनी राज्य शासनामध्ये सनदी अधिकारी म्हणून काम केले. त्यांना पहिले मतदान आजही व्यवस्थित आठवते. पूर्वी त्यांचे नाव असलेला भाग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात होता. आता तो रायगड लोकसभा मतदारसंघात आहे. सध्या ते कुटुंबासमवेत दुबईमध्ये राहतात. केवळ मतदान करण्यासाठी ते आणि त्यांचे कुटुंबीय दुबईहून खेडमध्ये आले आहेत. त्यांनी शहरातील हाजी एस. एम. मुकादम हायस्कूल येथे सकाळी ९ वाजता आपला मतदानाचा हक्क बजावला.