जिल्ह्यात बाप्पाच्या आगमनाचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 01:05 AM2019-09-02T01:05:11+5:302019-09-02T01:05:23+5:30

खरेदीला उधाण : २७७ सार्वजनिक, तर एक लाख घरगुती गणेशमूर्तींची होणार प्रतिष्ठापना

The excitement of Bappa's arrival in the district | जिल्ह्यात बाप्पाच्या आगमनाचा जल्लोष

जिल्ह्यात बाप्पाच्या आगमनाचा जल्लोष

Next

अलिबाग : रायगड जिल्ह्यात सोमवारी २७७ सार्वजनिक आणि तब्बल एक लाख एक हजार ३२५ घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे १४ हजार १८७ गौरींचे आगमन होणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस गणेशभक्त बाप्पाच्या उत्सावात दंग राहणार आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या संख्येने वाहने आल्याने तसेच महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम आणि महामार्गावरील खड्डे यामुळे वाहतूककोंडीचा सामना करावा लागत असल्याने वाहतूक संथगतीने सुरू आहे. बाप्पाच्या उत्सवात कोणतेच विघ्न येऊ नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

कोकणासह रायगड जिल्ह्यामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे. मुंबई-पुण्यात कामानिमित्त असणारे चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणातील आपापल्या घरी परतात. गेल्या दोन दिवसांपासून मुंबई-गोवा महामार्ग वाहनांनी फुलून गेला आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे, तसेच ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे चाकरमान्यांचा प्रवास कठीण झाला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर पेण तरणखोप ते वडखळ दरम्यान रस्त्याचे काम सुरू आहे, तसेच मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असल्याने प्रामुख्याने या मार्गावर वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना हा रस्ता पार करण्यासाठी सुमारे एक ते दीड तासांचा अवधी लागत आहे. इंदापूर, माणगाव या रस्त्यावरही वाहतूककोंडी झालेली आहे. माणगाव वडपाले येथे सकाळी एसटी बसला आग लागल्याने येथील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

खड्डेमय रस्ता, अपघात, महामार्गाच्या रुं दीकरणाचे काम यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमानी गणेशभक्तांना वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या या दुरवस्थेमुळे प्रवास करणाºया गणेशभक्तांकडून नाराजीही व्यक्त केली जात आहे. वाहतूककोंडी होऊन प्रवासात रस्त्यातच अडकून पडू नये, यासाठी महामार्गावर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच दहा ठिकाणी मदतकेंद्र निर्माण करण्यात आली आहेत. त्या ठिकाणी क्रेन, रुग्णवाहिका तत्पर ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे अपघात झाला तरी काही वेळातच अपघातग्रस्त अथवा बंदी पडलेली वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत ठेवण्यात येणार आहे.
सार्वजनिक मंडळांतही बाप्पाच्या आगमनाच्या तयारीसाठी चांगलीच धावपळ दिसून येत आहे.

डीजेच्या आवाजावर निर्बंध कायम
च्गणेशोत्सवात मनोरंजनासाठी वाद्य अथवा लाउड स्पीकरचा वापर करण्यात येणार असला, तरी डीजेच्या आवाजावर निर्बंध कायम ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या प्रखर विद्युत रोषणाईवरही पोलिसांची नजर राहणार आहे.

च्पनवेलमधील बाजारपेठेत खरेदीसाठी शहरातील ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यात सजावटीचे साहित्य, फळे-फुलांची मागणी वाढली आहे.

Web Title: The excitement of Bappa's arrival in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.