पोलिसांच्या रुट मार्चने अलिबागकर आश्वस्त; निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पथसंचलन 

By निखिल म्हात्रे | Published: May 1, 2024 07:54 PM2024-05-01T19:54:07+5:302024-05-01T19:54:29+5:30

लोकसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने बुधवारी सायंकाळी अलिबाग विधानसभा मतदार संघात क्रीडा भवन पासून सुरुवात झाली.

Alibagkar reassured by police route march Movement for peaceful conduct of elections | पोलिसांच्या रुट मार्चने अलिबागकर आश्वस्त; निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पथसंचलन 

पोलिसांच्या रुट मार्चने अलिबागकर आश्वस्त; निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पथसंचलन 

अलिबाग: सहा दिवसांवर आलेल्या लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी अलिबाग विधानसभा मतदारसंघात बुधवारी पोलिसांनी रुट मार्च आणि पथसंचलन केले. जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली हे रूट मार्च व पथसंचलन करण्यात आले. यावेळी स्वता चालत जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे या पथसंचलनामध्ये सहभागी झाले होते.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विनिता चौधरी, वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल लाड, राखीव पोलिस दलाचे पोलिस निरीक्षक विजय बाविस्कर, अलिबाग पोलिस निरीक्षक संजय पाटील, मांडवा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे आदी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने बुधवारी सायंकाळी अलिबाग विधानसभा मतदार संघात क्रीडा भवन पासून सुरुवात झाली. हा रुटमार्च पोश्य ऑफीस, पापाभाई पठाण चौक, बाजारपेठ, जामा मशीद, छत्रपती शिवाजी महाराज चौक, ठिकरुळ नाका, शेतकरी भवन, प्रजक्ता काॅर्नर, एस.टी. स्टॅण्ड, महाविर चोक, बालाजी नाका, मारूती नाका, असबीआय बॅंक ते पोलिस अधिक्षक कार्यालय असा रुट मार्च घेण्यात आला.

यासाठी 15 अधिकारी आणि 100 कर्मचारी, एस.ए.पी त्रिपुरा प्लाटून, जलद प्रतिसाद पथक, होमगार्ड हजर होते. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. सर्व जनतेला व्यवस्थितरित्या मतदान करता यावे, भयमुक्‍त वातावरणात, शांततेत आणि सुरळीत ही निवडणूक पार पडावी यासाठी बुधवारी अलिबाग शहरामध्ये पोलिस रूट मार्च आणि पोलीस संचलन करण्यात आल्याची माहिती पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.

Web Title: Alibagkar reassured by police route march Movement for peaceful conduct of elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.